आंबेडकरी साहित्य संमेलनात महिलाही सक्रिय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 06:00 AM2019-09-19T06:00:00+5:302019-09-19T06:00:10+5:30

विविध क्षेत्रातील सक्षम महिला आयोजनात वेगवेगळी भूमिका समर्थपणे पार पाडू शकतात. त्यांनी जमेल ती जबाबदारी स्वीकारावी आणि आयोजन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी सुनील वासनिक यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले.

Women are also active in Ambedkarite Literature | आंबेडकरी साहित्य संमेलनात महिलाही सक्रिय

आंबेडकरी साहित्य संमेलनात महिलाही सक्रिय

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : आंबेडकरी साहित्य व कला अकादमीतर्फे यवतमाळ येथे १४ वे अखिल भारतीय आंबेडकरी साहित्य संमेलन होऊ घातले आहे. यादृष्टीने आयोजनात सर्वांचा सहभाग राहावा, यासाठी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत महिलांची बैठक घेण्यात आली. बैठकीला मिळालेला प्रतिसाद पाहता संमेलनाच्या आयोजनात महिलांचा भरघोस व सक्रिय वाटा राहील, असा विश्वास आयोजकांमध्ये निर्माण झाला आहे.
प्रा. श्रद्धा धवने यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. अकादमीचे सचिव आनंद गायकवाड यांनी सभेला संबोधित केले. विविध क्षेत्रातील सक्षम महिला आयोजनात वेगवेगळी भूमिका समर्थपणे पार पाडू शकतात. त्यांनी जमेल ती जबाबदारी स्वीकारावी आणि आयोजन यशस्वी करावे, असे आवाहन त्यांनी केले. प्रारंभी सुनील वासनिक यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले. साहित्य संमेलन तयारीच्या दृष्टीने या बैठकीत मार्गदर्शन केले. उपस्थितांच्या सूचना स्वीकारण्यात आले.
बैठकीला डॉ. गुंजा दहीकर, अ‍ॅड. शुभांगी खरे, प्रिया वाकडे, शिल्पा पाटील, सुजाता मेश्राम, कविता नागदिवे, वनिता जंगले, पूजा अशोक खंडारे, मीताली घुले, आशा वाळके, अर्चना तेलगोटे, पल्लवी कांबळे, रेखा लोणारे, मंगला गजभिये, वंदना उरकुडे, सुलभा रामटेके, उज्ज्वला बोंडे, माया महाजन, चंदा उमरे, हेमलता कळणे, मंगला जाधव, मालती गायकवाड, बबिता वाहने, ज्योती बोरकर, लता भगत, मोना मोहोड, सुषमा डोंगरे, शोभना कोटंबे, नीलिमा डोंगरे, दुर्गा मुनेश्वर, शांता पाटील, अर्चना नागदिवे, आशा मेश्राम, निशा डोंगरे, नंदा पानतावने, साधना खोब्रागडे आदींची उपस्थिती होती. सभेसाठी डॉ. सुभाष जमधाडे, नवनीत महाजन, पद्माकर घायवन आदींनी पुढाकार घेतला.

Web Title: Women are also active in Ambedkarite Literature

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Womenमहिला