शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

चुकीच्या उपचाराने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2019 06:00 IST

शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी आईला दोन दिवसापूर्वी निमोनिया झाला असून चुकीच्या उपचारामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला थेट अतिदक्षता कक्षात ठेवले. तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. केवळ डॉ. शेख शब्बीर यांनी चुकीचा उपचार केल्याने आईचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देमुलाची तक्रार : पोलिसांना वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : येथील भोसा मार्गावर असलेल्या सेवा हॉस्पीटलमध्ये महिलेवर चुकीचा उपचार केल्याने मृत्यू झाल्याची तक्रार महिलेच्या मुलाने अवधुतवाडी ठाण्यात केली आहे.उषा शंकर पातालबंसी (४०) रा. कोळंबी असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा अक्षय याने तिला १८ सप्टेंबर रोजी डॉ. शेख शब्बीर यांच्या सेवा हॉस्पटलमध्ये आणले. डॉक्टरांनी तपासणी करून भरती होण्यास सांगितले. साधा व्हायरल फिव्हर असून दोन दिवसात ठिक होईल असे सांगितले. मात्र २२ सप्टेंबरला प्रकृती गंभीर झाली. तेव्हा डॉक्टर शेख यांनी ताबडतोब ५ हजार रुपये जमा करायला लावले. तसेच दोन दिवस औषधीवर दहा हजार रुपये खर्च झाले. त्यानंतर डॉ. शेख यांनी आईला शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी आईला दोन दिवसापूर्वी निमोनिया झाला असून चुकीच्या उपचारामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला थेट अतिदक्षता कक्षात ठेवले. तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. केवळ डॉ. शेख शब्बीर यांनी चुकीचा उपचार केल्याने आईचा मृत्यू झाला. अशी तक्रार अक्षयने अवधुतवाडी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.ताप व उलटीचा त्रास असल्याने ती महिला रुग्णालयात आली होती. रक्त तपासणीत निमोनिया असल्याचे पुढे आले. तिच्यावर योग्य उपचार केला. मात्र स्वाईन फ्लू असल्याचा संशय आल्याने तिला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. चुकीचा उपचार केल्याचा आरोप खोटा आहे.- डॉ. पाशू शब्बीर शेखसेवा हॉस्पिटल, यवतमाळ.

टॅग्स :hospitalहॉस्पिटल