चुकीच्या उपचाराने महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2019 06:00 AM2019-09-24T06:00:00+5:302019-09-24T06:00:11+5:30

शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी आईला दोन दिवसापूर्वी निमोनिया झाला असून चुकीच्या उपचारामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला थेट अतिदक्षता कक्षात ठेवले. तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. केवळ डॉ. शेख शब्बीर यांनी चुकीचा उपचार केल्याने आईचा मृत्यू झाला.

Woman dies due to improper treatment | चुकीच्या उपचाराने महिलेचा मृत्यू

चुकीच्या उपचाराने महिलेचा मृत्यू

Next
ठळक मुद्देमुलाची तक्रार : पोलिसांना वैद्यकीय अहवालाची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : येथील भोसा मार्गावर असलेल्या सेवा हॉस्पीटलमध्ये महिलेवर चुकीचा उपचार केल्याने मृत्यू झाल्याची तक्रार महिलेच्या मुलाने अवधुतवाडी ठाण्यात केली आहे.
उषा शंकर पातालबंसी (४०) रा. कोळंबी असे मृत महिलेचे नाव आहे. मुलगा अक्षय याने तिला १८ सप्टेंबर रोजी डॉ. शेख शब्बीर यांच्या सेवा हॉस्पटलमध्ये आणले. डॉक्टरांनी तपासणी करून भरती होण्यास सांगितले. साधा व्हायरल फिव्हर असून दोन दिवसात ठिक होईल असे सांगितले. मात्र २२ सप्टेंबरला प्रकृती गंभीर झाली. तेव्हा डॉक्टर शेख यांनी ताबडतोब ५ हजार रुपये जमा करायला लावले. तसेच दोन दिवस औषधीवर दहा हजार रुपये खर्च झाले. त्यानंतर डॉ. शेख यांनी आईला शासकीय रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला. शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी आईला दोन दिवसापूर्वी निमोनिया झाला असून चुकीच्या उपचारामुळे त्यांची प्रकृती बिघडल्याचे सांगितले. डॉक्टरांनी तिला थेट अतिदक्षता कक्षात ठेवले. तिचा रविवारी दुपारी मृत्यू झाला. केवळ डॉ. शेख शब्बीर यांनी चुकीचा उपचार केल्याने आईचा मृत्यू झाला. अशी तक्रार अक्षयने अवधुतवाडी पोलीस ठाण्यात केली. या तक्रारीची पोलिसांकडून तपासणी करण्यात येत आहे.

ताप व उलटीचा त्रास असल्याने ती महिला रुग्णालयात आली होती. रक्त तपासणीत निमोनिया असल्याचे पुढे आले. तिच्यावर योग्य उपचार केला. मात्र स्वाईन फ्लू असल्याचा संशय आल्याने तिला शासकीय रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. चुकीचा उपचार केल्याचा आरोप खोटा आहे.
- डॉ. पाशू शब्बीर शेख
सेवा हॉस्पिटल, यवतमाळ.

Web Title: Woman dies due to improper treatment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.