शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
2
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
3
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
4
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
5
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
6
...अन सर्वांसमोर तिने धरला अभिषेक शर्माचा हात, फलंदाज झाला अवाक्, त्यानंतर.....  
7
संगणक शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, अभियंता, व्हिडीओ गेम डेव्हलपर; वॉशिंग्टन गोळीबार प्रकरणातील हल्लेखोराची माहिती आली समोर
8
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
9
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
10
चाबहार बंदरात चीनच्या घुसखोरीची भीती; इराणमध्ये भारताचे ₹११३० कोटी पनाला, कारण काय...
11
फिट असूनही धोनी का खेळत नाही आहे? चेन्नई सुपरकिंग्सच्या गोटातून समोर आलं असं कारण 
12
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
13
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
14
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
15
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
16
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
17
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
18
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
19
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
20
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

घाटंजी तालुक्यात वन्यप्राण्यांचा धुमाकूळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2019 06:00 IST

शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

ठळक मुद्देशेतकरी त्रस्त : वन विभागाने बंदोबस्त करावा, पिकांचे नुकसान

लोकमत न्यूज नेटवर्कघाटंजी : तालुक्यात वन्यप्राण्यांनी धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात कपाशी, तूर, हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. वन विभागाने वन्यप्राण्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहे.शेतकरी पिकांची राखण करून आता उत्पन्न घेण्याच्या मार्गावर आहे. मात्र वन्यप्राण्यांमुळे शेतातील उभ्या पिकांचे नुकसान होत आहे. कापूस, तूर, सोयाबीन व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. रानडुक्कर व रोहींमुळे पिकांचे मोठे नुकसान होत आहे. या वन्यप्राण्यांना आळा घालण्यासाठी उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.शेतकरी राबराब राबून आपल्या शेतात पिकांचे उत्पन्न काढतो. त्यासाठी सावकाराकडून व इतर ठिकाणाहून कर्ज घेतो. मात्र उत्पन्न निघण्यापूर्वीच त्याला अनेक संकटांचा सामना करावा लागतो. त्यातही कसेबसे उत्पन्न निघताना आता वन्यप्राण्यांमुळे नुकसान होत आहे. त्यामुळे कर्ज कसे फेडावे, कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आमडी येथील संजय मानकर यांच्या शेतात तर रानडुकरे व इतर वन्यप्राण्यांनी कपाशीचे प्रचंड नुकसान केले. त्यांनी वन व कृषी विभागाकडे दाद मागितली असता, अल्पशी मदत मिळाली. त्यामुळे वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.मदतीस विलंबपिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी वन विभाग, तहसील व कृषी विभागामार्फत एका समितीची नेमणूक करण्यात आली आहे. ही समिती नुकसानीची पाहणी करते. नंतर अहवाल सादर केला जातो. मात्र या प्रक्रियेत अनेक शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळण्यास विलंब होतो. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष आहे. पिकांची नुकसान भरपाई तत्काळ मिळावी, यासाठी समितीच्या कामकाजात सुधारणा करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :wildlifeवन्यजीव