शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीला विहिरीत ढकलून केले ठार

By admin | Updated: October 7, 2015 02:48 IST

पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला विहिरीत बुडवून ठार मारून आपल्या दोन मुलांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

यवतमाळ : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला विहिरीत बुडवून ठार मारून आपल्या दोन मुलांचा गळा दाबून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना आर्णी तालुक्यातील बारभाई शिवारातील पुरूषोत्तमनगर येथे सोमवारी सायंकाळी घडली. याप्रकरणातील आरोपी पतीने शेतातच विष प्राशन केले. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे. छाया विजय राठोड (३०) रा. आरंभी ता. दिग्रस असे मृत महिलेचे नाव आहे. दारव्हा तालुक्यातील चिकणी (कामठवाडा) येथील मोतीराम चव्हाण यांची मुलगी छायाचा विवाह दिग्रस तालुक्यातील आरंभी येथील विजय चरणदास राठोड याच्या सोबत झाला होता. या दाम्पत्याला पार्थ (१०) आणि गौरी (७) अशी मुले आहेत. या दोघात नेहमीच वाद होत होते. दरम्यान रविवारी विजय आपल्या मामाचे गाव असलेल्या आर्णी तालुक्यातील सावळी येथील पुरुषोत्तमनगर येथे येथे परिवारासह गेला होता. मामाच्या शेतात पत्नी छाया व दोन मुलांसह सोमवारी दुपारी गेला. या ठिकाणी एकमेकांच्या चारित्र्यावर संशय घेत वाद सुरू झाला. या वादात विजयने शेतातील विहिरीत पत्नी छायाला ढकलून दिले. त्यानंतरही छाया विहिरीतील पाईपच्या आधाराने वरचढण्याचा प्रयत्न करीत होती. त्यावेळी निर्दयी पतीने विहिरीत उतरुन तिला पाण्यात बुडवून ठार मारले. त्यावेळी मदतीसाठी ओरडणारे मुलगा पार्थ आणि मुलगी गौरीचाही गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या तावडीतून सुटका केली. यावेळी शेतात विजयची मामी आणि मामेभाऊ विकास उपस्थित होता. घटनेनंतर शेतात फवारणी सुरू असलेले औषध विजयने प्राशन केले. त्याला रुग्णालय दाखल केले. या घटनेची तक्रार छायाचा भाऊ राजू चव्हाण याने पारवा पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून आरोपी विजय राठोड याच्यावर खुनाचा व जीव मारण्याचा प्रयत्न करण्याचा गुन्हा दाखल केला. दरम्यान मंगळवारी राजू चव्हाणने जिल्हा पोलीस अधिक्षकांना निवेदन दिले. त्यात छायाच्या मृत्यूस पती विजय चरणदास राठोड, सासू इमला राठोड, ननद ललिता जाधव, रा. गनगाव, विजयचा मामा मोहन चव्हाण, मामे भाऊ विकास चव्हाण आणि विकासची आई सर्व रा. पुरूषोत्तम नगर, यांच्याकडून छायाचा हुंड्यासाठी छळ झाल्याचे म्हटले आहे. या सर्वांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. (कार्यालय प्रतिनिधी)