शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

बियाणे कृत्रिम टंचाईवर १७ भरारी पथकांचा वॉच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 05:00 IST

यवतमाळातील सोयाबीनच्या प्रमुख वितरकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, कृत्रिम टंचाईच्या नावाने जादा दरात बियाणे विकले जात आहे. सौदे व बुकिंग करून कंपनीतूनच परस्पर मालाची दुसऱ्या जिल्ह्यात विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील रिटेलरला मागणीच्या अर्धाच बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. कंपनीकडून मालच आला नाही, कंपनी यावेळी पैशासाठी साईट देत नाही अशी कारणे सांगून टंचाई निर्माण केली जात आहे.

ठळक मुद्देकलेक्टरची बैठक : बोगस बियाणे, जादा दराने विक्रीवर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : सोयाबीनसह अन्य बियाण्यांची कृत्रिम टंचाई निर्माण करणे, जादा दराने होणारी विक्री रोखणे, बोगस बियाणे थांबविणे आदी कारवाई करण्यासाठी जिल्ह्यात कृषी विभागाची १७ भरारी पथके स्थापन करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना लुटणाऱ्या सर्व संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सोमवारी येथे बैठकीत दिले.यवतमाळातील सोयाबीनच्या प्रमुख वितरकांकडून शेतकऱ्यांची लूट सुरू आहे, कृत्रिम टंचाईच्या नावाने जादा दरात बियाणे विकले जात आहे. सौदे व बुकिंग करून कंपनीतूनच परस्पर मालाची दुसऱ्या जिल्ह्यात विल्हेवाट लावली जात आहे. जिल्ह्यातील रिटेलरला मागणीच्या अर्धाच बियाण्यांचा पुरवठा केला जात आहे. कंपनीकडून मालच आला नाही, कंपनी यावेळी पैशासाठी साईट देत नाही अशी कारणे सांगून टंचाई निर्माण केली जात आहे. प्रमुख वितरकांची गोदामे बियाण्यांनी भरली आहे. तर दुसरीकडे शेतकऱ्यांना बियाण्यांसाठी प्रतीक्षा करावी लागत आहे. या सर्व मुद्यांवर ‘लोकमत’ने वृत्तमालिकेद्वारे प्रकाशझोत टाकून वर्षानुवर्षे शेतकऱ्यांना लुटणाऱ्यां यवतमाळातील व ग्रामीणमधील प्रमुख वितरकांचा पर्दाफाश केला. ही वृत्तमालिका कृषी आयुक्तांपर्यंत पोहोचल्याने पुण्यातूनही येथील कृषी अधिकाºयांची झाडाझडती घेतली गेली.या वृत्ताची दखल घेत अखेर सोमवारी जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी सर्व सोळाही तालुक्याच्या कृषी अधिकाऱ्यांची बैठक बोलविली होती. त्यात खरीप हंगामाच्या अनुषंगाने विविध मुद्यावर चर्चा केली गेली. बोगस बियाणे विकणाऱ्यांवर वॉच ठेऊन त्यांच्याविरोधात कडक कारवाईचे निर्देश जिल्हाधिकाºयांनी दिले. एमआरपी पेक्षा जादा दराने विकणाऱ्यांनाही दणका देण्याची सूचना केली गेली. सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी बियाणे व खतांच्या मागणी व पुरवठ्यात तफावत येणार नाही या दृष्टीने निरीक्षण व नियंत्रण ठेवण्याचे निर्देश दिले गेले. वणीपासून उमरखेडपर्यंत बियाणे व खतातील गोंधळ थांबविण्यासाठी १७ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली.फवारणी विषबाधेबाबतही सावधगिरीतीन वर्षांपूर्वी जिल्ह्यात पिकांवर कीटकनाशकांची फवारणी करताना विषबाधा होऊन अनेक शेतकरी-शेतमजुरांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर कीटकनाशक फवारणीच्या शेतकऱ्यांसाठी कार्यशाळा घेण्याचे निर्देश देण्यात आले. तालुका कृषी अधिकाऱ्यांनी कुण्या शेतकºयाला विषबाधा झाल्यास लगेच तहसीलदार आणि तालुका आरोग्य अधिकाºयांना याबाबत माहिती देण्याच्या सूचनाही बैठकीत दिल्या गेल्या. या बैठकीमध्ये अनेक मुद्यांवर चर्चा झाली. कृषी अधिकाºयांनी बियाण्यांच्या कृत्रिम टंचाईचे मूळ शोधण्याची व कंपन्यांसह विविध ठिकाणावरून माहिती मागविण्याची व्युहरचनाही केल्याचे सांगितले जाते.

टॅग्स :agricultureशेती