शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

ओला शेतमाल ठेवण्यास वखार महामंडळाचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 22, 2019 11:06 IST

परतीच्या पावसाने शेतमालाची प्रत घसरली आहे. या धान्याला खुल्या बाजारात कमी दर मिळत आहे. असे धान्य सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार महामंडळाकडे धाव घेतली. गुणवत्ता घसरलेला शेतमाल स्वीकारण्यास वखार महामंडळांनी नकार दिला आहे.

ठळक मुद्देपरतीच्या पावसाने प्रत घसरली छोटे कर्ज मंजूर करताना बँकांनी झटकले हात

रूपेश उत्तरवार ।लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने शेतमालाची प्रत घसरली आहे. या धान्याला खुल्या बाजारात कमी दर मिळत आहे. असे धान्य सुरक्षित करण्यासाठी शेतकऱ्यांनी वखार महामंडळाकडे धाव घेतली. गुणवत्ता घसरलेला शेतमाल स्वीकारण्यास वखार महामंडळांनी नकार दिला आहे. तर खासगी गोदामातील धान्यावर कर्ज देताना बँकांनी हात झटकले आहेत.खुल्या बाजारात शेतमालाचे दर पडल्यास शेतमालास संरक्षण देणारी यंत्रणा उभी करण्यात आली. त्याकरिता राज्य वखार महांमडळ आणि केंद्रीय वखार महामंडळाची निर्मिती करण्यात आली. वखार महामंडळात शासकीय धान्यासोबत शेतमाल ठेवण्याची तरतूद आहे. वखार महामंडळाच्या क्षमतेनुसार हे धान्य ठेवले जाते. या ठिकाणी ठेवलेल्या धान्यावर तारण दिले जाते. त्याचे व्याजदर अत्यल्प असतात.तारण म्हणून ठेवलेल्या धान्याला बँका खुल्या बाजारातील दराच्या ७० टक्के कर्ज देते. यामुळे दर पडलेल्या अवस्थेत शेतकरी वखार महामंडळाच्या गोदामाकडे धाव घेतात. यावर्षी सोयाबीनचे दर घसरले आहेत. गुणवत्ता घसरलेल्या धान्याला संरक्षण मिळावे म्हणून शेतकऱ्यांनी असे धान्य वेअर हाऊसकडे हलविले. मात्र वखार महामंडळांनी धान्य नियमात बसत नाही म्हणून नाकारले आहे. परतीच्या पावसाने भिजलेले धान्य खराब होणार या भीतीने वखार महामंडळ असे धान्य ठेवण्यासाठी तयार नाही. बँकाही अशा धान्यावर कर्ज देण्यास तयार नाही. यातून शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.व्यापाऱ्यांची संख्या घटलीखरेदी झालेले धान्य ठेवायचे, त्यावर कर्ज घ्यायचे आणि नव्याने व्यापार करायचा, असा वखार महामंडळाचा व्यवहार चालत होता. आता गोदामात धान्यच स्वीकारले गेले नाही. यामुळे पैशाची गुंतवणूक थांबली आहे. बाजारात धान्य खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांची संख्या घटली आहे.नियमानुसार, १२ ते १४ टक्के ओलावा असणारा शेतमालच गोदामात ठेवता येतो. यापेक्षा जास्त ओलावा असणारा शेतमाल घेतला जात नाही. तो वाळवून आणल्यानंतरच ठेवण्यास परवानगी दिली जाते. अन्यथा बुरशीने शेतकºयांच्या मालासह इतरही शेतमाल खराब होतो. चांगल्या मालास कुठलीही हरकत नाही.- भास्कर भगत, प्रभारी व्यवस्थापक, केंद्रीय वखार महामंडळ, यवतमाळ

टॅग्स :agricultureशेती