शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

महानगरातून परतलेल्या लेकरांमुळे गावखेडे फुलले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2020 05:01 IST

रोजगारासाठी गावातील अनेक जण मुंबई, पुणे या महानगरात स्थिरावलेले आहेत. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातच रोजगारासाठी प्रत्येकाचे जाणे-येणे असते. यामुळे गावात वृद्ध व्यक्तीच वास्तव्याला आहे. गेल्या १५ वर्षात गावांमध्ये हा बदल मोठ्या प्रमाणात जाणवतो. यातूनच शेतीला लागणारे मनुष्यबळ मिळत नव्हते.

ठळक मुद्देलॉकडाऊनमुळे खेड्यांना २० वर्षापूर्वीचे वैभव : म्हाताऱ्या आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद, शेतात राबण्यासाठी मुबलक मजूर

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : लॉकडाऊनमुळे महानगरातील मोठमोठे कारखाने, लहान उद्योग धंदे, बांधकाम ठप्प झाले आहे. रोजगाराच्या शोधात या नगरात स्थिर झालेले अनेक जण आपल्या गावी परतले आहे. पूर्वी म्हातारेच गावातच थांबत होते. तरुणवर्ग अपवादानेच गावी येत होता. खऱ्या अर्थाने ग्रामीण भागाला २० वर्षापूर्वीच्या वैभवाची जाणीव होत आहे. आई-वडिलांच्या चेहºयावर मुलगा, नातू घरी आल्याचे समाधान दिसत आहे.रोजगारासाठी गावातील अनेक जण मुंबई, पुणे या महानगरात स्थिरावलेले आहेत. इतकेच नव्हे तर आजूबाजूच्या शहरातच रोजगारासाठी प्रत्येकाचे जाणे-येणे असते. यामुळे गावात वृद्ध व्यक्तीच वास्तव्याला आहे. गेल्या १५ वर्षात गावांमध्ये हा बदल मोठ्या प्रमाणात जाणवतो. यातूनच शेतीला लागणारे मनुष्यबळ मिळत नव्हते.त्यामुळे शेतकऱ्यांना नेहमीच मजूर टंचाई जाणवत होती. कोरोनामुळे बहुतांश कुटुंबातील रोजगारासाठी बाहेर पडलेले मुले घरी परतले आहेत. अशा कुटुंबामध्ये सणाचा सारखा आनंद पहायला मिळतो. एकाकी गावात असणाºया वृद्धांना आता नातवंडाचाही सहवास लाभत आहे.२० वर्षापूर्वी गावांमध्ये हे चित्र पहायला मिळत होते. गावातील शेतकरी असो की शेतमजूर यांचे घर भरल्या सारख्या दिसत होते. सर्वच जण शेतमजुरीची कामे करून गुण्यागोविंदाने राहत होते. मात्र नंतरच्या पिढीच्या गरजा वाढल्या, रोजगाराच्या शोधात अनेक जण घराबाहेर पडले. त्यामुळे गावात वडीलधारी मंडळीच वास्तव्याला होती.कोरोनाचा असाही फायदाकोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर झाला. पाहता पाहता संपूर्ण जगच ठप्प झाले. अशा स्थितीत आपसुकच अनेकांनी आपले गाव व घर गाठले. बऱ्याच वर्षानंतर गावात आल्याने त्यांनाही वेगळा आनंद मिळत आहे. काहींनी तर शेतातील कामाला जुंपून घेतले आहे. सध्या शेतात मशागतीसह रबीच्या पिकांची काढणी सुरू आहे. बहुतांश गावांमध्ये पाण्याच्या उपलब्धेनुसार उन्हाळी पिकाचीही लागवड झाली आहे. आता शेतमजूर मिळत असल्याने शेतकºयांनीही शेताच्या बांधबंदिस्तीसह इतर कामे काढली आहे. लॉकडाऊनचा असाही फायदा गावातील कुटुंबांना झाल्याचे दृश्य पहायला मिळते.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या