शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
2
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
3
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
4
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
5
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
6
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
7
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
8
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
9
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
10
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
11
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
12
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
13
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
14
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
15
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
16
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
17
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
18
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
19
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
20
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
Daily Top 2Weekly Top 5

निराधार योजनेचे अध्यक्षपद नाकारले

By admin | Updated: August 20, 2014 23:46 IST

काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या

मुकेश इंगोले - दारव्हाकाँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि तालुक्यातील तरनोळीचे रहिवासी जगन कदम यांनी संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्षपद स्वीकारण्यास चक्क नकार दिला. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्या शिफारसीवरून त्यांची नियुक्ती झाली. मात्र उशिरा नियुक्ती मिळाल्याने नाराजी व्यक्त करत त्यांनी पद नाकारले. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात खळबळ उडाली आहे.निराधारांना आधार देणाऱ्या निराधार योजनेचे अध्यक्षपद गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहे. काँग्रेसमधील अंतर्गत भानगडीमुळे सदर पद इतके दिवस रिक्त होते. कुणाचीही नियुक्ती केली जात नव्हती. आता आघाडी सरकारचा कालावधी संपत आला असताना विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर जगन पाटील कदम यांच्या नियुक्तीचे आदेश धडकले. परंतु त्यांनी थोड्या दिवसासाठी उपकार नको म्हणत पद नाकारल्याची माहिती आहे.निराधार योजनेचे यापूर्वी बबनराव ठाकरे अध्यक्ष होते. परंतु त्यांचे निधन झाले. त्यामुळे पद रिक्त होते. या पदावर नियुक्ती करण्याची मागणी जगन कदम यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार माणिकराव ठाकरे यांच्याकडे केली. परंतु काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी त्यांना विरोध केल्याने ही नियुक्ती रखडली होती. आपल्याच तालुक्यातील पक्षांतर्गत वाद सोडविण्यात खुद्द प्रदेशाध्यक्षांना अपयश आल्याने महत्त्वाच्या समितीला तब्बल दीड ते दोन वर्ष अध्यक्षच मिळू शकला नाही.जगन कदम हे काँग्रेसचे निष्ठावान आणि ज्येष्ठ कार्यकर्ते आहे. या परिसरात त्यांची सज्जन राजकारणी म्हणून ओळख आहे. विशेष म्हणजे त्यांनी संपूर्ण हयात प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांचे कार्यकर्ते म्हणून घालविले आहे. लोकांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्यांची नेहमी धडपड असते. त्यातूनच त्यांनी अध्यक्षपदाची मागणी केली. या पदाच्या माध्यमातून निराधारांचा प्रश्न सोडविण्याचा त्यांचा मानस होता. तालुक्यातील अनेक गरीब, वृद्ध, विधवा यांना कोणताही आधार नाही. या योजनेतून त्यांना लाभ मिळवून देण्यासाठी कदम प्रयत्न करणार होते. परंतु काँग्रेसमधील अंतर्गत भानगडीमुळे पद रिक्त राहिले. वरिष्ठांनी हा प्रकार गांभीर्याने घेतला नाही. शेवटी आघाडी सरकारचा कालावधी संतप आला असताना अध्यक्षपदाच्या नियुक्तीचे पत्र आले. परंतु जगन कदम यांनी सदर पद स्वीकारण्यास स्पष्ट नकार दिला. आता निवडणुकीच्या तोंडावर पद घेवून काम काय करू, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.आपल्या तालुक्यातील व्यक्ती काँग्रेसचा प्रदेशाध्यक्ष व त्याच पक्षाचे राज्यात सरकार आहे. परंतु सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळत नसेल तर करायचे काय, असा प्रश्नही त्यांनी केला आहे. त्यामुळे तालुक्यात काँग्रेस गोटात एकच खळबळ उडाली आहे.