शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

बेवारस गुटखा घेतला ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2020 05:00 IST

लगतच्या एका नाल्यात गुटख्याचे अनेक पोते टाकण्यात आले. वाहात ही पोती माहूर व बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीत गेली. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यांनी अद्याप कोणतीच हालचाल केली नाही. महागाव पोलिसांनी मात्र राहूर रोडवरील नाल्यातून गुटख्याचे काही पोते व कट्टे ताब्यात घेतले. पोलिसांनी जवळपास ६८ हजार ९४0 रुपये किमतीचे १३ पोते ताब्यात घेतले.

ठळक मुद्देमहागाव पोलिसांची कारवाई

फुलसावंगी येथून जवळच असलेल्या नाल्यात व पैनगंगा नदीत मोठ्या प्रमाणात शुक्रवारी गुटखा मिळून आला. महागाव पोलिसांनी त्यांच्या हद्दीतील गुटखा नाल्याच्या बाहेर काढून ताब्यात घेतला आहे. पैनगंगा नदीतील घटनास्थळ बिटरगाव आणि माहूर ठाण्याच्या हद्दीत येते.लगतच्या एका नाल्यात गुटख्याचे अनेक पोते टाकण्यात आले. वाहात ही पोती माहूर व बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पैनगंगा नदीत गेली. मात्र या दोन्ही पोलीस ठाण्यांनी अद्याप कोणतीच हालचाल केली नाही. महागाव पोलिसांनी मात्र राहूर रोडवरील नाल्यातून गुटख्याचे काही पोते व कट्टे ताब्यात घेतले. पोलिसांनी जवळपास ६८ हजार ९४0 रुपये किमतीचे १३ पोते ताब्यात घेतले.पुढील कारवाईसाठी हे प्रकरण अन्न व औषध प्रशासन विभागाकडे सोपविण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक उमेश भोसले, जमादार माणिक पवार, जमादार विलास राठोड, होमहार्ड संदीप पवार यांच्या चमूने ही कारवाई केली. या गुटखा तस्करीचे तार आर्णीपर्यंत पोहोचत असल्याची चर्चा आहे. हा गुटखा फुलसावंगंी परिसरात कसा आला, कुठून आला, कोणी आणला, कोणी साठा केला, याबाबत विविध चर्चा आहे. कुणाच्या आशीर्वादाने प्रतिबंधीत गुटख्याची साठेबाजी करण्यात आली, हेसुद्धा कोडेच आहे. आता पोलीस प्रशासन आणि अन्न व औषध प्रशासन विभागापुढे तस्करांना शोधण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.हस्तकाकडे होता साठापैनगंगा नदी पात्रात गुटख्याची अनेक पोती आढळल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित करताच पोलीस यंत्रणा सक्रिय झाली. तस्करीशी संबंधितांकडून आर्णी येथील एका तस्कराचे नाव चर्चेत आले. हा गुटखा अनेक दिवसांपासून एका ‘हस्तका’कडे साठवलेला होता. लॉकडाऊनमुळे त्याची विल्हेवाट लावणे हस्तकाला गरजेचे झाले होते.त्या हस्तकाने गुटखा जाळण्याचा मुहूर्त शोधला होता. मात्र ठरल्यावेळी रात्री पोलीस विभागाच्या ‘बडा अधिकारी’ फुलसावंगी परिसरात येणार असल्याची टिप मिळाल्याने घाईगबडीत त्या हस्तकाने गुटखा नाल्यात फेकून दिल्याची चर्चा आहे. 

टॅग्स :Tobacco Banतंबाखू बंदी