ज्येष्ठागौरी भक्तांना दोन टन मोफत भाज्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2019 06:00 AM2019-09-07T06:00:00+5:302019-09-07T06:00:17+5:30

यवतमाळ भाजी मंडी मित्र परिवाराने मागील सात वर्षांपासून १६ भाज्या मोफत वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात यावर्षी कापडी पिशव्यांची भर पडली. दोन टन १६ भाज्या मोफत वाटण्यात आल्या. या कार्यात १५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. भाज्या मिळाव्या म्हणून पहाटपासूनच भक्तांची लांबच लांब रांग लागली होती.

Two tonnes of free vegetables to the Jyatshaguri devotees | ज्येष्ठागौरी भक्तांना दोन टन मोफत भाज्या

ज्येष्ठागौरी भक्तांना दोन टन मोफत भाज्या

Next
ठळक मुद्देभाजीमंडी मित्रपरिवाराचा उपक्रम : ग्रामीण भागातील नागरिकांनी नोंदविली उपस्थिती

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : ज्येष्ठा गौरी अर्थात महालक्ष्मीच्या पर्वावर लागणाऱ्या १६ भाज्या मिळविण्यासाठी भक्तांची प्रचंड फरपट होते. याचाच फायदा घेत भक्तांकडून अवास्तव पैसे आकारून भाज्यांची विक्री होत होती. याला आवर घालण्यासाठी भाजीमंडी मित्र परिवाराने १६ भाज्या मोफत वाटण्याचा निर्णय घेतला. शुक्रवारी १५ टन भाज्या मोफत वाटण्यात आल्या. यामुळे शेकडो भक्तांचा आर्थिक भार कमी झाला.
यवतमाळ भाजी मंडी मित्र परिवाराने मागील सात वर्षांपासून १६ भाज्या मोफत वाटण्याचा कार्यक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमात यावर्षी कापडी पिशव्यांची भर पडली. दोन टन १६ भाज्या मोफत वाटण्यात आल्या. या कार्यात १५० कार्यकर्त्यांनी सहभाग नोंदविला होता. भाज्या मिळाव्या म्हणून पहाटपासूनच भक्तांची लांबच लांब रांग लागली होती. त्यांना भाजीचे वितरण करण्यात आले.
याशिवाय महाप्रसादाकरिता लागणारी भाजी ५० टक्के कपात करून विकण्यात आली. सर्व मिळून १३ टन भाज्यांची विक्री झाली. उत्सवात तुटवडा पडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात भाजी मागविण्यात आली होती. भाजी मंडी मित्र परिवाराचे अध्यक्ष दिनेश मुराब, उपाध्यक्ष सुधीर चुट्टे, प्रकाश कैथवास यांच्यासह १५० भाजी विक्रेते, भाजी व्यावसायिकांची चमू या उपक्रमासाठी झटली. या उपक्रमाचे येथे स्वागत करण्यात येत आहे.
गोविंदा फाउंडेशनने दिले हार व पूजा साहित्य
गौरी पुजनाला हार अवास्तव दराने विकले जातात. यात भक्तांना आर्थिक भुर्दंड बसतो. यामुळे गोविंदा फाउंडेशनने पूजा साहित्य आणि हार वितरणाचा निर्णय घेतला. स्टेट बँक चौकात गौरी आराधनेसाठी हार आणि पूजा साहित्य वितरीत करण्यात आले. ५०१ भक्तांना साहित्य पुरविण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष दिनेश गोगरकर, अशोक पद्मावार, सागर कंचलवार, मिलिंद मुंजाळ, विवेक ठेंगरे, देविदास अराठे, नीलेश गंधे, संजय येरावार, संदीप येरावार, अतुल कपिले, नीलेश नारसे, जग्गू टोंपे, छोटू सवई, वैशाली सवई, संजय पिसाळकर आदी यावेळी उपस्थित होते.

Web Title: Two tonnes of free vegetables to the Jyatshaguri devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.