‘स्वावलंबन’साठी दोन हजार शेतकरी इच्छुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2019 06:00 AM2019-11-15T06:00:00+5:302019-11-15T06:00:13+5:30

डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत नवबौद्ध आणि अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना तर बिरसा मुंडा कृषीक्रांती योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहिर, जुनी विहिर दुरूस्ती, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण आणि पॅकेजकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते.

Two thousand farmers willing for 'self-reliance' | ‘स्वावलंबन’साठी दोन हजार शेतकरी इच्छुक

‘स्वावलंबन’साठी दोन हजार शेतकरी इच्छुक

Next
ठळक मुद्देनिवडले ३०० : ईश्वरचिठ्ठीने प्राधान्यक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजनेसाठी जिल्ह्यातील दोन हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अर्ज दाखल केले होते. यातील ३०० लाभार्थ्यांची ईश्वरचिठ्ठीने सोडत काढण्यात आली. त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला. इतर लाभार्थी वेटिंगवर आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजने अंतर्गत नवबौद्ध आणि अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांना तर बिरसा मुंडा कृषीक्रांती योजने अंतर्गत अनुसूचित जमातीच्या शेतकऱ्यांना नवीन विहिर, जुनी विहिर दुरूस्ती, शेततळ्याचे प्लास्टिक अस्तरीकरण आणि पॅकेजकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या योजनांसाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी २१९६ अर्ज दाखल केले होते. यामधील ३०० अर्जांची निवड गुरुवारी ईश्वरचिठ्ठीने करण्यात आली. त्याचा प्राधान्यक्रम निश्चित करण्यात आला. इतर शेतकऱ्यांच्या नावांची यादी वेटींगवर ठेवण्यात आली आहे.
स्थानिक सरपंच भवनात पार पडलेल्या सोडतीप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेश कुलकर्णी, कृषी अधीक्षक नवनाथ कोळपकर, कृषी विकास अधिकारी पंकज बर्डे, प्रकल्प कार्यालय प्रतिनिधी बडवाईक आणि राणे उपस्थित होते.

Web Title: Two thousand farmers willing for 'self-reliance'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.