दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2019 06:00 AM2019-11-13T06:00:00+5:302019-11-13T06:00:09+5:30

यवतमाळ शहरातील तीन लाख ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याचे मोठे उद्दिष्ट जीवन प्राधिकरणाकडे आहे. आजपर्यंत शहरात ५ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परतीचा पाऊस आणि आधी बरसलेल्या पावसाने निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे जीवन प्राधिकरणाने पाणीवाटपातील ‘गॅप’ कमी करण्याबाबत कामकाज सुरू केले आहे.

Two days ahead of water supply | दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन

दोन दिवसाआड पाणी पुरवठ्याचे नियोजन

googlenewsNext
ठळक मुद्देआठ कोटी रूपयांची थकबाकी : नवीन पाईपलाईनवरील कनेक्शन थांबविणार

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : जीवन प्राधिकरणाने दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यासाठी चाचण्या सुरू केल्या आहेत. वाघापूर टाकी वगळता इतर भागात यासंदर्भात अंमलबजावणी होणार आहे. यासोबतच शहरातील नवीन अंतर्गत पाईपलाईनवर नळजोडणी करताना थकबाकीदार ग्राहकांना रोखले जाणार आहे.
यवतमाळ शहरातील तीन लाख ग्राहकांना पाणीपुरवठा करण्याचे मोठे उद्दिष्ट जीवन प्राधिकरणाकडे आहे. आजपर्यंत शहरात ५ ते ७ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. परतीचा पाऊस आणि आधी बरसलेल्या पावसाने निळोणा आणि चापडोह प्रकल्पातील जलसाठ्यात वाढ झाली आहे. यामुळे जीवन प्राधिकरणाने पाणीवाटपातील ‘गॅप’ कमी करण्याबाबत कामकाज सुरू केले आहे. संपूर्ण शहरात पाणीवाटपाचे वेळापत्रक बदलवणे शक्य नाही. मात्र टाक्यांची क्षमता अधिक असणाऱ्या भागात दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याची चाचणी सुरू आहे. वाघापूर या मोठ्या टाकीवरून अधिक क्षेत्र असल्याने या ठिकाणी तीन दिवसाआड पाणीपुरवठा होणार आहे.
यामुळे गत अनेक दिवसांपासून मुबलक पाणी मिळावे म्हणून सतत ओरड करणाºया नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. मात्र हा बदल करण्यासाठी प्राधिकरणाला अवधी लागणार आहे.

३३ हजार ग्राहक
जीवन प्राधिकरणाच्या पाणी बिलाची थकबाकी ८ कोटींच्या घरात आहे. आता शहरात प्राधिकरण नवीन पाईपलाईनवर नळ कनेक्शन जोडणार आहे. हे कनेक्शन जोडताना प्रथम थकबाकी वसूल केली जाणार आहे. त्यानंतर कनेक्शन ट्रान्स्फर होणार आहेत.

पाणीपुरवठ्याच्या वेळापत्रकात बदल करण्याच्या दृष्टीने चाचपणी सुरू आहे. येत्या काही दिवसात यामध्ये फेरबदल पाहायला मिळतील.
- सुरेश हुंगे, कार्यकारी अभियंता, जीवन प्राधिकरण, यवतमाळ

Web Title: Two days ahead of water supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी