शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या 57 रुग्णांवर सुरू आहेत उपचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी राज्यातील कोविड सत्यस्थिती बाबत साप्ताहिक अहवाल जारी केला. या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट ०.४० एवढा आहे. अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्याचा हाच रेट ०.१९, अमरावती ०.३५, बुलडाणा १.७०, तर अकोला जिल्ह्याचा ०.९२ इतका आहे. ही आकडेवारी पाहता पाॅझिटिव्हीटी रेट कमी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आणखी प्रयत्नांची गरज आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : जिल्ह्यातील कोरोनाचा कहर कमी झाला असला तरी धोका अद्यापही संपलेला नसल्याचेच आरोग्य विभागाच्या अहवालावरून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या विभागाने बुधवारी दिलेल्या साप्ताहिक अहवालात यवतमाळ जिल्ह्यातील कोरोना चाचण्यांचे प्रमाण राज्याच्या सरासरी चाचणीच्या तुलनेत कमी असल्याचे नमूद केले आहे. त्याचवेळी जिल्ह्यात म्युकरमायकोसिसच्या ५७ रुग्णांवर उपचार सुरू असून आजवर या आजाराने जिल्ह्यातील चार जणांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले आहे. राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने बुधवारी राज्यातील कोविड सत्यस्थिती बाबत साप्ताहिक अहवाल जारी केला. या अहवालानुसार यवतमाळ जिल्ह्याचा पाॅझिटिव्हीटी रेट ०.४० एवढा आहे. अमरावती विभागातील वाशिम जिल्ह्याचा हाच रेट ०.१९, अमरावती ०.३५, बुलडाणा १.७०, तर अकोला जिल्ह्याचा ०.९२ इतका आहे. ही आकडेवारी पाहता पाॅझिटिव्हीटी रेट कमी करण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यात आणखी प्रयत्नांची गरज आहे. दुसरीकडे यवतमाळ जिल्ह्यात कोरोना चाचण्या मात्र राज्याच्या सरासरीपेक्षा कमी होत असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे. राज्यात प्रती दशलक्ष लोकसंख्येच्या तुलनेत तीन लाख ८७ हजार २२२ एवढ्या चाचण्या होत आहेत. त्या तुलनेत यवतमाळमध्ये दोन लाख १० हजार २८८ चाचण्या होत असल्याने या चाचण्या वाढविण्याची गरज आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेला हा अहवाल पाहिला असता जिल्ह्यात कोरोना चाचण्यांचे प्रमाण वाढविण्याची गरज आहे. त्याचवेळी लसीकरण मोहिमेलाही गती द्यावी लागणार आहे. राज्य शासनाच्या निर्देशानुसार ब्रेक दि चेन मोहिमेंतर्गत एकीकडे नियम शिथील केले जात असताना जिल्ह्यासमोर तिसऱ्या लाटेचेही संकट आहे. अशा स्थितीत जिल्हावासीयांनीही कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही, या अनुषंगाने नियमांचे पालन करण्याची गरज दिसून येते.

म्युकरमायकोसिसमुळे जिल्ह्यात चाैघांचा मृत्यू कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी जिल्ह्यात अजूनही म्युकरमायकोसिसचा धोका कायम असल्याचे या अहवालातून पुढे आले आहे. यवतमाळ जिल्ह्यात आजवर म्युकरमायकोसिसचे तब्बल ८६ रुग्ण आढळून आले आहे. त्यातील चार जणांचा मृत्यू झाला असून २५ रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. तर अद्यापही जिल्ह्यातील विविध रुग्णालयात म्युकरमायकोसिसच्या ५७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा अधिकच्या २८.२८ टक्के लाभार्थ्यांचेच लसीकरण- कोरोनाची संभाव्य तिसरी लाट लक्षात घेता जिल्ह्यात लसीकरण मोहिमेला गती देण्याची आवश्यकता आहे. जिल्ह्याची मध्यवार्षिक लोकसंख्या ३१ लाख ११ हजार ३९ एवढी गृहित धरली असता १८ वर्षांपेक्षा अधिकच्या २३ लाख १४ हजार ९२४ जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. मात्र, आजवर जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा अधिकच्या सहा लाख ५४ हजार ६९२ म्हणजेच २८.२८ टक्के लाभार्थ्यांनाच लस देण्यात आलेली आहे.

 

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्या