शहरं
Join us  
Trending Stories
1
वैभव सूर्यवंशीचा नवा विक्रम अन् नवे सेलिब्रेशन! ट्रॅविस हेडसह गिलख्रिस्टचा विक्रम मोडला (VIDEO)
2
उल्हासनगर मधील 'लेक व्ह्यू' इमारत पाडकामावेळी कोसळली, गेल्याच आठवड्यात केलेली रिकामी
3
बस्तर नक्षलमुक्त! अमित शाह म्हणाले- "छत्तीसगडच्या जनतेच्या मनातील भीती संपली, याचं श्रेय..."
4
RR vs LSG : वादळी खेळीनंतर कमनशिबी ठरला मिचेल मार्श; सलग दुसऱ्यांदा Run Out झाल्यामुळं हुकलं शतक
5
“काही झाले तरी अमेरिकेला शरण जाणार नाही”; ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतर इराणचे सडेतोड उत्तर
6
टेनिस बॉल स्टार कसा झाला टीम इंडियाचा शिलेदार? Prince Yadav च्या अविश्वसनीय प्रवासाची गोष्ट
7
"आंदोलन करा, पण रस्ते अडवून त्रास देऊ नका"; नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणावर सुप्रीम कोर्टाचे विधान
8
अनुभवी रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल वनडे संघात का नाहीत? सिलेक्टर अजित आगरकर स्पष्टच बोलला...
9
डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर आता पुतिन चीन दौऱ्यावर जाणार! शी जिनपिंग यांच्यासंदर्भात केलं मोठं विधान, म्हणाले...
10
Adhik Maas 2026: ‘श्री गजानन विजय’चे पारायण करा; महाराज सदैव साथ देतील, अनंत कृपा-लाभ होईल!
11
"दोन दिवसांत लोक कसे शांत होतात?"; नसरापूर अत्याचार प्रकरणावरून अमित ठाकरेंचा संताप
12
भारतीय शेअर मार्केटला वाईट दिवस! जगातील टॉप १०० कंपन्यांमधून RIL, HDFC आणि TCS बाहेर!
13
टीम इंडियाच्या वरिष्ठ संघात एन्ट्रीसाठी वैभव सूर्यवंशीच्या वाटेत ‘हा’ मोठा अडथळा; जाणून घ्या सविस्तर
14
Twisha Sharma : Video - ट्विशा शर्माचा पती समर्थ सिंह का झाला फरार, कधी येणार समोर? सासू गिरीबाला सिंहचा मोठा खुलासा
15
पंत, संजू सॅमसन बाहेर; नवख्या प्रिन्स यादव, गुरनूर ब्रारला संधी! BCCIचे ५ आश्चर्यकारक निर्णय
16
DCM एकनाथ शिंदे दिल्लीला रवाना; राजकीय घडामोडींना वेग, चर्चेला उधाण, नेमके घडतेय तरी काय?
17
भेदक गोलंदाजी, खालच्या फळीत जलद धावा करण्याची क्षमता; ६.५ फूट उंचीचा ऑलराउंडर टीम इंडियात!
18
"इंधन दर १७ रुपयांनी वाढले तरच...!", ब्रोकरेज फर्मनं मांडलं थक्क करणारं गणित; पेट्रोल-डिझेल आणखी भडकणार?
19
"रेवंत रेड्डी बनणार तेलंगणाचे 'शुभेंदु अधिकारी'!" भाजप खासदाराची भविष्यवाणी, केला मोठा दावा; काँग्रेसचं टेन्शन वाढणार 
20
मोहम्मद शमीचं आंतरराष्ट्रीय करिअर संपलं? "आम्ही त्याचा विचारच केला नाही..." आगरकर नेमकं काय म्हणाले?
Daily Top 2Weekly Top 5

फुलसावंगी ते नांदेडचे प्रवास भाडे चक्क चार लाख !

By admin | Updated: January 29, 2016 05:09 IST

चोरट्यांनी फुलसावंगीतून नांदेड रेल्वे स्थानकावर सुखरुप पोहोचवून देणाऱ्या आपल्या साथीदाराला चक्क चार लाख

महागाव : चोरट्यांनी फुलसावंगीतून नांदेड रेल्वे स्थानकावर सुखरुप पोहोचवून देणाऱ्या आपल्या साथीदाराला चक्क चार लाख रुपये इंडिकाचे प्रवास भाडे दिल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला आहे. चोरीतील पैशाच्या या उधळपट्टीची पोलीस दलात चांगलीच चर्चा आहे.
फुलसावंगी येथील कापसाचे व्यापारी संदेश मुत्तेपवार यांच्याकडे ८ जानेवारी रोजी २७ लाख रुपये रोख व दोन तोळे सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली होती. या धाडसी चोरी मागे फुलसावंगीतीलच बाबर खॉ शाहदत खॉ (३०) याच्या टोळीचा हात असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने सर्वप्रथम प्रकाशित केले होते. या प्रकरणी पोलिसांनी अयजोद्दीन उर्फ लखू अयसोद्दीन नवाब (२०) याला मुंबईच्या डोंबिवली पूर्व येथील आरेगाव भागातून एका साध्या घरात अटक केली. त्याच्याकडून चार हजार रुपये व मुंबईतील जीमखान्याची पावती जप्त करण्यात आली. तो जीमचा शौकीन असल्याचे सांगितले जाते. न्यायालयाने लखूला सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्याच्या बयानाने २७ लाखांच्या या चोरीची साखळीच उघड झाली. लखूचा थेट चोरीत सहभाग नव्हता. मात्र आरोपींना आपल्या इंडिकाने सुरक्षित पोहोचविण्याची जबाबदारी त्याच्याकडे होती. या गुन्ह्यात एम.एच.२९-व्ही-८३८२ क्रमांकाची इंडिका वापरली गेली.
घटनेच्या रात्री लखूच्या इंडिकामधून टोळीचा सूत्रधार बाबर नांदेड रेल्वे स्थानकावर पोहोचला. या प्रवासात त्याने उमरखेडवरून एका साथीदारालाही सोबत घेतले होते. रेल्वे स्थानकावर सोडताच बाबरने चोरीतील २७ लाखांच्या रकमेतून हाती आलेले चार लाख रुपये लखूला प्रवास भाडे म्हणून दिले. लखूने ही रक्कम आपला साथीदार अशरफ खा शाहदत खा याला दिली होती. ती रक्कम त्याने आपल्या शेतातील कुटाराच्या पोत्यात लपवून ठेवली होती. यातील तीन लाख ७७ हजार रुपयांची रक्कम महागाव पोलिसांनी बुधवारी रात्री व्हीडीओ चित्रीकरणात त्या शेतातून जप्त केली.
लखूने या गुन्ह्यात अशरफ खॉ शाहदत खा याचा सहभाग असल्याचे सांगितले. बाबर खॉ आणि सोहेलोद्दीन सफरोद्दीन नवाब हे यातील प्रमुख आरोपी आहे. ते अद्याप फरार आहे. पोलीस त्यांच्या मागावर आहे. या प्रकरणात आतापर्यंत दोन आरोपी अटक झाले असून इंडिका गाडी जप्त करण्यात आली आहे.
या गुन्ह्यातील सर्व आरोपी घटनेपासून एकमेकांच्या संपर्कात होते. मात्र ते क्वॉईन बॉक्सचा वापर करीत असल्याने पोलिसांना सुरुवातीला त्यांचे औरंगाबादचे लोकेशन मिळाले होते. मात्र तेथून पथक रिकाम्या हाताने परतले होते. या टोळीचा म्होरक्या बाबर हा मुंबईतच दबा धरुन असावा असा संशय महागावचे ठाणेदार प्रकाश शेळके यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.
जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंह, पुसदच्या उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार प्रकाश शेळके, दुय्यम ठाणेदार एस.डी. गोसावी, नितीन चरडे, आनंद चंदेवाड, सुनील पंडागळे, युवराज जाधव आदींनी ही कामगिरी केली. (शहर प्रतिनिधी)