लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:50 IST2021-09-17T04:50:17+5:302021-09-17T04:50:17+5:30

सोनूपोड येथील २० वर्षीय युवती तीन वर्षांपूर्वी जळका पोड ता.मारेगाव येथील मावशीच्या घरी गेली होती. यादरम्यान आरोपी दिनेश माणिक ...

Torture by showing the lure of marriage | लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

सोनूपोड येथील २० वर्षीय युवती तीन वर्षांपूर्वी जळका पोड ता.मारेगाव येथील मावशीच्या घरी गेली होती. यादरम्यान आरोपी दिनेश माणिक गजरे याच्यासोबत तिची ओळख झाली. या ओळखीतून त्याने युवतीशी प्रेमसंबंध जुळवत तिचे शारीरिक शोषण केले. अशातच १४ सप्टेंबर रोजी दिनेशने तिला रात्री ९ वाजताच्या दरम्यान फोन करून गावाबाहेर भेटायला बोलाविले आणि नेहमीप्रमाणे शरीरसुखाची मागणी केली. मात्र पीडितेने नकार देताच बळजबरीने शेतात नेऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. पीडित मुलीने लग्नाची गळ घातली असता, त्याने लग्नास नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने याबाबत मारेगाव पोलिसात तक्रार दाखल केली. त्यावरून आरोपीविरोधात भादंवि कलम ३७६, ३७६ (२) (जे) (एन) नुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली व त्याची कारागृहात रवानगी केली.

Web Title: Torture by showing the lure of marriage