शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
2
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
3
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
4
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
5
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
6
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
7
"तुम्ही चाट पडाल पण मोदींनी पुतीनला फोन लावला अन्..."; अजित पवारांनी केलं पंतप्रधानांचे कौतुक
8
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
9
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
10
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
11
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
12
संजय राऊतांची प्रकाश आंबेडकरांवर बोचरी टीका; "ते महिलेचा अपमान करत असतील तर..."
13
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
14
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं
15
Income Tax नियमांमध्ये बदल होणार आहेत का? शेअर बाजारही आपटला; अर्थमंत्र्यांनी दिली प्रतिक्रिया
16
माझ्या कामातून, सेवेतून जनतेचा विश्वास सार्थ करून दाखवेन; सुनेत्रा पवारांचं आवाहन
17
T20 World Cup साठी अमेरिकेचा संघ जाहीर; भारताच्या विश्वविजेत्या कर्णधाराला डच्चू
18
एल्विश यादव पुन्हा अडचणीत! सापाचं विष प्रकरणानंतर आता मनी लॉड्रिंग केस, ED करणार चौकशी
19
Ravi Pradosh 2024: कोर्ट कचेऱ्या आणि कौटुंबिक वादातून सुटका मिळावी म्हणून करा रवी प्रदोष व्रत!
20
केंब्रिजमधून M. Phil, राहण्यासाठी घर नाही, स्वत:ची कारही नाही, एवढी आहे राहुल गांधींची संपत्ती 

प्रेमाच्या जाळ्यात ओढून शाळकरी मुलीवर अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 3:52 PM

Yawatmal news १० वीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली व नंतर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली.

ठळक मुद्दे फेसबुकच्या माध्यमातून झाली मैत्रीमारेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क 

यवतमाळ  : १० वीत शिकत असलेल्या एका विद्यार्थिनीशी फेसबुकच्या माध्यमातून मैत्री केली व नंतर तिच्यावर अत्याचार केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील गोंडबुरांडा येथे घडली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तालुक्यातील गोंडबुरांडा येथील १०वीच्या वर्गात शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीला घरची परिस्थिती हलाखीची असतानाही, तिच्या पालकांनी ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाइल विकत घेऊन दिला. दरम्यान, पीडित विद्यार्थिनीची फेसबुकच्या माध्यमातून रोहपट येथील एका तरुणासोबत ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले.

२४ डिसेंबर, २०२० रोजी आरोपीने गोंडबुरांडा येथे येऊन तिच्या आजोबाच्या शेतात तिला बोलविले व तेथे तिच्यावर ब‌ळजबरीने अत्याचार केला. त्यानंतर, १८ जानेवारीला सोमवारी पुन्हा आरोपीने पीडितेला मोटारसायकलवर गावाबाहेर घेऊन गेला व तेथेही तिच्यावर अत्याचार केला. रात्री उशिरा तिला घरी सोडून दिले. कुटुंबीयांनी मुलीला शाळेतून रात्री उशिरा येण्याचे कारण विचारले असता, पीडितेने आपबिती कथन केली. प्रकरणी बुधवारी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीस पोलिसांनी पोक्सोअंतर्गत विविध गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुज्जलवार यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार जगदिश मंडलवार, उपनिरीक्षक अमोल चौधरी, जमादार मनोज बडोलकर करीत आहेत.

टॅग्स :Facebookफेसबुक