तीन अस्वलांचा शेतकऱ्यावर हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 17, 2020 06:00 AM2020-02-17T06:00:00+5:302020-02-17T06:00:27+5:30

बिबिचंद पवार शेतात आपल्या बैलांना पाणी पाजत असताना त्यांच्यावर अस्वलांनी अचानक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या या शेतकऱ्याने जीव वाचविण्यासाठी अस्वलाच्या डोक्यावर जोरदार पायाने प्रहार केला. त्यामुळे मोठे अस्वल माघारी फिरले. त्याच्यासोबतच्या दोन पिलांनीही जंगलात पळ काढला. बिबिचंद यांना प्रथम उमरखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Three bears attack farmers | तीन अस्वलांचा शेतकऱ्यावर हल्ला

तीन अस्वलांचा शेतकऱ्यावर हल्ला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बिजोरा : जंगलालगत शेतात काम करीत असलेल्या शेतकऱ्यावर तब्बल तीन अस्वलांनी हल्ला केला. रविवारी दुपारी महागाव तालुक्यातील घानमुख शिवारात ही घटना घडली. बिबिचंद बालू पवार (४१) असे गंभीर जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
बिबिचंद पवार शेतात आपल्या बैलांना पाणी पाजत असताना त्यांच्यावर अस्वलांनी अचानक हल्ला केला. गंभीर जखमी झालेल्या या शेतकऱ्याने जीव वाचविण्यासाठी अस्वलाच्या डोक्यावर जोरदार पायाने प्रहार केला. त्यामुळे मोठे अस्वल माघारी फिरले. त्याच्यासोबतच्या दोन पिलांनीही जंगलात पळ काढला. बिबिचंद यांना प्रथम उमरखेड येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. नंतर नांदेड येथे हलविण्यात आले. सदर घटनेची माहिती वनविभागाला देण्यात आली. शेतकºयाच्या दंडाचे लचके तोडले असून डोक्यालाही जबर मार आहे.

महिनाभरापासून त्रास
मुडाणा वर्तुळात गेल्या महिनाभरापासून वारंवार वन्यप्राण्यांचे हल्ले होत आहे. यापूर्वीही राजुरा येथील आत्माराम ठाकरे हा शेतमजूर जखमी झाला. मात्र वनविभागाकडून अद्यापही मदत मिळालेली नाही.

Web Title: Three bears attack farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Farmerशेतकरी