शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
3
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
4
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
5
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
6
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
7
विशेष लेख: नॉनस्टॉप ७० तास गेमिंग! खाणं, झोपणं तिथेच!
8
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
9
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
10
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
11
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
12
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
13
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
14
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
15
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
16
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
17
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
18
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
19
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
20
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
Daily Top 2Weekly Top 5

चोर पोलिसांचा खेळ ! चोर सापडतात, चोरीचा माल का नाही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 22, 2021 05:00 IST

जबरी चोरीतील ५० टक्के मुद्देमाल मिळाला आहे. तर चोरीच्या गुन्ह्यातील ५६ टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बरेचदा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना चोर तत्काळ सापडून जातो, मात्र त्यातील मुद्देमाल मिळत नाही. चोर-पोलिसांचा हा खेळ सातत्याने सुरू असतो. जोपर्यंत चोरीचा मुद्देमाल मिळत नाही तोपर्यंत चोराला न्यायालयात दोषी ठरविणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरही लवकरच कारागृहाबाहेर पडतात.

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात व तालुक्यात सातत्याने घरफोडी व चोरीचे गुन्हे घडतात. सात महिन्यात जबरी चोरीचे १३ गुन्हे, घरफोडीच्या ३७ घटना तर चोरीचे १८० गुन्हे दाखल झाले. यातील घरफोडीच्या गुन्ह्यात केवळ सात टक्के मुद्देमाल पोलिसांना हस्तगत करण्यात आला आहे. जबरी चोरीतील ५० टक्के मुद्देमाल मिळाला आहे. तर चोरीच्या गुन्ह्यातील ५६ टक्के मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला. बरेचदा चोरीच्या गुन्ह्यात पोलिसांना चोर तत्काळ सापडून जातो, मात्र त्यातील मुद्देमाल मिळत नाही. चोर-पोलिसांचा हा खेळ सातत्याने सुरू असतो. जोपर्यंत चोरीचा मुद्देमाल मिळत नाही तोपर्यंत चोराला न्यायालयात दोषी ठरविणे शक्य होत नाही. त्यामुळे चोरही लवकरच कारागृहाबाहेर पडतात.

लूट लाखोंची...

अडीच लाखांची वाटमारीयेथील आर्णी मार्गावर होमगार्ड कार्यालयाजवळ सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या युवकाला पाच आरोपींनी थांबवून चाकूचा धाक दाखवित अडीच लाख रुपयांची रोख रक्कम उडविली. हा गुन्हा अद्यापही उघडकीस आलेला नाही. 

महिलांची टोळी जेरबंद  येथील दत्त चौकातील ज्वेलर्सच्या दुकानात गर्दीचा फायदा घेत महिलेच्या पर्समधून रोख रक्कम काढण्यात आली होती. या गुन्ह्याचा अवधूतवाडी पोलिसांनी शोध लावला. चोरी करणाऱ्या पाच महिलांची टोळीच जेरबंद केली. त्यांच्याकडून इतर गुन्हे उघड झाले नाही. 

११ आरोपी अटक होऊनही मुद्देमाल मिळाला नाही  येथील पांढरकवडा रोडवर घरात दरोडा टाकण्यात आला. या गुन्ह्यात २८ हजारांचा मुद्देमाल चोरी गेला. पोलिसांनी हा गुन्हा उघड केला. यात ११ आरोपींना अटकही झाली. मात्र चोरी गेलेला मुद्देमाल अजूनही पोलिसांच्या हाती लागलेला नाही. गुन्हा उघड होऊनही मुद्देमालाचा शोध कायम आहे. 

५६ टक्के मुद्देमाल आणण्यात यश

चोरीच्या गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यावर भर दिला जातो. गुन्ह्याची कबुली मिळूनही पोलीस तपास थांबत नाही. याची टक्केवारी आणखी वाढविण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.     - डाॅ. खंडेराव धरणे, अपर पोलीस अधीक्षक

 

टॅग्स :PoliceपोलिसThiefचोर