शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
2
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
3
'एकरकमी पैसे घ्या आणि नोकरी सोडा' Microsoft नं हजारो कर्मचाऱ्यांना का म्हटलं असं?
4
मराठी सक्तीवरून शिंदेसेनेत २ गट, संजय निरुपमांचा थेट विरोध; "७० टक्के रिक्षाचालक परप्रांतीय..."
5
मंत्र्यांच्या पगारात कपात, कर्मचाऱ्यांची चांदी! प्रलंबित पेन्शनसाठी 'या' सरकारचा ऐतिहासिक निर्णय
6
८ महिने ८ दिशांनी चौफेर चौपट लाभ, लक्षणीय नफा; अनपेक्षित पैसा, १० राशींबाबत मोठी भविष्यवाणी!
7
गुरु शुक्र युती २०२६: १२ वर्षांनी जुळून येतोय 'गजलक्ष्मी राजयोग'! गुरू शुक्र युती 'या' राशींसाठी सुवर्णकाळ!
8
मार्कशीट गहाण ठेवून ऑनलाईन गेममध्ये जिंकला ५ लाख; राहुल मीणाबाबत खळबळजनक खुलासा
9
महाराष्ट्रात ‘मराठी’ अनिवार्य हे कायमच लक्षात असू द्या; अमित ठाकरेंचा मध्य रेल्वे प्रशासनाला इशारा
10
ATS ची मोठी कारवाई! पाकिस्तानी गँगस्टर्स, ISI साठी काम करणाऱ्या २ दहशतवाद्यांना अटक
11
IPL 2026: MS Dhoni यंदा एकही सामना खेळू शकणार नाही? CSKच्या कोचने सांगितली सत्य परिस्थिती
12
पहिल्याच सीरिजमध्ये दिला किसींग सीन, काजोलने इतक्या वर्षात का मोडला तिचाच नियम? म्हणाली...
13
कडक उन्हाळ्यातही टिफिनमधील अन्नपदार्थ होणार नाहीत खराब, फक्त अशाप्रकारे करा पॅक
14
Silver मध्ये २३०० रुपयांपेक्षा अधिक घसरण; Gold देखील झालं स्वस्त; पाहा काय आहेत सोन्या-चांदीची नवी किंमत?
15
“संजय गायकवाडांवर गुन्हा दाखल करा”; विजय वडेट्टीवारांची मागणी, CM देवेंद्र फडणवीसांना पत्र
16
पत्र्याच्या शेड उडाल्या, झाडे कोसळली; सावंतवाडीत अवकाळी पावसाने उडवली दाणादाण, मोठ्या प्रमाणात नुकसान
17
बेस्ट आहे Post Office ची ‘ही’ स्कीम; केवळ व्याजातून होईल ₹१२,००,००० पेक्षा जास्त कमाई
18
TECH सेक्टरमध्ये खळबळ! Meta-Microsoft च्या प्लॅननं २३००० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात
19
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
20
पहिले मुलांसाठी दिले ₹५२ हजार कोटी; आता रुग्णालयाला ६९०० कोटींचं दान, पाहा कोण आहे हे दांपत्य?
Daily Top 2Weekly Top 5

सखी सन्मान पुरस्कार प्रस्तावांचे ज्युरीज मंडळाकडून परीक्षण

By admin | Updated: October 22, 2016 01:37 IST

लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित सखी सन्मान पुरस्कारासाठी आमंत्रित प्रस्तावांचे विविध क्षेत्रातील नामवंत ज्युरीजने परीक्षण केले

यवतमाळ : लोकमत सखी मंचच्यावतीने आयोजित सखी सन्मान पुरस्कारासाठी आमंत्रित प्रस्तावांचे विविध क्षेत्रातील नामवंत ज्युरीजने परीक्षण केले. या प्रस्तावातून विविध गटातील कर्तृत्ववान महिलांची निवड करण्यात आली. शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत महिलांचे प्रस्ताव एका पेक्षा एक सरस होते. तब्बल १८ प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावाचे परीक्षण अमोलकचंद महाविद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य शंकरराव सांगळे आणि यवतमाळच्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. प्रशांत गावंडे यांनी केले. ग्रामीण भागात शैक्षणिक कार्यासाठी वाहून घेणाऱ्या महिलांचे कर्तृत्व पुढे आले. जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रातील अनेकांनी क्रीडा गटासाठी प्रस्ताव पाठविले होते. या प्रस्तावांचे परीक्षण अभ्यंकर कन्या शाळेचे क्रीडा शिक्षक आणि खो-खोचे वरिष्ठ प्रशिक्षक अविनाश जोशी आणि यवतमाळ जिल्हा कराटे असोसिएशनचे सचिव आणि कराटेचे नामवंत प्रशिक्षक आनंद भुसारी यांनी केले. व्यावसायिक-औद्योगिक क्षेत्रातही महिला कुठे मागे नसल्याचे प्राप्त झालेल्या प्रस्तावावरून दिसून आले. या प्रस्तावांचे परीक्षण यवतमाळ येथील उद्योजक आणि रासुरा तेलाचे निर्माते अशोक बन्सोड यांनी केले. आरोग्य या विषयात शहरी आणि ग्रामीण भागात कार्यरत महिलांचे अनेक प्रस्ताव प्राप्त झाले. या प्रस्तावांचे परीक्षण यवतमाळातील प्रसिद्ध शल्यचिकित्सक आणि समाजसेवी डॉ. विजय कावलकर आणि प्रसिद्ध किडनी विकार तज्ज्ञ डॉ. आशिष तावडे यांनी केले. शौर्य या गटासाठी विविध क्षेत्रात अतुलनीय कार्य करणाऱ्या महिलांचे प्रस्ताव प्राप्त झाले होते. या प्रस्तावातून यवतमाळ जिल्ह्यातील महिला कुठेही कमी नाही, हेच दिसून आले. या प्रस्तावांचे परीक्षण यवतमाळचे उपविभागीय पोलीस अधिकारी पीयूष जगताप यांनी केले. जीवनगौरव पुरस्कारासाठी यवतमाळ जिल्ह्यातील एका सेवाव्रती महिलेची निवड करण्याचे दिव्यही या ज्युरीज मंडळाला पार पाडावे लागले. सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य, क्रीडा अशा क्षेत्रात असामान्य ते सामान्य प्रवास करणाऱ्या महिलेची जीवनगौरव पुरस्कारासाठी निवड करणे तेवढे सोपे काम नव्हते. परंतु हे काम ज्युरीज मंडळाने लिलया पार पाडले. निवडलेल्या पुरस्कार प्राप्त महिलांचा गौरव २३ आॅक्टोबर रोजी मेळघाटात आंतरिक तळमळीतून वैद्यकीय सेवा देणारे डॉ. रवींद्र व डॉ. स्मीता कोल्हे, महिला अत्याचार आणि समस्यांविरुद्ध लढा उभारणाऱ्या अमरावतीच्या रजिया सुलताना आणि यवतमाळ जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉ. आरती फुपाटे यांच्या हस्ते होणार आहे. या सोहळ्याला यवतमाळ जिल्ह्यातील सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन लोकमत सखी मंचच्या जिल्हा प्रमुख सीमा दर्डा यांनी केले आहे. (नगर प्रतिनिधी)