शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
नांदेड विमानतळ परिसरात ‘गूढ गोलाकार वस्तू’! उडती तबकडी की साधा बलून?
4
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
5
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
6
बाबासाहेबांनी ध्वनी प्रदूषणाचे कधीच समर्थन केले नसते, हायकोर्टाने समाजाला विचार व तत्वज्ञानाची जाणिव करून दिली
7
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
8
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
9
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
10
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
11
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
12
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
13
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
14
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
15
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
16
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
17
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
18
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
19
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
20
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणा सीमा सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2020 06:00 IST

सीमेवर तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तेलंगणातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणार आहे. त्यांची हिस्ट्री जाणून घेतली जाणार आहे. विदेशातून कोणी आले आहे काय, त्यांना ताप आहे काय, यासह विविध बाबींची खात्री केल्यानंतर प्रवाशांना यवतमाळच्या रस्त्यांवर पुढचा प्रवास करता येणार आहे.

ठळक मुद्देप्रवाशांची तपासणी : परदेशातून आलेले २० जण वसतिगृहात क्वॉरंटाईन

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी तेलंगणाची सीमा सील करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहे. या राज्यातून जिल्ह्यात प्रवेश करणाऱ्या वाहनांची तपासणी केली जाणार आहे. कोरोनाबाधित नसल्याची खात्री पटल्यानंतरच तेलंगणातील प्रवाशांना यवतमाळात प्रवेश मिळणार आहे.या सीमेवर तलाठी, मंडळ अधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांचे पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक तेलंगणातून येणाऱ्या प्रवाशांना तपासणार आहे. त्यांची हिस्ट्री जाणून घेतली जाणार आहे. विदेशातून कोणी आले आहे काय, त्यांना ताप आहे काय, यासह विविध बाबींची खात्री केल्यानंतर प्रवाशांना यवतमाळच्या रस्त्यांवर पुढचा प्रवास करता येणार आहे. या मार्गावरील प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाणार आहे.मुंबई आणि नागपूर विमानतळावर उतरलेल्या २० जणांना होम क्वॉरंटाईन करण्यात आले. होम क्वॉरंटाईन झालेल्या नागरिकांपैकी काही रस्त्यावर दिसल्याची माहिती पुढे आली आहे. अशा नागरिकांना धामणगाव मार्गावरील वसतिगृहात निर्माण केलेल्या कक्षात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम.डी. सिंह यांनी दिले.तीन विवाह पाहुण्यांशिवायगुरूवारी शहरात तीन विवाह आयोजित होते. मात्र १४४ कलम लागू असल्याने या विवाहांचे नियोजित ठिकाण रद्द करण्यात आले. वधु, वर आणि आईवडील, भाऊ, बहीण यांच्या उपस्थितीत हे लग्न उरकविण्यात आले. यावेळी वर आणि वधूनेही चेहऱ्याला मास्क लावले होते.चर्चमध्ये प्रार्थना थांबलीयवतमाळच्या मातृचर्चमध्ये होणारी सामूहिक प्रार्थना कोरोनाच्या धास्तीने थांबविण्यात आली आहे. कोरोनाचा धोका टळेपर्यंत प्रार्थना होणार नसल्याचे मातृचर्चच्या वतीने सांगण्यात आले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसmarriageलग्न