शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचं नेपाळला रोखठोक उत्तर, लिपुलेखमार्गे मानसरोवर यात्रेला केला होता विरोध
2
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
3
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
4
CSK ला मोठा धक्का! पदार्पणात चमकलेल्या ऑलराउंडरचा पाय फ्रॅक्चर; तो उर्वरित स्पर्धेतून बाहेर
5
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
6
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
7
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
8
कोल्हापूर जिल्ह्यात नीट परीक्षेत गोंधळ, विद्यार्थ्यांचे नुकसान झाल्याची पालकांची तक्रार; नेमकं काय घडलं?
9
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
10
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
11
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
12
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
13
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
14
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
15
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
16
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
17
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
18
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
19
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
20
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
Daily Top 2Weekly Top 5

उद्दिष्ट तीन हजाराचे; होतात केवळ पाचशे चाचण्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2021 05:00 IST

संभाव्य धोका कायम आहे. हा बदल लवकर लक्षात यावा, यासाठी जिल्ह्यात दिवसाला तीन हजार कोरोना तपासण्या करण्याचे टार्गेट दिले आहे. प्रत्यक्षात मात्र ५०० ते १००० पर्यंतच नमुने संकलित होतात. कधी कधी तर २५० ते ३०० नमुने तपासले जातात. त्यामुळे कोरोनाची कमी झालेली रुग्णसंख्या कमी तपासणीचा परिणाम तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.  तपासण्या थांबल्यामुळे डेल्टा प्लस संसर्गाचा अंदाज चुकू शकतो.

ठळक मुद्देडेल्टा प्लसला रोखणार कसे ? : प्रार्दूभाव वाढण्याचा धोका कायम; नागरीकांनी खबरदारी घेण्याची गरज

सुरेंद्र राऊतलोकमत न्यूज नेटवर्क यवतमाळ : जिल्ह्यात आतापर्यंत डेल्टा प्लसच्या संसर्गाचे १५ च्यावर रुग्ण आढळले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणाही झाली. मात्र, संभाव्य धोका कायम आहे. हा बदल लवकर लक्षात यावा, यासाठी जिल्ह्यात दिवसाला तीन हजार कोरोना तपासण्या करण्याचे टार्गेट दिले आहे. प्रत्यक्षात मात्र ५०० ते १००० पर्यंतच नमुने संकलित होतात. कधी कधी तर २५० ते ३०० नमुने तपासले जातात. त्यामुळे कोरोनाची कमी झालेली रुग्णसंख्या कमी तपासणीचा परिणाम तर नाही ना, अशी शंका उपस्थित होत आहे.  तपासण्या थांबल्यामुळे डेल्टा प्लस संसर्गाचा अंदाज चुकू शकतो. यामुळे अचानक गंभीर परिस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. स्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी निर्धारित तपासण्यांमध्ये सातत्य ठेवणे गरजेचे झाले आहे. 

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग

कोरोनाचे रुग्ण दिवसाला २ किंवा ५ इतक्याच संख्येत आढळत आहेत. त्यामुळे काॅन्टॅक्ट ट्रेसिंग अगदी सोपे झाले आहे. त्यातही वर्गवारी करत हायरिस्कमध्ये असलेले आणि कमी रिस्कमध्ये असलेले अशांचे नमुने तपासणीसाठी घेतले जात आहेत. जेणेकरून फैलाव थांबविता येईल.

ग्रामीण भागावर अधिक लक्ष

ग्रामीण भागातील गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष दिले जात आहे. आरोग्य केंद्रांमध्ये आलेल्या तापाच्या रुग्णांचे नमुने घेतले जात आहे. यातून कोरोनावर लक्ष आहे.

आठवडी बाजार व इतर परिसरात नमुने तपासणीचा कॅम्प लावण्याच्या सूचना आहेत. प्रत्यक्षात मात्र याची अंमलबजावणी होताना कुठेच दिसत नाही.

कोठे, काय घेतली जात आहे दक्षता?

बसस्थानक - यवतमाळ शहरासह जिल्ह्यातील सोळाही तालुक्याच्या ठिकाणी कुठेच बसस्थानकावर कोरोना तपासणीची सुविधा नाही. ही मोहीम अनेक दिवसांपासून बंद आहे. 

आठवडीबाजार - शहरासह ग्रामीण भागात सर्वाधिक गर्दी आठवडीबाजारांमध्ये होते. येथे पूर्वी तपासणी केली जात होती. आता तेथेसुद्धा नमुने घेतले जात नाही.

पर्यटनस्थळ - सध्या पावसामुळे शहरासह ग्रामीण भागात अनेक पर्यटनस्थळ आकर्षणाचे केंद्र बनले आहे. येथे गर्दी होते. मात्र तपासणीसाठी कोणतीच यंत्रणा तेथे नाही.

शहरातील एन्ट्री पॉईंट - शहराच्या एन्ट्री पाॅईंटवर सुरुवातीचे काही दिवस कोरोना तपासणी केली जात होती. आता तेथील ही मोहीम बंद करण्यात आली आहे. 

सुपर स्प्रेडरला केले आहे टार्गेटकोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आला असून, सध्या आता अनेकांच्या संपर्कात येणाऱ्या सुपर स्प्रेडरवरच लक्ष केंद्रित केले आहे. गर्दीच्या ठिकाणे, बाजारपेठ, शासकीय कार्यालये येथे तपासणी केली जाते. याशिवाय काॅन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू आहे.          - डाॅ. प्रल्हाद चव्हाण, डीएचओ

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या