यवतमाळ : यवतमाळ तालुक्यातील बोरिसिंह येथे अनैतिक संबंधाच्या संशयातून सख्ख्या चुलत भावानेच २२ वर्षीय तरुणाचा कुऱ्हाडीने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली. या प्रकरणात आरोपीला पोलिसांनी अटक केली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
आशिष उर्फ कृष्णा खंडूजी कांबळे (वय २२, रा. बोरिसिंह) याचे आरोपी पांडुरंग प्रल्हाद कांबळे (वय ४०) यांच्या पत्नीशी मागील एक वर्षापासून अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. विशेष म्हणजे मृतक व आरोपी हे सख्खे चुलत भाऊ असल्याने या घटनेने नात्यालाच काळिमा फासला आहे.
या संशयातून संतापाच्या भरात आरोपीने टोकाचे पाऊल उचलत घटनेच्या दिवशी आशिष घराच्या छतावर झोपेत असताना त्याच्यावर कुऱ्हाडीने गळ्यावर, पाठीवर व हातावर वार करून त्याचा जागीच खून केला. दरम्यान, अंधारात आशिष समजून आरोपीने त्याचा मोठा भाऊ शरद खंडूजी कांबळे (वय २९) याच्यावरही कुऱ्हाडीने वार केले. या हल्ल्यात शरद जखमी झाला असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच वडगाव जंगल पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. आरोपी पांडुरंग कांबळे याला पोलिसांनी अटक केली असून, मृतक आशिष कांबळे याचा खून व शरद कांबळे याच्या खुनाचा प्रयत्न या गुन्ह्यांतर्गत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार विकास दांडे करीत आहेत. या घटनेमुळे बोरिसिंह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
Web Summary : In Yavatmal, a man murdered his cousin, suspecting an affair with his wife. The victim was attacked with an axe while sleeping. The assailant also injured his own brother. Police have arrested the accused; investigation underway.
Web Summary : यवतमाल में, एक व्यक्ति ने अपनी पत्नी के साथ अवैध संबंध के शक में अपने चचेरे भाई की हत्या कर दी। सोते समय युवक पर कुल्हाड़ी से हमला किया गया। आरोपी ने अपने भाई को भी घायल कर दिया। पुलिस ने आरोपी को गिरफ्तार कर लिया है; जांच जारी है।