शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
4
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
5
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
6
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
7
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
8
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
9
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
10
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
11
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
12
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
13
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
14
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
15
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
16
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
17
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
18
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
19
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
20
कलिंगडाकडे ग्राहकांनी फिरवली पाठ! मुंबईतील दुर्घटनेनंतर कलिंगडाचा १२ ट्रक माल पडून
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ शेतकऱ्याचे मन वळविण्यात अखेर यश

By admin | Updated: October 8, 2015 02:08 IST

हाताला काम नाही, वडिलोपार्जित शेतही दुसऱ्याच्या नावावर अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या तालुक्यातील आरंभी येथील एका शेतकऱ्याचे मन वळविण्यात प्रशासनाला यश आले.

आत्महत्येची मागितली होती परवानगी : दिग्रस तहसीलदारांनी केले समुपदेशनसुनील हिरास दिग्रसहाताला काम नाही, वडिलोपार्जित शेतही दुसऱ्याच्या नावावर अशा परिस्थितीत आत्महत्या करण्याची परवानगी मागणाऱ्या तालुक्यातील आरंभी येथील एका शेतकऱ्याचे मन वळविण्यात प्रशासनाला यश आले. तहसीलदाराने सदर शेतकऱ्याच्या घरी जाऊन त्याचे समूपदेशन करीत आत्महत्येपासून परावृत्त केले. आरंभी येथील शेतकरी पृथ्वीराज बिभिषण राठोड (३०) या शेतकऱ्याकडे वडिलोपार्जित शेती आहे. याच शेतीवर तो पत्नी, दोन मुले आणि वृद्ध आई यांचा उदरनिर्वाह करीत होता. परंतु या वडिलोपार्जित जमीन आजीच्या नावावर असून काका ती वाहत आहे. हीच जमीन पूर्वी त्याच्या वडिलांच्या नावे होती आणि ते वाहतही होते. आर्थिक व बिकट परिस्थिती आणि कर्जबाजारीपणामुळे २००५ मध्ये वडील बिभिषण राठोड यांनी आत्महत्या केली होती. घरगुती व्यवहारामध्ये ही जमीन अडकली आहे. त्यामुळे पृथ्वीराजकडे कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी कोणतेही साधन नाही. हाताला काम नसल्याने मला कुटुंबासह आत्महत्या करू द्यावी, अशी विनंती त्याने जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांच्याकडे एका निवेदनातून केली होती. त्याची दखल जिल्हाधिकाऱ्यांनी घेत तहसीलदारांना निर्देश दिले. तत्काळ शेतकऱ्याची भेट घेऊन त्याला आत्महत्येपासून परावृत्त करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार बुधवारी तहसीलदार नितीन देवरे आरंभी येथे पोहोचले. त्यांनी शेतकऱ्याच्या परिस्थितीचे अवलोकन केले. तसेच याही परिस्थितीतून मार्ग निघेल. आत्महत्येतून काही साध्य होणार नाही, असे मार्गदर्शन केले. त्यामुळे पृथ्वीराजचे मतपरिवर्तन होऊन त्याने आता आपण आत्महत्या करणार नाही, अशी कबुली दिली. एवढेच नाही तर भविष्यात कधीही आत्महत्येचा विचार मनात आणणार नाही, असे सांगितले. प्रशासनाने वेळीच दखल घेतल्याने आत्महत्येच्या उंबरठ्यावर असलेल्या शेतकऱ्याला जीवदान मिळाले.