विद्यार्थी अन् पालकांचा प्रतिभाविष्कार

By Admin | Updated: August 24, 2014 00:15 IST2014-08-24T00:15:32+5:302014-08-24T00:15:32+5:30

विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सिद्ध करता यावी यासाठी यवतमाळ पब्लिक स्कूलने घेतलेल्या व्यंजन बनाओ स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मास्टर शेफची भूमिका

Students and parents' talent | विद्यार्थी अन् पालकांचा प्रतिभाविष्कार

विद्यार्थी अन् पालकांचा प्रतिभाविष्कार

यवतमाळ : विद्यार्थ्यांना आपली प्रतिभा सिद्ध करता यावी यासाठी यवतमाळ पब्लिक स्कूलने घेतलेल्या व्यंजन बनाओ स्पर्धेला उदंड प्रतिसाद लाभला. या स्पर्धेत विद्यार्थ्यांच्या पालकांनीही मास्टर शेफची भूमिका पार पाडली. पहिली ते दहावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. उपवासाच्या स्वादिष्ट आणि लज्जतदार पदार्थांची आकर्षकरीत्या मांडणी याठिकाणी करण्यात आली.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून रोहिनी संजय दराडे, सुप्रिया राहुल मदने यांची प्रामुख्याने उपस्थिती लाभली होती. स्पर्धेत १५१ स्पर्धकांनी सहभाग नोंदविला होता. पदार्थ आणि सजावटीचे निरीक्षण अमिना नागानी, कीर्ती पद्मावार आणि शिवानी पालडीवाल यांनी केले. पालक समितीच्या अध्यक्ष रेणू शिंदे, सचिव प्रवीण पाईकराव, सहसचिव सुरूची खरे, कोषाध्यक्ष मनोज जाधव आणि पॅरेंट्स कौन्सिलच्या सदस्यांची यावेळी उपस्थिती होती.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक इशा सोधी यांनी पटकाविला. त्या रोख एक हजार रुपयांच्या बक्षिसांच्या मानकरी ठरल्या. निशा बाजोरिया यांनी दुसरे ७०० रुपयांचे तर शीतल दुधे यांनी तिसरे ५०० रुपयांचे बक्षीस प्राप्त केले. नेहा कोटक, अर्चना भालेराव, संजना लालवानी, शुभदा हातगावकर, पलक बत्रा, रचना जायस्वाल, अस्मिता बिलगए यांनी प्रोत्साहनपर पुरस्कार प्राप्त केला. खचाखच भरलेल्या हॉलमध्ये रोहिनी दराडे, सुप्रिया मदने यांच्या हस्ते बक्षीस वितरण झाले.
शाळा समितीचे अध्यक्ष किशोर दर्डा, प्राचार्य जेकब दास यांनी स्पर्धेतील यशस्वी स्पर्धकांचे यावेळी कौतुक केले. यावेळी स्पर्धेचे प्रायोजक श्रीजी मसालेचे कैलाश नागपाल, ताई नागपाल उपस्थित होते. संचालन सुजाता स्वाईन आणि यश बोरूंदिया यांनी केले. (शहर वार्ताहर)

Web Title: Students and parents' talent