शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
2
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
3
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
4
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
5
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
6
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
7
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
8
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
9
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
10
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
11
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
12
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
13
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
14
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
15
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
16
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
17
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
18
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
19
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
20
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

विनापरीक्षा विद्यार्थी पास म्हणजे, शालेय शिक्षणमंत्रीच ‘नापास’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 05:00 IST

आरटीई कायद्याचा हवाला देत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ‘प्रमोट’ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचणार असले तरी शिक्षणतज्ज्ञ मात्र या निर्णयावर चांगलेच संतापले आहेत. जे विद्यार्थी वर्षभर शाळेतच गेले नाही, ऑनलाईनही शिकले नाही, त्यांना डोळे झाकून पुढच्या वर्गात पाठविणे म्हणजे त्यांच्या बालमनावर अन्याय करण्यासारखे आहे.

ठळक मुद्देशिक्षणतज्ज्ञ संतप्त : पालकही म्हणतात, परीक्षा तर घेतलीच पाहिजे

अविनाश साबापुरे लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : कोरोनाची परिस्थिती पाहता शिक्षण विभागाने यंदा पहिली ते नववीच्या परीक्षाच न घेण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मात्र परीक्षा न होता पुढच्या वर्गात जाणारे विद्यार्थी संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी एक प्रकारचे आव्हान ठरतील, अशी भीती जाणकारांनी व्यक्त केली आहे. तर दुसरीकडे पालकही आमची मुले नापास झाली किंवा त्यांना कमी गुण मिळाले तरी चालले असते पण त्यांची परीक्षा होणे आवश्यकच होते, अशी प्रतिक्रिया नोंदवित आहेत. विद्यार्थ्यांना काहीही न शिकविता पुढच्या वर्गात टाकणाऱ्या शिक्षणमंत्रीच नापास ठरल्या आहेत, असा संताप सर्वत्र व्यक्त होत आहे.आरटीई कायद्याचा हवाला देत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ‘प्रमोट’ करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे विद्यार्थ्यांचे एक वर्ष वाचणार असले तरी शिक्षणतज्ज्ञ मात्र या निर्णयावर चांगलेच संतापले आहेत. जे विद्यार्थी वर्षभर शाळेतच गेले नाही, ऑनलाईनही शिकले नाही, त्यांना डोळे झाकून पुढच्या वर्गात पाठविणे म्हणजे त्यांच्या बालमनावर अन्याय करण्यासारखे आहे. हातपाय बांधून या विद्यार्थ्यांना धावायला लावण्यासारखा हा प्रकार असल्याचा रोष आता व्यक्त केला जात आहे. कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी विविध मार्गाने शिक्षण सुरूच होते, असा दावा खुद्द शिक्षण मंत्र्यांनीच केला. मग शिक्षण दिल्यावरही परीक्षा रद्द का केल्या, हा सवाल उपस्थित होत आहे.यंदा काहीही न शिकता पास होणाऱ्या विद्यार्थ्यांचा पायवा मजबूत होण्याची शक्यता नाही. हे विद्यार्थी पुढे कच्चे अभियंता, कच्चे डाॅक्टर, कच्चे शिक्षक म्हणून समाजात वावरतील. अशावेळी समाजाचे अपरिमित नुकसान होण्याचा धोका आहे. अज्ञानापेक्षाही अर्धवट ज्ञान जास्त घातक ठरते. त्यामुळे यंदा नापास झाले असते तरी चालले असते, पण आमच्या मुलांची परीक्षा व्हायलाच पाहिजे होती, अशी प्रतिक्रिया यवतमाळातील पालकांनी व्यक्त केली.आता तर नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांचाही परीक्षेविना घातपहिली ते आठवीसोबतच आता नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही परीक्षा न घेता पुढच्या वर्गात टाकण्याचा निर्णय शासनाने जाहीर केला आहे. मात्र अकरावी हा बारावीचा पाया आहे. बारावीनंतर व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेला सामोरे जावे लागते. त्याची तयारी अकरावीपासूनच सुरू होते. पण यंदा अकरावीत विद्यार्थी ‘कोरे’च राहिले. असे विद्यार्थी परीक्षेविना बारावीत गेल्यावर ते स्पर्धेत टिकतील का, हा खरा प्रश्न आहे.

बुडणारे शैक्षणिक वर्ष वाचले, पण भविष्य बिघडले यंदा परीक्षा न घेता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात टाकल्यामुळे त्यांचे वर्ष वाचले आहे. त्यामुळे बरेच पालक आनंदितही झाले. एक वर्षाची शाळेची फी वाचली या आनंदात ते आहेत. पण वर्षभराची फी वाचण्यापेक्षाही विद्यार्थी वर्षभर कोणतेही नवे ज्ञान संपादन करू शकला नाही, हे नुकसान खूप मोठे आहे, असे जाणकार सांगत आहेत. काहीही न शिकविता विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात ढकलण्याने एक संपूर्ण पिढीच वाया जाणार असल्याची भीतीही त्यांनी व्यक्त केली.‘त्यांच्या’ मार्कशिटवर कोण विश्वास ठेवणार?२०२०-२१ या शैक्षणिक सत्रात ज्यांनी पदवीची परीक्षा दिली, अभियांत्रिकीची परीक्षा दिली किंवा इतर कोणत्याही व्यावसायिक अभ्यासक्रमाची परीक्षा दिली, त्यांच्या ज्ञानाबाबत भविष्यकाळात शंका घेतली जाण्याचा धोका आहे. हे विद्यार्थी आपली मार्कशिट घेऊन जेव्हा नोकरी मागण्यासाठी जातील, तेव्हा त्यांना टोलवून लावले जाईल, अशी भीती उद्योग क्षेत्रातील जाणकार बोलून दाखवित आहेत.

 

टॅग्स :Schoolशाळाexamपरीक्षा