शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
4
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
5
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
6
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
7
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
8
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
9
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
10
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
11
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
12
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
13
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
14
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
15
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
16
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
17
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
18
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
19
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
20
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
Daily Top 2Weekly Top 5

मोदी लाट टिकविण्यासाठी धडपड

By admin | Updated: May 25, 2014 23:52 IST

नरेंद्र मोदींची लोकसभेतील लाट विधानसभेतही कायम ठेवता यावी यासाठी जिल्ह्यातील भाजपा-शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळी कामाला लागली आहे. तर या उलट स्थिती काँग्रेसमध्ये आहे.

भाजपा-शिवसेना : यवतमाळवर शिवसेना, राष्ट्रवादीचाही दावा

यवतमाळ : नरेंद्र मोदींची लोकसभेतील लाट विधानसभेतही कायम ठेवता यावी यासाठी जिल्ह्यातील भाजपा-शिवसेनेचे इच्छुक उमेदवार आणि नेते मंडळी कामाला लागली आहे. तर या उलट स्थिती काँग्रेसमध्ये आहे. पराभवाने खचलेले काँग्रेसचे नेते-कार्यकर्ते अद्यापही घराबाहेर निघालेले नाही.

नरेंद्र मोदींनी लोकसभा निवडणुकीच्या माध्यमातून देशात एकहाती सत्ता मिळविल्यानंतर भाजपा-शिवसेनेत महाराष्ट्र विधानसभेवर भगवा फडकविण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहे. कोणत्याही परिस्थितीत मोदींची ही लाट पाच महिन्यांनी होणार्‍या विधानसभा निवडणुकीपर्यंत टिकविण्याचे प्रयत्न केले जात आहे. युतीसाठी हे आव्हान असले तरी काँग्रेसमध्ये कायम असलेली मरगळ लक्षात घेता युतीचे नेते हे आव्हान यशस्वीरीत्या पेलतील, असे चित्र आहे. यवतमाळ जिल्हा आमदारांच्या संख्येनुसार काँग्रेसचा गड असला तरी हा गड उद्ध्वस्त करण्याच्या इराद्याने भाजपा-सेनेची मंडळी वेगाने कामाला लागली आहे. मोदी लाट कॅश करून जुने दिवस पाहण्यासाठी ही सर्व धडपड आहे.

जिल्ह्यात सातही विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढविण्यासाठी आघाडी व युतीच्या अनेक पदाधिकार्‍यांनी गुडघ्याला बाशिंग बांधले आहे. मात्र सर्वाधिक स्पर्धा ही यवतमाळ विधानसभा मतदारसंघात पहायला मिळणार आहे. येथे भाजपाचे माजी आमदार मदन येरावार, माजी मंत्री राजाभाऊ ठाकरे, जिल्हा बँकेचे संचालक बाबासाहेब गाडे पाटील हे प्रमुख दावेदार आहे. येरावार सलग दोन वेळा पराभूत झाल्याने नवा चेहरा द्यावा, अशी मागणी भाजपाच्या एका गटाकडून रेटली जात आहे. विशेष असे ठाकरे व येरावार हे दोघेही भाजपाचे राष्ट्रीय नेते नितीन गडकरी यांचे निकटवर्तीय मानले जातात. गडकरी आपले वजन नेमके कोणाच्या पारड्यात टाकतात यावर उमेदवारी ठरणार आहे. येरावार यांच्याकडे कार्यकर्त्यांची फळी नाही. कधी काळी त्यांच्या कार्यालयात दिसणारी कार्यकर्त्यांची गर्दी लोप पावली आहे. कारण त्यांनी या कार्यकर्त्यांना रोजगाराचा मार्गच उपलब्ध करुन दिला नाही. पर्यायाने हे कार्यकर्ते पोटासाठी इतरत्र निघून गेले. अशीच काहीशी अवस्था राजाभाऊ ठाकरे यांची आहे. मात्र त्यांच्याकडे किमान समाजाचे पाठबळ आहे. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला विरोध करीत आणि त्यांच्या चड्डीची जाहीरपणे टर्र्र उडवित भाजपातून बाहेर पडलेल्या राजाभाऊंना संघ परिवार विसरलेला नाही. राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या बाबासाहेब गाडे पाटील यांनीही विधानसभा लढविण्यासाठी फिल्डींग लावली आहे. वेळ प्रसंगी बंडखोरी करण्याच्याही तयारीत ते असल्याचे सांगितले जाते. मात्र गेल्या पोटनिवडणुकीत गाडेपाटील आकपुरी वगळता आपल्या बालेकिल्ल्यात मायनस झाल्याने त्यांच्या संघटन कौशल्याचा तेव्हाच फुगा फुटला. त्यामुळेच भाजपाचे येरावार यांना काँग्रेसच्या नंदिनी पारवेकरांकडून पराभूत व्हावे लागले. त्यामुळे बंडखोरी केली तरी गाडे पाटील किती इफेक्टीव्ह ठरतात हे पाहणे महत्वाचे आहे. येरावार यांना तिकीट नाकारल्यास यवतमाळ नगरपरिषदेतील एक स्वीकृत नगरसेवकही अपक्ष म्हणून विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याची कसरत करीत आहे. राष्ट्रवादी आणि भाजपातील येरावारसह अन्य असंतुष्टांचा छुपा पाठिंबा हे या नगरसेवकाचे पाठबळ राहणार आहे. येरावार यांना उमेदवारी मिळाल्यास नगरपरिषदेतील काँग्रेस सर्मथित भाजपा नेतेही त्यांना ‘हात’ दाखविण्यासाठी उत्सुक असल्याचे सांगितले जाते. त्यातच शिवसेनेने पुसद भाजपाला सोडण्याची तयारी दर्शवून यवतमाळवर दावा सांगितल्याने भाजपाची डोकेदुखी वाढली आहे. शिवसेनेकडे सक्षम उमेदवार नसले तरी नुकतेच बढती मिळालेले काही पदाधिकारी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत.

एकूणच शिवसेना व राष्ट्रवादीचा दावा, काँग्रेस व भाजपातील इच्छुकांचा वाढता आकडा लक्षात घेता यवतमाळची आगामी विधानसभा निवडणूक रंगतदार होणार, एवढे निश्‍चित. (जिल्हा प्रतिनिधी)