शहरं
Join us  
Trending Stories
1
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
2
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
3
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
4
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
5
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
6
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
7
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
8
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
9
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
10
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
11
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
12
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
13
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
14
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
15
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
16
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
17
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
18
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
19
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
20
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
Daily Top 2Weekly Top 5

पुसद, उमरखेड तालुक्यात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST

पुसद तालुक्यातील बेलोरा परिसर आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयाला सुरुवात झाली. यानंतर काही काळातच वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील गहू आणि हरभरा पीक ओले झाले. गुरुवारी दुपारी वातावरणात दमटपणा जाणवत होता. त्यानंतर पावसाने हजेरी लावली.

ठळक मुद्देआंबा पिकाचे नुकसान : अर्धा तास चाललेल्या वादळाने ग्रामस्थांची दाणादाण

लोकमत न्यूज नेटवर्कपुसद/उमरखेड : पुसद व उमरखेड तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवारी दुपारी वादळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह जवळपास अर्धातास पाऊस कोसळला.पुसद तालुक्यातील बेलोरा परिसर आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयाला सुरुवात झाली. यानंतर काही काळातच वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील गहू आणि हरभरा पीक ओले झाले. गुरुवारी दुपारी वातावरणात दमटपणा जाणवत होता. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. मशागतीचे काम करणाºया मजुरांची तारांबळ झाली.एकीकडे पावसाच्या धारा तर दुसरीकडे घामाच्या : तापमान ४३ अंशपुसद आणि उमरखेड तालुक्यात धुव्वाधार पाऊस बरसत असताना उर्वरित जिल्ह्यात मात्र गुरुवारी प्रचंड तापमान होते. दिवसभर सूर्य आग ओकत होता. यवतमाळ, घाटंजी, दारव्हा, नेर, आर्णी, वणी, मारेगाव, राळेगाव, कळंब अशा बहुतांश तालुक्यांमध्ये तापमान ४३ अंशाच्यावर नोंदविले गेले. पुसद आणि उमरखेडमध्ये पावसामुळे तारांबळ उडालेली असतानाच यवतमाळ व उर्वरित जिल्ह्यात धामाच्या धारा लागल्या होत्या. या विचित्र परिस्थितीने आजार वाढण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस