पुसद, उमरखेड तालुक्यात वादळी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2020 05:01 IST2020-05-08T05:00:00+5:302020-05-08T05:01:17+5:30

पुसद तालुक्यातील बेलोरा परिसर आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयाला सुरुवात झाली. यानंतर काही काळातच वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील गहू आणि हरभरा पीक ओले झाले. गुरुवारी दुपारी वातावरणात दमटपणा जाणवत होता. त्यानंतर पावसाने हजेरी लावली.

Stormy rain in Pusad, Umarkhed taluka | पुसद, उमरखेड तालुक्यात वादळी पाऊस

पुसद, उमरखेड तालुक्यात वादळी पाऊस

ठळक मुद्देआंबा पिकाचे नुकसान : अर्धा तास चाललेल्या वादळाने ग्रामस्थांची दाणादाण

लोकमत न्यूज नेटवर्क
पुसद/उमरखेड : पुसद व उमरखेड तालुक्यातील काही गावांमध्ये गुरुवारी दुपारी वादळी पावसाने हजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह जवळपास अर्धातास पाऊस कोसळला.
पुसद तालुक्यातील बेलोरा परिसर आणि उमरखेड तालुक्यातील विडूळ परिसरात गुरुवारी दुपारी २.३० वाजताच्या सुमारास सोसाट्याच्या वाºयाला सुरुवात झाली. यानंतर काही काळातच वादळी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. शेतातील गहू आणि हरभरा पीक ओले झाले. गुरुवारी दुपारी वातावरणात दमटपणा जाणवत होता. त्यानंतर पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची दाणादाण उडाली. मशागतीचे काम करणाºया मजुरांची तारांबळ झाली.

एकीकडे पावसाच्या धारा तर दुसरीकडे घामाच्या : तापमान ४३ अंश
पुसद आणि उमरखेड तालुक्यात धुव्वाधार पाऊस बरसत असताना उर्वरित जिल्ह्यात मात्र गुरुवारी प्रचंड तापमान होते. दिवसभर सूर्य आग ओकत होता. यवतमाळ, घाटंजी, दारव्हा, नेर, आर्णी, वणी, मारेगाव, राळेगाव, कळंब अशा बहुतांश तालुक्यांमध्ये तापमान ४३ अंशाच्यावर नोंदविले गेले. पुसद आणि उमरखेडमध्ये पावसामुळे तारांबळ उडालेली असतानाच यवतमाळ व उर्वरित जिल्ह्यात धामाच्या धारा लागल्या होत्या. या विचित्र परिस्थितीने आजार वाढण्याची शक्यता आहे.

Web Title: Stormy rain in Pusad, Umarkhed taluka

टॅग्स :Rainपाऊस