शहरं
Join us  
Trending Stories
1
तमिळनाडू सत्तासंघर्ष: बहुमताची बेरीज जुळली नाही; विजय याच्या शपथविधीला राज्यापालांचा पुन्हा ब्रेक?
2
मराठीचा ‘टक्का’ घसरला; ९४ हजार विद्यार्थी नापास; दहावीचा निकाल ९२% : प्रथम भाषा मराठीत ९२% उत्तीर्ण
3
आजचे राशीभविष्य, ०९ मे २०२६: नवीन योजना आखाल, नातेवाईक-मित्रांकडून सुखद बातमी मिळेल! 'असा' जाईल आजचा दिवस 
4
प. बंगालमध्ये सुवेंदूच भाजपच्या सत्तेचे ‘अधिकारी’; मुख्यमंत्रिपदासाठी आठही प्रस्ताव सुवेंदू अधिकारी यांच्या एकट्याच्याच नावाचे
5
सर्वांना मोफत घर नको, ‘कट ऑफ डेट’ वाढवू नका, ‘त्याच ठिकाणी’ कशाला?
6
तमिळ अस्मिता आणखी ताणू नये! तमिळनाडूच्या सत्तेचा पेच सुटणार का?
7
दहावीतही सावित्रीच्या लेकींचीच बाजी; ९२.०९ टक्के परीक्षेचा निकाल; मुली उत्तीर्ण ९७.६२ टक्के तर मुले ८९.५६ टक्के
8
बेशिस्त IPL, बीसीसीआय आणि खेळाडूंच्या गर्लफ्रेंड्स!
9
वयाची ७४ वर्षे, ७२ देशांची सफर; ब्रिटनच्या 'गिल आजीं'चा एकटीनं जगप्रवास!
10
भूसंपादन घोटाळा : अविनाश पाठकसोबतचे आणखी ३ बडे मासे रडारवर! १५ मेपर्यंत पोलिस कोठडीत मुक्काम
11
वर्षभरात १,०९८ कोटींवर चोरट्यांचा डल्ला; राज्यासाठी ‘एनसीआरबी’चा २०२४ चा धक्कादायक अहवाल
12
रेल्वेचा ‘मेगा’ गोंधळ ! सूचना नाही की घोषणा; सलग दुसऱ्या दिवशी कसारा मार्गाचा खोळंबा; प्रवाशांचा आक्रोश
13
..तर विद्रोहाची गाणी नक्कीच रस्त्यावर येतील!
14
DC Vs KKR: कोलकाताकडून ‘दिल्ली’ सर, फिन एलनचे ४७ चेंडूत नाबाद शतक; १४.२ षटकांतच मारली बाजी!
15
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
16
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
17
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
18
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
19
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
20
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
Daily Top 2Weekly Top 5

५० दिवस संपले तरीही बँकांमध्ये चलन तुटवडा

By admin | Updated: December 29, 2016 00:13 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेताना देशवासीयांना ५० दिवसाचा अवधी मागितला होता.

नोटाबंदी : एटीएमपुढे रांगा, ग्रामीण भागात परिस्थिती बिकट
यवतमाळ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचा निर्णय घेताना देशवासीयांना ५० दिवसाचा अवधी मागितला होता. आता २८ डिसेंबर रोजी बरोबर ५० दिवस पूर्ण होत आहे. मात्र जिल्ह्यात चलन तुटवड्याचा प्रश्न कायम आहे. बँकांमध्ये गर्दी आणि एटीएमपुढे रांगा दिसत असून एटीएममधून अडीच हजार आणि बँकेतून आठवड्याला २४ हजार रुपयेच काढावे लागत आहे.
८ नोव्हेंबर रोजी पंतप्रधानांनी चलनातून पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद केल्या. त्याचे परिणाम अद्यापही कायम आहे. सुरुवातीला बँकांमध्ये नोटा बदलवून घेण्यासाठी प्रचंड गर्दी दिसत होती. आता विड्रॉल करण्यासाठी बँकांमध्ये रांगा लावाव्या लागत आहे. यवतमाळ शहरापेक्षा ग्रामीण भागातील अवस्था अतिशय बिकट आहे. एटीएमची पुरेशी सुविधा नसल्याने सकाळी ८ वाजतापासूनच बँकांमध्ये रांगा लावाव्या लागतात. त्यातही दोन हजार रुपयांच्याच नोटा दिल्या जात असल्याने व्यवहारात या नोटा अडचणीच्या ठरत आहे. एका आठवड्यात २४ हजार रुपयेच विड्रॉल दिला जात आहे. तर एटीएममधून अडीच हजार रुपये निघत आहे. परिणामी अनेकांचे आर्थिक व्यवहार खोळंबले आहे.
५० दिवसात परिस्थिती पूर्वपदावर येईल, असा आशावाद होता. परंतु ५० दिवस संपल्यानंतरही सर्वत्र परिस्थिती सारखी दिसत आहे. पैसे काढण्याची मर्यादा कायम असल्याने नागरिक वैतागलेले दिसत आहे. आपलेच पैसे आपल्याला काढता येत नसल्याने नागरिक बँकांमध्ये जाऊन मन:स्ताप सहन करीत आहे. तर दुसरीकडे कॅशलेस व्यवहार करण्याचा आग्रह केला जात आहे. परंतु सुशिक्षित मंडळीच असा व्यवहार करायाला घाबरत असल्याने ग्रामीण भागातील अवस्था काय असेल याचा विचार न केलेलाच बरा. कॅशलेस व्यवहारासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. ठिकठिकाणी कार्यशाळा घेतल्या जात आहे. मात्र हे आधुनिक तंत्रज्ञान सुशिक्षितांच्याही डोक्यावरून जात आहे. दोन हजार रुपयांच्या नोटेची चिल्लर करण्यासाठी अनेकांची अडचण होते. दुकानात ग्राहक गेल्यावर पहिल्यांदा चिल्लरची चौकशी करावी लागते. अर्थव्यवस्था सुरळीत करण्यासाठी ५०० रुपयांची नोट सध्या महत्वाची आहे. परंतु पाचशे रुपयांची नोट अद्यापही सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलीच नाही. दोन हजारांच्या नोटा हातात घेऊन चिल्लर शोधणाऱ्यांची संख्या बाजारात दिसून येते. ५० दिवस झाले तरी पहिल्या दिवसासारखीच अवस्था असून असा गोंधळ किती दिवस राहणार हे कोणीही सांगत नाही. (शहर वार्ताहर)

जिल्हा सहकारी बँकेचा प्रश्न कायमच
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील आर्थिक व्यवहाराचे निर्बंध अद्यापही कायम आहे. जिल्हा बँकेला व्यवहारासाठी दररोज किमान दहा कोटींची आवश्यकता असते. मात्र प्रत्यक्षात या बँकेला ५० लाख रुपयांचेच व्यवहार करता येत आहे. यामुळेपूर्वी दोन-चार हजारांचा विड्रॉल या बँका देत होत्या. परंतु आता हजार रुपयांचाच विड्रॉल दिला जात आहे.
कॅशलेस व्यवहाराची सध्या सक्ती केली जात आहे. प्रत्येक विक्रेता त्यामुळे स्वाईप मशीन खरेदी करण्यासाठी पुढे येत आहे. यातून राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तीन हजार अर्ज आले आहे. त्यांचे प्रस्ताव संबंधित निर्मिती कंपनीकडे पाठविण्यात आले आहे. परंतु देशभरातून मागणी वाढल्याने स्वाईप मशीन पुरवठा करण्यास विलंब होत असून कॅशलेस व्यवहारातही ही मोठी अडचण होत आहे.