शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

‘एसटी’ कर्मचाऱ्यांची होत आहे मुस्कटदाबी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2019 6:00 AM

आगार प्रशासनाकडून पिळवणुकीचे धोरण राबविले जात आहे. प्रत्येक बाबतीत नियमाचा पाढा वाचला जात आहे. याच आधारे कारवाई करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. मात्र इटीआय मशीन सुस्थितीत नसल्याने त्याच्या नोंदी घेणे शक्य होत नाही.

ठळक मुद्देबाजू मांडण्याची संधी नाही : चालक-वाहकांना केले जात आहे लक्ष्य

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी नादुरुस्त वाहनेही मार्गावर घेऊन जाण्याची जोखीम स्वीकारली जाते. हे सर्व करत असतानाही अधिकाऱ्यांकडून कारवाईचा बडगा उगारला जातो. त्यातही बाजू मांडण्याची संधी न देता एकतर्फी कारवाई केली जाते. या प्रकाराविषयी कर्मचाऱ्यांमधून कमालीची नाराजी व्यक्त केली जात आहे.यवतमाळ आगारात बसेसची स्थिती अत्यंत दयनीय आहे. आवश्यक साहित्य बसमध्ये नाही. स्पेअर टायर, अग्नीशमन सिलिंडर, दोर, चालक सेफ्टी बेल्ट अनेक बसेसमध्ये नाही. बसच्या खिडक्या दरवाजे तुटलेले-फुटलेले आहे. सीट फाटलेल्या आहे. इंडिकेटर आणि हॉर्न वाजत नाही. याही स्थितीत बस मार्गावर न्यावी लागते. महामंडळाचे उत्पन्न वाढावे, आगारातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी यादृष्टीने ही धडपड असते. मात्र याचा हिशेब अधिकाºयांकडून ठेवला जात नाही. उलट कारवाई केली जाते. काही कर्मचाºयांवर तर निलंबनासारखी कारवाई करण्यात येते.आगार प्रशासनाकडून पिळवणुकीचे धोरण राबविले जात आहे. प्रत्येक बाबतीत नियमाचा पाढा वाचला जात आहे. याच आधारे कारवाई करून मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप केला जात आहे. महामंडळाकडून विविध प्रकारच्या सवलती प्रवाशांना दिल्या जातात. मात्र इटीआय मशीन सुस्थितीत नसल्याने त्याच्या नोंदी घेणे शक्य होत नाही. अशावेळी बसमधील प्रवासी संख्या जुळविणे वाहकांना कठीण जाते. सुस्थितीतील इटीआय मशीन उपलब्ध करून देण्याची गरज असल्याचे वाहक वर्गांकडून सांगितले जाते. ही बाब त्यांनी वरिष्ठ अधिकाºयांकडे मांडली आहे. यावर होणाºया उपाययोजनांकडे कामगारांचे लक्ष लागले आहे.नियमानुसार कामगिरीसाठी सहकार्य करामहाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने निर्देशित केलेल्या नियमानुसारच कामगिरी पार पाडण्यास अधिकाºयांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा अन्यायग्रस्त कामगारांनी व्यक्त केली आहे. बसमध्ये आवश्यक त्या बाबी परिपूर्ण असेल तरच कामगिरी पार पाडली जाईल, अशी भूमिका त्यांनी घेतली आहे. त्यामुळे महामंडळाला स्वच्छ, खिडक्या, दरवाजे न तुटलेल्या बसेस, सेफ्टी बेल्ट या सुविधा असलेल्या बसेस चालक-वाहकांना उपलब्ध करून द्याव्या लागणार आहे.

टॅग्स :state transportएसटी