शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: देशातील ३५ टक्के गर्भश्रीमंत राहतात मायानगरी मुंबईत! 
2
₹१४५ कोटींचा कथित FD घोटाळा आला समोर; ED चे अनेक ठिकाणी छापे, 'या' नामांकित बँकेत पैसे होते जमा
3
आजचे राशीभविष्य - २४ एप्रिल २०२६, शुभ फलदायी दिवस, नोकरी, व्यवसायात अनुकूल वातावरण राहील
4
"जर दीदीने पैसे दिले असते तर..."; IRS अधिकाऱ्याच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीचा कबुलीनामा
5
मुंबईत बांधकाम सुरू असलेल्या इमारतीवरून ९ जण कोसळले, एकाची प्रकृती चिंताजनक 
6
रिक्षा, टॅक्सी चालकांना १० वाक्ये तरी मराठीत बोलता आली पाहिजेत
7
Donald Trump: इराणी लहान बोटी कुठेही दिसल्या तर उडवून टाका, ट्रम्प यांचे नौदलाला आदेश
8
Sanjay Gaikwad: ‘शिवाजी कोण होता?’वरून वाद; आ. संजय गायकवाडांची प्रकाशकाला धमकी
9
प. बंगाल, तामिळनाडूत ‘मत रेकॉर्ड’, विधानसभा निवडणुकीत मतदारांचा उत्साह
10
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
11
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
12
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
14
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
15
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
16
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
17
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
18
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
19
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
20
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
Daily Top 2Weekly Top 5

महागावजवळ ट्रकची एसटी बसला धडक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2020 05:00 IST

  लोकमत न्यूज नेटवर्क महागाव : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गवरील महागावजवळ भरधाव ट्रकने एसटी बसला धडक दिली. या अपघातात सहा ...

ठळक मुद्देनांदगव्हाण घाटात ट्रक उलटून चालक ठार

  लोकमत न्यूज नेटवर्कमहागाव : नागपूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गवरील महागावजवळ भरधाव ट्रकने एसटी बसला धडक दिली. या अपघातात सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले. ही घटना रविवारी दुपारी ३ वाजता घडली. या अपघातात जयश्री किसन घुसे, देवीदास सावंत, गंगुबाई दिलीप कदम, आकाश चोपडे आणि दत्तराव हातमोडे हे प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात आले. नांदेड येथून ट्रक (एम.एच.२७/ए-४५७७) अमरावतीकडे जात होता. त्याचवेळी माहूर आगाराची बस (एम.एच.१४/बीटी-२००१) माहूर येथून नांदेडकडे जात होती. रविवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास या दोनही वाहनांचा येथील एका पेट्रोलपंपाजवळ अपघात झाला. दोनही वाहने समोरासमोर एकमेकांवर आदळल्याने बसमधील पाच प्रवासी जखमी झाले. त्यांना येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. बसचालक नारायण श्यामराव वड्डे होते. याप्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद घेतली. घटनास्थळ गाठून पंचनामा केला. वृत्तलिहिस्तोवर ट्रकचालकाविरूद्ध गुन्हा दाखल झाला नव्हता.

नांदगव्हाण घाटात  ट्रक उलटून चालक ठारमहागाव ते उमरखेड मार्गावरील नांदगव्हाण घाटात सोयाबीन घेऊन जाणारा ट्रक दरीत उलटला. या अपघातात ट्रकचालक जागीच ठार झाला. ही घटना शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास घडली. संभाजी असीने (५०) रा.नांदेड असे ठार झालेल्या चालकाचे नाव आहे. ते ट्रकमध्ये (एम.एच.२६/एडी-००६९) साेयाबीन घेऊन नांदेड येथून नागपूरकडे जात होते. नांदगव्हाण घाटातील वळणावर ट्रकचे ब्रेक अचानक निकामी झाले. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून ट्रक २० फूट खोल दरीत कोसळला. या अपघातात चालक जागीच ठार झाला. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रवाना केला.

टॅग्स :Accidentअपघात