शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्तीसगड पॉवर प्लांट दुर्घटना: वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांच्यासह १० जणांवर FIR
2
आजचे राशीभविष्य, १७ एप्रिल २०२६: फलदायी दिवस, मानसिक स्वास्थ्य लाभेल, मात्र मनावर संयम ठेवा
3
“लता मंगेशकर म्हणजे आयुष्याची वेल अन् आशा भोसले म्हणजे जगण्याची उमेद”: DCM एकनाथ शिंदे
4
विराट कोहलीने पुन्हा मॉडेलचा फोटो केला LIKE, सोशल मीडियावर चर्चा, जाणून घ्या कोण आहे Lizlaz?
5
विधान परिषदेची लाॅटरी काेणाकाेणास लागणार? महायुतीने एक जादाचा उमेदवार दिल्यास अटीतटीची लढत, मविआतील तीन पक्षांना मिळून एकच जागा
6
"मुलाचा चेहरा तुझ्यासारखा दिसत नाही"; टोमण्यांनी हैराण बापाने मुलाला क्रूर पद्धतीने संपवलं, कराडमध्ये क्रूरता
7
तुमच्या अन् जगाच्या कल्याणासाठी करार करा, अमेरिकेने केली इराणला धमकीवजा विनंती
8
तीन विधेयकांवर वादळी चर्चा, पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला आरक्षणाला राजकीय रंग देऊ नका
9
IPL 2026 Points Table : 'फर्स्ट क्लास' शोसह पंजाबचा भांगडा; मुंबई इंडियन्सचा संघर्ष संपता संपेना!
10
राज्यभर उष्णतेची लाट; पुढचे ४ दिवस महत्त्वाचे, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ, कोकणाला इशारा
11
राज्यात दोन उद्योग समूहांची १.७५ लाख कोटींची गुंतवणूक, ११ हजारांहून अधिक रोजगारांच्या संधी
12
परतवाडा ‘व्हिडीओ कांड’ची व्याप्ती उच्चभ्रू वस्तीपर्यंत, अमरावतीत फ्लॅट ‘भाड्याने’ देत अनेक निष्पाप मुलींच्या अब्रूचा ‘तासिका’ बाजार!
13
गुप्तधनाचे आमिष दाखवून ११ लाखांची 'अघोरी' लूट! चार वर्षांनंतरही भोंदू बाबा अन् पोलिस पत्नी फरार
14
रिक्षा-टॅक्सीचालकांना मराठी किती येते? भाषा चाचणी सक्तीची
15
‘धुरंधर’चा वाद सामंजस्याने सोडवावा, दिग्दर्शक आदित्य धर, निर्मात संतोष कुमार यांना उच्च न्यायालयाच्या सूचना
16
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
17
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
18
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
19
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
20
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात घोंगावतोय डिझेल पंपांचा आवाज

By admin | Updated: October 1, 2014 23:30 IST

वाढते भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागून गेला असून तळपत्या उन्हात पिकांना वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत शेता-शेतात डिझेल

पुसद : वाढते भारनियमन आणि वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्याने शेतकरी वैतागून गेला असून तळपत्या उन्हात पिकांना वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे. अशा स्थितीत शेता-शेतात डिझेल इंजीनचा आवाज घुमत असून शेतकऱ्यांना मात्र मोठा आर्थिक फटका बसत आहे. यंदा मान्सूनच्या आगमनापासून पाऊस अनियमित होता. आॅगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांंना काही प्रमाणात संजीवनी मिळाली. सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पाऊस झाला. नंतर पूर्ण महिना कोरडा गेला आहे. शेतातील पिके आता मान टाकू लागले आहे. भारनियमनाचा अतिरेक यात आणखी भर घालीत आहे. सोयाबीन, कापूस, तूर ही पिके हातची जाण्याची स्थिती निर्माण झाली आहे. या पिकांना वाचविण्यासाठी शेतकरी धडपड करीत आहे. मात्र वाढत्या भारनियमनाने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. ऐन सोयाबीन व कापसाला पाण्याची वेळ असताना वीज टंचाईने कळस गाठला आहे. शेतकऱ्यांनी आता ओलितासाठी डिझेल इंजीनचा आधार घेतला आहे. ग्रामीण भागात सुरुवातीच्या काळात डिझेल इंजीनचा वापर केला जायचा. मात्र विद्युत पंपाने त्याची जागा घेतली. परंतु आता भारनियमनाने पुन्हा डिझेल पंपाचाच आधार घ्यावा लागतो. यामुळे शेतकऱ्यांना सर्वप्रथम डिझेल इंजीनच खरेदी करण्याची वेळ येते. एका इंजीनची किंमत १५ ते ३५ हजारापर्यंत आहे. वीज टंचाईमुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात इंजीनची खरेदी करीत आहे. पैसे नसतानाही उधार, उसनवार करून शेतकरी डिझेल इंजीन खरेदी करीत आहे. या डिझेल इंजीनला दररोज ८०० ते हजार रुपयांचे डिझेल लागते. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. अशा स्थितीत शेतकरी पुरता त्रस्त झाला आहे. आधीच पिकांवर किडींनी आक्रमण केले आहे. ही कीड नियंत्रणात आणताना शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आले आहे. अपेक्षित उत्पादनाची अपेक्षा मावळली आहे. परंतु शेतात दिसणारे पीक तर जगवावेच लागणार. मोठ्या आशेने शेतकरी ओलिताची व्यवस्था करीत आहे. ज्यांची डिझेल इंजीन घेण्याची क्षमता नाही, असे शेतकरी रात्री-बेरात्री जाऊन ओलित करताना दिसत आहे. एकंदरित पिकांना वाचविण्याची धडपड शेतकरी करीत असला तरी वीज वितरण कंपनी मात्र आपल्या धोरणात बदल करायला दिसत नाही. (तालुका प्रतिनिधी)