‘उमेद’ अभियानाची सामाजिक बांधिलकी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2020 05:01 IST2020-04-28T05:00:00+5:302020-04-28T05:01:29+5:30

ग्रामपंचायतकडुन त्यांना सुती कापड उपलब्ध करून दिला. गरजवंत नागरिकांना मास्क वाटपाची जबाबदारीही ग्रामपंचायतीने घेतली. नागरिकांची मास्कची गरज भागविण्यासह महिलांना अडचणीच्या काळात रोजगार उपलब्ध झाल्याने बेरोजगार महिलांना मास्क निर्मितीच्या कमाईतून जगण्याची उमेद मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत राबविल्या जात असलेल्या आणि महिला सक्षमीकरणासाठी झटत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानने (उमेद) देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटात पुढाकार घेतला आहे. उमेदने सुती कापडापासून पुनर्वापर होऊ शकणारे टिकाऊ मास्क तयार करण्याचे काम उमेद समूहातील या महिलांना दिले.

The social commitment of the ‘Umed’ campaign | ‘उमेद’ अभियानाची सामाजिक बांधिलकी

‘उमेद’ अभियानाची सामाजिक बांधिलकी

ठळक मुद्देमास्कचे विनाशुल्क शिवणकाम : गरजूंना विविध साहित्याचे वाटप, महिलांचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्क
अकोलाबाजार : महिलांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी त्यांच्याकडे मास्क तयार करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. सामाजिक बांधिलकी जपत कुटुंबाचा उदरनिवार्हाचा प्रश्न सोडविण्याकरिता मास्क शिवण्याचे काम या महिलांनी स्वीकारले.
ग्रामपंचायतकडुन त्यांना सुती कापड उपलब्ध करून दिला. गरजवंत नागरिकांना मास्क वाटपाची जबाबदारीही ग्रामपंचायतीने घेतली. नागरिकांची मास्कची गरज भागविण्यासह महिलांना अडचणीच्या काळात रोजगार उपलब्ध झाल्याने बेरोजगार महिलांना मास्क निर्मितीच्या कमाईतून जगण्याची उमेद मिळाली आहे.
जिल्हा परिषदेच्या अखत्यारीत राबविल्या जात असलेल्या आणि महिला सक्षमीकरणासाठी झटत असलेल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानने (उमेद) देशावर आलेल्या कोरोनाच्या संकटात पुढाकार घेतला आहे. उमेदने सुती कापडापासून पुनर्वापर होऊ शकणारे टिकाऊ मास्क तयार करण्याचे काम उमेद समूहातील या महिलांना दिले.
अकोलाबाजार येथील जय अंबे महिला स्वयंसहायता समूह व तथागत महिला स्वयंसहायता समूहातील विद्या घुले, वैशाली बोरकर, साधना बोरकर, ज्योती शेंदरे, सोनू शेंदरे, लक्ष्मी नेवारे, वंदना कडुकार, प्राजक्ता कोराने या महिलांनी आपले घरीच शिलाई मशीनवर हे मास्क तयार केले गटविकास अधिकारी राजेंद्र घोंघडे, विस्तार अधिकारी किशोर सराफ यांनी त्यांचे कौतुक केले.

मास्क, साबण, सॅनिटायझरचे वाटप
दोन हजार ४०० मास्क, एक हजार २०० साबण, एक हजार २०० सॅनिटायझर बॉटल सरपंच अर्चना मोगरे, उपसरपंच दयाशंकर अवथरे, ग्रामविकास अधिकारी कैलास गावंडे, आदींनी वाटप केले. लोणी, बारडतांडा, सालोड या गावातही या वस्तूंचे वाटप करण्यात आले.

Web Title: The social commitment of the ‘Umed’ campaign