‘स्मार्ट रोड’ विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2019 06:00 AM2019-09-23T06:00:00+5:302019-09-23T06:00:08+5:30

सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनात आदिवासी विभागातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बाबासाहेब देशमुख विद्यालयाची निवड झाली होती. विद्यार्थ्यांनी स्मार्ट रोड या प्रतिकृतीचे सादरीकरण केले.

The 'smart road' science replica at the state level | ‘स्मार्ट रोड’ विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर

‘स्मार्ट रोड’ विज्ञान प्रतिकृती राज्यस्तरावर

googlenewsNext
ठळक मुद्देपारवाची विद्यार्थिनी : सर्वांचे लक्ष वेधले, रस्त्यावर पाणीच साचत नाही

लोकमत न्यूज नेटवर्क
पारवा : येथील बाबासाहेब देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रदर्शनात ‘स्मार्ट रोड’ या प्रतिकृतीचे सादरीकरण केले. या प्रतिकृतीची राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील नानासाहेब महाडिक अभियांत्रिकी महाविद्यालयात राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन घेण्यात आले. प्रदर्शनात आदिवासी विभागातून जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करण्यासाठी बाबासाहेब देशमुख विद्यालयाची निवड झाली होती. विद्यार्थ्यांनी स्मार्ट रोड या प्रतिकृतीचे सादरीकरण केले. श्वेता दत्तात्रय मदिकुंटावार हिने ही प्रतिकृती सादर केली. तिला के.एम. नार्लावार, एम.बी. गोल्हर यांचे मार्गदर्शन लाभले.
स्मार्ट रोड तंत्रज्ञानात रस्त्यांची रचना सछिद्र असते. यामुळे रस्त्यावर पाणी साचत नाही. रस्त्यावरील पाणी झिरपून जलाशयात पोहोचते. त्यामुळे रस्त्यांवर खड्डे पडत नाही. अपघात टळतो. नाल्यासुद्धा तुंबत नाही. या प्रतिकृतीने सर्वांचे लक्ष वेधले होते. प्राचार्य एस.एच. ठोंबरे, पर्यवेक्षक अनिस खान, विज्ञान शिक्षक एन.बी. लिखार यांचे श्वेताला मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: The 'smart road' science replica at the state level

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.