घरीच बसा, मोबाईल उघडा अन् पेपर सोडवा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 06:00 AM2020-03-18T06:00:00+5:302020-03-18T06:00:41+5:30

आता पहिली ते नवव्या वर्गाच्या परीक्षा चक्क मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. शहरातील काही शाळांनी त्याबाबत पालकांना सूचनाही दिल्या आहे. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ही परीक्षा होणार आहे. मात्र आता पोरांना परीक्षेसाठी शाळेत येण्याची गरज नाही. त्याऐवजी पेपरच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन लिंकद्वारे पाठविला जाणार आहे.

Sit back at home, open your mobile and release the paper! | घरीच बसा, मोबाईल उघडा अन् पेपर सोडवा !

घरीच बसा, मोबाईल उघडा अन् पेपर सोडवा !

googlenewsNext
ठळक मुद्देचिमुकल्यांसाठी इंग्रजी शाळांची शक्कल : कोरोनाला हुलकावणी देत परीक्षा घेणार ऑनलाईन

अविनाश साबापुरे।
लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : घरीच अभ्यास करा अन् घरीच परीक्षाही द्या... बाबाचा मोबाईल घ्या... त्यावर पेपर सोडवा अन् पास व्हा!
कोरोनाच्या धास्तीने शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्या मिळाल्या. त्याचा पोरांना आनंद झालाच. मात्र या अचानक घडलेल्या बदलाने परीक्षेचे वेळापत्रक कोलमडले. दहावी-बारावीच्या परीक्षा सुरळीत सुरू असल्या तरी पहिली ते नववीच्या परीक्षांचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यावर शहरातील इंग्रजी शाळांनी मात्र आधुनिक काळाला साजेशी शक्कल शोधून काढली आहे.
आता पहिली ते नवव्या वर्गाच्या परीक्षा चक्क मोबाईलवर ऑनलाईन पद्धतीने घेतल्या जाणार आहे. शहरातील काही शाळांनी त्याबाबत पालकांना सूचनाही दिल्या आहे. आधी ठरलेल्या वेळापत्रकानुसारच ही परीक्षा होणार आहे. मात्र आता पोरांना परीक्षेसाठी शाळेत येण्याची गरज नाही. त्याऐवजी पेपरच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर ऑनलाईन लिंकद्वारे पाठविला जाणार आहे. या लिंकला क्लिक केल्यानंतर वस्तूनिष्ठ पद्धतीचा पेपर उघडला जाईल. त्यावर ४० प्रश्नांची उत्तरे द्यावी लागणार आहे. सकाळी ८.३० ते ९.३० या एक तासाच्या काळातच ही परीक्षा होणार असल्याची माहिती शाळेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी दिली.
तर वायपीएस शाळेत पहिली ते सहावीचे सर्व पेपर आधीच आटोपले असून सातवी ते नववीचा केवळ एक पेपर शिल्लक आहे. त्याचे अ‍ॅग्रीगेट मार्क दिले जातील, अशी माहिती प्राचार्य डॉ.जेकब दास यांनी दिली. सेंट अलॉईसेस शाळेने खालच्या वर्गांच्या परीक्षा आधीच आटोपून घेतल्या आहे. फ्री मेथॉडिस्ट शाळेच्या परीक्षा २७ मार्चपासून सुरू होणार होत्या. मात्र आता सुरुवातीच्या दोन-तीन पेपर स्थगित करून १ एप्रिलपासून उर्वरित पेपर घेतले जाणार असल्याची माहिती प्राचार्य खत्री यांनी दिली. तर एसओएसचे प्राचार्य नरेंद्रसिंह चव्हाण म्हणाले, ३१ मार्चनंतर आमच्या शाळेत परीक्षेचे नवे वेळापत्रक दिले जाणार आहे.

पूर्वानुभव लक्षात घेऊन लावणार रिझल्ट
पोदार शाळेने नवीच शक्कल शोधली आहे. तिसरी ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांची वर्षभरात आतापर्यंत तीन वेळा परीक्षा झाली. या इंटर्नल असेसमेंटमधील विद्यार्थ्याचा परफॉर्मन्स लक्षात घेऊन त्याचा वार्षिक निकाल दिला जाणार आहे, अशी माहिती प्राचार्य प्रफुल्ल चपाटे यांनी दिली.

Web Title: Sit back at home, open your mobile and release the paper!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.