शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
2
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
3
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
6
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
7
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
8
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
9
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
10
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
11
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
12
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
13
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
14
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
15
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
16
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
17
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
18
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
19
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
20
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
Daily Top 2Weekly Top 5

भाजप, शिवसेना, राकाँत बंडखोरी होण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2019 06:00 IST

पुसद भाजपला देऊन उमरखेड सेनेकडे घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भाजपने केवळ एकाच अन् त्याही परंपरागत मतदारसंघावर बोळवण केल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील कातकडे, आशिष खुलसंगे, उमरखेडमध्ये डॉ. विश्वनाथ विणकरे, यवतमाळात संतोष ढवळे, नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरीची तयारी चालविली आहे.

ठळक मुद्देपुसदमध्ये चाचपणी : राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गट बाहेर पडण्याच्या तयारीत

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : युती व आघाडीतील जागा वाटप समाधानकारक नसल्याचे सांगत जिल्ह्यात भाजप, शिवसेना व राष्टÑवादी काँग्रेसमध्ये अनेक इच्छुकांनी बंडाचे निशाण फडकविण्याची तयारी चालविली आहे.जिल्ह्यात विधानसभेच्या सात पैकी सहा मतदारसंघावर भाजपने दावा सांगितला आहे. त्यापैकी चार मतदारसंघात उमेदवारही जारी केले आहेत. पुसद व उमरखेडच्या जागेचा निर्णय अद्याप झालेला नाही. भाजपाऐवढीच ताकद जिल्ह्यात असताना शिवसेनेला केवळ एकच मतदारसंघ का? म्हणून शिवसैनिकांमध्ये तीव्र नाराजी पहायला मिळते. शिवसेनेने सात पैकी दिग्रस, पुसद वगळता वणी व उमरखेड मतदारसंघावर दावा सांगितला होता. पुसद भाजपला देऊन उमरखेड सेनेकडे घेण्याची तयारी दर्शविली होती. परंतु भाजपने केवळ एकाच अन् त्याही परंपरागत मतदारसंघावर बोळवण केल्याने शिवसेनेमध्ये अस्वस्थता आहे. त्यातूनच वणीमध्ये माजी आमदार विश्वास नांदेकर, उपजिल्हा प्रमुख सुनील कातकडे, आशिष खुलसंगे, उमरखेडमध्ये डॉ. विश्वनाथ विणकरे, यवतमाळात संतोष ढवळे, नगरसेवक गजानन इंगोले यांनी बंडखोरीची तयारी चालविली आहे. वणी मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेससाठी सोडावा म्हणून विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी आपले मित्र डॉ. महेंद्र लोढा यांच्याकरिता पक्षाकडे प्रतिष्ठा पणाला लावली होती. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. हा मतदारसंघ काँग्रेसकडेच कायम राहिला. त्यामुळे राष्ट्रवादीचे इच्छुक डॉ. लोढा यांनी आता बंडखोरी करीत वंचित बहुजन आघाडीचा झेंडा हाती घेतला आहे.भाजपने आर्णीचे वादग्रस्त आमदार प्रा. राजू तोडसाम यांचे तिकीट कापले आहे. त्यामुळे तोडसाम अपक्ष रिंगणात उतरणार असल्याचे सांगितले जाते.पुसद मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार मनोहरराव नाईक यांच्या कुटुंबातून अलिकडेच बंडाचे निशाण फडकविले गेले होते. परंतु समर्थकांचा विरोध व पक्षातून मनधरणी झाल्याने तूर्त ही बंडखोरी थांबली. मात्र अद्यापही त्या दृष्टीने चाचपणी सुरू असल्याचे बोलले जाते. जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट बाहेर पडण्याच्या तयारीत आहे. त्यात माजी जिल्हाध्यक्ष, माजी सभापती, महिला पदाधिकारी अशा काहींचा समावेश आहे. हा गट यवतमाळ व पुसदमध्ये भाजपला ताकद देण्यासाठी खास प्रयत्न करणार आहे.भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन मतदारसंघातील उमेदवार अद्याप जाहीर झालेले नाही. ते जाहीर झाल्यानंतर या दोन्ही पक्षात व मतदारसंघात आणखी कुणाची बंडखोरी होते का हे पाहणे महत्वाचे ठरते. बंडखोरीसाठी कायम सर्वत्र चर्चेत राहणाऱ्या काँग्रेस पक्षात मात्र सध्या तरी कोणत्याच मतदारसंघात बंडखोरीची चिन्हे दिसत नाहीत, हे विशेष.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा