शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
2
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
3
‘मिसिंग लिंक’ मार्गावर कार, बसलाच एंट्री, टोलवाढ नाही; मुंबई-पुणे अंतर ६ किमीने कमी
4
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
5
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
6
कुजबुज! सत्ता नसूनही ठाकरेंची तारेवरची कसरत; गायकवाडांवरही होऊ शकते पुस्तक
7
मेट्रो ६ मार्गासाठी पश्चिम रेल्वेवर ४२ मीटर स्टील स्पॅनची उभारणी; काय आहेत वैशिष्ट्ये?
8
‘रेलवन’वर बुकिंग फसले अन् वॉलेटमध्येच रक्कम अडकली; प्रवासी नाराज, पैसे परत देण्याची मागणी
9
२२ वर्षीय मुलीची क्रूर हत्या, अवघ्या ५ दिवसांत गुन्ह्याचा छडा; आरोपीला ठाण्यातून केली अटक
10
मुंबईकरांनो, तुम्ही रामभरोसे बाहेरचे पदार्थ खाताय..! महाराष्ट्रात एफडीए इन्स्पेक्टरची वानवा
11
‘त्यांना’ मराठीची परीक्षा देऊन पदवी घ्यायची नाही; परिवहन मंत्र्यांनी मांडली स्पष्ट भूमिका
12
तुम्ही रिक्षा-टॅक्सीवाल्यांची उपजीविका नष्ट करताय; मराठी सक्तीला शशांक राव यांचा आक्षेप
13
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
14
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
15
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
16
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
17
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
18
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
19
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
20
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
Daily Top 2Weekly Top 5

नंदीग्राम एक्स्प्रेस वणीकरांचा कायमचा निरोप घेण्याची चिन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2022 05:00 IST

नंदीग्राम एक्सप्रेस सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे मुंबई किंवा औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस अदिलाबादपासून पुढे मुंबईपर्यंत सध्या प्रवासी वाहतूक करीत आहे. या भागातील प्रवाशांना अदिलाबादपर्यंत पोहोचविण्यासाठी मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासन करीत असल्याची माहिती मिळाली.

संतोष कुंडकरलोकमत न्यूज नेटवर्कवणी : दोन वर्षांपासून बंद असलेली नंदीग्राम एक्सप्रेस वणीकरांचा कायमचा निरोप घेण्याच्या मार्गावर आहे. गेल्या काही वर्षात माजरी ते अदिलाबाद मार्गावर या रेल्वेला तोटा सहन करावा लागल्याने रेल्वे प्रशासन निर्णय घेण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जात आहे. पूर्वी रेल्वेची वणीमार्गे प्रवासी वाहतूक नव्हती. परंतु २२ मार्च २००७ रोजी नंदीग्राम एक्सप्रेसला वणी थांबा मिळाला. त्यामुळे वणी येथून अदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद व मुंबई येथे जाण्यासाठी प्रवाशांना सोयीस्कर झाले होते. वणी येथून अनेक प्रवासी या नंदीग्राम एक्सप्रेसने प्रवास करीत होते. नागपूरहून निघणारी ही रेल्वे वर्धा, माजरी येथूनही प्रवासी घेऊन पुढे जात होती. कोरोना काळात ही रेल्वे बंद करण्यात आली. ती बंदच आहे.

मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली नंदीग्राम एक्सप्रेस सद्य:स्थितीत बंद आहे. त्यामुळे मुंबई किंवा औरंगाबादला जाण्यासाठी प्रवाशांना इतर वाहतुकीच्या साधनांचा वापर करावा लागत आहे. नंदीग्राम एक्सप्रेस अदिलाबादपासून पुढे मुंबईपर्यंत सध्या प्रवासी वाहतूक करीत आहे. या भागातील प्रवाशांना अदिलाबादपर्यंत पोहोचविण्यासाठी मेमू ट्रेन सुरू करण्याच्या हालचाली रेल्वे प्रशासन करीत असल्याची माहिती मिळाली. 

अधिकृत दुजाेरा नाहीनंदीग्राम एक्सप्रेस कायमस्वरूपी बंद होणार, याबाबतची माहिती देण्यास आम्ही असमर्थ आहो. याबाबत आपण रेल्वेच्या पीआरओ कार्यालयाशी संपर्क साधावा.        - शिवशंकर सिंग, स्टेशन मास्टर, वणी.

सर्वसामान्यांना बसतोय फटका वणी येथून अदिलाबाद, नांदेड, औरंगाबाद, मुंबई येथे जाण्यासाठी नंदीग्राम एक्सप्रेस ही रेल्वे सोयीची होती. माफक दरात या रेल्वेने प्रवास करता येत होता. मात्र आता ही रेल्वे बंद आहे.

 प्रवासी म्हणतात... 

व्यापाराच्या दृष्टीने मी वणी येथून नेहमीच नंदीग्राम एक्सप्रेसने अदिलाबाद किंवा नांदेड येथे जात होतो. परंतु गेल्या दोन वर्षांपासून ही रेल्वे बंद असल्याने ट्रॅव्हल्सने प्रवास करावा लागत आहे. यातून आर्थिक फटकाही बसत आहे. त्यामुळे वणी येथून रेल्वेसेवा अतिशय आवश्यक झाली आहे.     - पराग हनुमंते, प्रवासी.

नंदीग्राम एक्सप्रेस विद्यार्थ्यांच्या दृष्टीनेही अतिशय सोयीची होती. वणी येथील अनेक विद्यार्थी नांदेड, औरंगाबाद, मुंबई याठिकाणी शिक्षणासाठी जातात. आमच्या पाल्यांना संबंधित ठिकाणी पोहोचविण्यासाठी आम्हीही सोबत जात होतो. नंदीग्राम रेल्वे बंद असल्याने गैरसोय होत आहे.     - प्रभाकर डाखरे, प्रवासी.

 

टॅग्स :railwayरेल्वे