शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

धडक सिंचन विहिरी रखडल्या, हिरवे स्वप्न भंग

By admin | Updated: May 24, 2014 23:59 IST

शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरी रखडल्या आहेत.

वणी : शासनाने शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्‍यांना दिलासा देण्यासाठी विशेष पॅकेजअंतर्गत धडक सिंचन विहिरींचा कार्यक्रम आखला. मात्र गेल्या अनेक वर्षांपासून या विहिरी रखडल्या आहेत. परिणामी शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्नच करपत आहे.

पश्‍चिम विदर्भातील पाचही जिल्हय़ात सतत शेतकरी आत्महत्या होत आहे. त्यासाठी कोरडवाहू शेती कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला. सिंचनाची कोणतीही सुविधा नसल्याने या पाचही जिल्हय़ात कोरडवाहू शेती केली जाते. ही शेती केवळ निसर्गाच्या पावसावर अवलंबून असते. मात्र लहरी पावसामुळे कोरडवाहू शेती बिनभरवशाची झाली आहे. कधी कोरडा दुष्काळ, तर कधी ओल्या दुष्काळामुळेही या पाचही जिल्हय़ातील अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.

कोरडवाहू शेतीमुळे शेतकरी आत्महत्या होत असल्याचा निष्कर्ष काढून शासनाने शेतकर्‍यांना सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. पाचही आत्महत्याग्रस्त जिल्हय़ातील शेतकर्‍यांकरिता विशेष पॅकेज देण्यात आले. या पॅकेजच्या माध्यमातून कोट्यवधींच्या योजना तयार करण्यात आल्या. त्यात विविध योजनांसाठी भरीव अनुदानाची तरतूद करण्यात आली. मात्र या योजनांचा लाभ अद्यापही प्रत्यक्षात अनेक शेतकर्‍यांपर्यंत पोहोचलाच नाही. त्यामुळे अजूनही जिल्हय़ात शेतकरी आत्महत्या थांबण्याचे नाव घेत नाही.

शासनाने कोरडवाहू शेतीवर मात करून शेतकर्‍यांना सिंचन सुविधा निर्माण करून देण्यासाठी याच पॅकेज अंतर्गत धडक सिंचन विहिरींची योजना आखली. यात अल्प, अत्यल्प आणि अनुसूचित जाती व जमातीच्या शेतकर्‍यांना १00 टक्के अनुदानावर विहिरी बांधून देण्याचा निर्णय घेतला. त्याव्दारे ओलिताची सुविधा निर्माण होईल, असा कयास होता. परिणामी लहान शेतकर्‍यांचे उत्पन्न वाढून कुणावरही आत्महत्येसारखा प्रसंग ओढवणार नाही, अशी अपेक्षा होती. शासनाचा हेतू अत्यंत चांगला होता. मात्र योजना राबविताना आता सर्वांंची प्रचंड दमछाक होत आहे.

वणी तालुक्यात तालुका कृषी विभागातर्फे धडक सिंचन विहिरी योजनेतून तब्बल १९३ शेतकर्‍यांना विहीर मंजूर झाली होती. त्यापैकी आजमितीस केवळ १३ विहिरींचे काम पूर्ण झाले. सात विहिरींचे काम प्रगतीपथावर आहे. उर्वरित १७३ विहिरींचे काम अद्याप अपूर्णच आहे. विहिरींचे काम रखडण्यास शासनासोबतच संबंधित शेतकरीही जबाबदार दिसून येत आहे. शासन आणि शेतकरी या दोघांनीही शेतात विहिरी खोदकामासाठी आवश्यक तो पुढाकार घेतलाच नाही.

शेतात विहिरी खोदकामासाठी जोमाने प्रयत्न न झाल्याने तालुक्यातील १७३ शेतकर्‍यांच्या शेतात अद्याप विहीर पूर्ण झालीच नाही. अनेकांनी तर अजूनही विहिरीचे खोदकामच सुरू केले नसावे. त्यामुळे ही धडक सिंचन विहिरी योजनाच आता वांद्यात सापडली आहे. त्यातील अटींमुळे शेतकरीही चांगलेच त्रस्त झाले आहे. (कार्यालय प्रतिनिधी)