शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
2
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
3
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
4
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
5
उडू शकत नाही तरीही ऑस्ट्रेलियन 'इमू' एवढ्या लांब अयोध्येत कसा पोहोचला?; वन विभागही हैराण
6
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
7
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
8
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
9
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
10
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
11
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
12
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
13
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
14
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
15
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
16
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
17
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
18
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
19
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
20
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
Daily Top 2Weekly Top 5

पुसदमध्ये शिवसेनेचे राष्ट्रवादीला थेट आव्हान

By admin | Updated: September 30, 2014 23:40 IST

आतापर्यंत उमरखेड तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहायला मिळणारी मनोहरराव नाईक विरुद्ध प्रकाश देवसरकर ही राजकीय लढाई आता पुसद विधानसभेत दिसणार आहे.

यवतमाळ : आतापर्यंत उमरखेड तालुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पहायला मिळणारी मनोहरराव नाईक विरुद्ध प्रकाश देवसरकर ही राजकीय लढाई आता पुसद विधानसभेत दिसणार आहे. जुना राजकीय हिशेब चुकता करण्यासाठी देवसरकरांनी पुसदच्या आखाड्यात उडी घेतली आहे. पुसद विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा मनोहरराव नाईक यांना रिंगणात उतरविले आहे. आघाडी असल्यास ययाती नाईक आणि स्वतंत्र लढल्यास मनोहरराव नाईक असे समीकरण आधीच ठरले होते. आघाडीच्या अपेक्षेने ययाती नाईकांना गेली दोन-तीन वर्ष प्रोजेक्ट केले गेले. परंतु आघाडीत बिघाडी झाल्याने ययाती नाईकांसाठी आमदारकी जणू चॉकलेट ठरली. संभाव्य राजकीय धोके ओळखून मनोहरराव नाईक विधानसभेत उतरले. यावेळी त्यांचा सामना माजी आमदार आणि शिवसेनेचे उमेदवार प्रकाश पाटील देवसरकर यांच्याशी राहणार आहे. देवसरकरांची ही एन्ट्री राष्ट्रवादीसाठी डोकेदुखी ठरु पाहत आहे. गेल्या वेळी देवसरकर यांनी उमरखेडमध्ये भाजपाच्या उमेदवाराला ताकद देण्याचा प्रयत्न केला. भविष्यात त्यांचे वर्चस्व वाढण्याची चिन्हे दिसताच नाईकांनी काँग्रेसच्या विजय खडसेंना मदतीचा हात दिला. ऐनवेळी बंजारा समाज खडसेंच्या मागे उभा केला गेला. पर्यायाने देवसरकरांच्या वर्चस्वाला खीळ बसली. त्यानंतर देवसरकरांनी हा राजकीय हिशेब वसंत सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत चुकता केला. सर्व जागा आपल्या पॅनलला खेचून विरोधकांचा वचपा काढला. जिल्हा परिषद निवडणुकीमध्येही वर्चस्वाची ही लढाई पहायला मिळाली. देवसरकरांना महागाव-पुसद तालुक्यात लुडबुड करू द्यायचे नाही म्हणून राष्ट्रवादीने काँग्रेसची छुपी मदत घेतली. पर्यायाने महागाव व पुसद या दोनही तालुक्यात काँग्रेसला एकही जिल्हा परिषद सदस्य निवडून आणता आला नाही. त्यानंतर आता देवसरकरांनी थेट पुसद विधानसभेच्या आखाड्यात उडी घेऊन मनोहरराव नाईकांशी थेट पंगा घेतल्याचे चित्र पहायला मिळत आहे. पुसद विधानसभा मतदारसंघात देवसरकरांचे खरोखरच नाईकांपुढे आव्हान उभे होते का, याकडे लक्ष लागले आहे. गब्बर उमेदवार म्हणून देवसरकरांकडे पाहिले जाते. देवसरकर यांचा उमरखेड हा मतदारसंघ आहे. पुसदच्या दृष्टीने तसे देवसरकर बाहेरचे उमेदवार ठरतात. वास्तविक पुसदमधून पाच निष्ठावंत शिवसैनिकांनी उमेदवारीसाठी जोरदार प्रयत्न चालविले होते. मात्र ऐनवेळी देवसरकरांच्या खांद्यावर धनुष्यबाण दिला गेला. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात (निष्ठावंतांना डावलले म्हणून) नाराजीचा सूर आहे. देवसरकरांच्या उमेदवारीमागे मराठा समाज हे एक ग्राऊंड सांगितले जात असले तरी या समाजातसुध्दा नाईकांना मानणारा मोठा गट आहे, ही बाब दूर्लक्षित करून चालणार नाही. पुसद विधानसभेच्या माध्यमातून भविष्यात संपूर्ण उपविभागातच पक्षाची बांधणी करून त्या माध्यमातून हिंगोली लोकसभेची शिवसेनेची उमेदवारी मिळविण्याचाही देवसरकरांचा मनसुबा असावा असा अंदाज वर्तविला जात आहे. कारण हिंगोलीचे शिवसेनेचे सुभाष वानखडे हे आता भाजपावासी झाले असून नांदेडमधून विधानसभा निवडणूक लढवित आहेत. (जिल्हा प्रतिनिधी)