शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
2
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
3
IPL इतिहासातील सर्वात महागड्या भारतीय अनकॅप्ड खेळाडूची CSK साठी पहिली फिफ्टी, 'गन सेलिब्रेशन' चर्चेत (VIDEO)
4
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
5
IPL 2026: ऋतुराजसह कार्तिक शर्माची कडक फिफ्टी! CSK विरुद्धच्या पराभवासह MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT?
6
नसरापूर प्रकरण: आरोपीला फाशी द्या ..! नवले पुलावर हजारोंचा एल्गार, मुंबई-बंगळुरू हायवे ठप्प
7
MI च्या युवा गोलंदाजावर रोहित शर्मा भडकला; CSK विरुद्ध डगआउटमध्ये बसूनच 'कॅप्टन्सी' करताना दिसला
8
पुण्याच्या सिम्बायोसिसमधून शिक्षण घेतलेल्या तरुण न्यायाधीशांनी दिल्लीत आयुष्य संपविले; बाथरूममध्ये आढळला मृतदेह 
9
Pune crime: गावकऱ्यांनी गावातून आधीच हाकललं होतं...; नसरापूर प्रकरणातील ‘६५ वर्षीय’ आरोपीच्या ‘क्राईम डायरी’मुळे खळबळ
10
नाशिककर Ramakrishna Ghosh ची कमाल! आधी सुपरमॅन झाला, मग सूर्याच्या विकेटसह पदार्पणात लुटली मैफील
11
अजब प्रवास! स्पोर्ट्स न्यूट्रिशनिस्ट झाल्यानंतर ३३ व्या वर्षी Raghu Sharma ला MI कडून IPL पदार्पणाची संधी
12
Pune crime : महिलांच्या छळाचे जुने गुन्हे उघड; नसरापूर प्रकरणातील आरोपीला ७ मेपर्यंत कोठडीत
13
मंत्री गिरीश महाजनांना जाब विचारणाऱ्या 'त्या' महिलेची पहिली प्रतिक्रिया, मांडली सविस्तर बाजू! म्हणाली... 
14
आंबेडकरनगर हादरलं! पतीनं पाकिस्तानी महिलेशी 'निकाह' केला, पत्नीनं सगळा राग चिमुकल्यांवर काढला; ४ मुलांना ठेचून...!
15
Travel : समुद्राच्या लाटा गिळणार 'हे' सुंदर देश; तुमची आवडती ट्रॅव्हल डेस्टिनेशन्स आता धोक्यात!
16
सुरतमध्ये पहिला बॅरिअरमुक्त टोल नाका! १२० च्या वेगातही टोल कापणार, फास्टॅग बंद असेल किंवा नसेल तर...
17
गल्ली क्रिकेट ते थेट टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियात संधी! WPL हॅटट्रिक क्वीनचा स्वप्नवत प्रवास
18
राजस्थान पोलीस दलात खळबळ; IG किशन सहाय यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल
19
महागाईचा भडका उडणार! चार वर्षांत पहिल्यांदाच इंधन दर वाढणार? LPG सिलिंडर ५० रुपयांनी महागणार तर पेट्रोल-डिझेल...!
20
पश्चिम बंगाल : १५ केंद्रांवरील पुनर्मतदानावेळी मोठा राडा; टीएमसी-भाजप कार्यकर्ते भिडले! बघा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

शिदोरी घेऊन बँकेच्या रांगेत

By admin | Updated: November 13, 2016 00:18 IST

पाचशे व हजाराच्या नोटा रद्द होताच जिल्ह्याने २०० कोटींच्या चिल्लर चलनाची मागणी आरबीआयकडे केली.

ग्रामीण नागरिकांची ‘नोटा वारी’ : चिल्लरसाठी भिक्षुकांना चहा-पाणीयवतमाळ : पाचशे व हजाराच्या नोटा रद्द होताच जिल्ह्याने २०० कोटींच्या चिल्लर चलनाची मागणी आरबीआयकडे केली. मात्र, पाहीजे त्या प्रमाणात चलन मिळाले नाही. परिणामी ग्राहकांना नोटांसाठी दररोज बँकेची वारी करावी लागत आहे. गावाकडचे लोक तर पहाटेपासून शिदोरी घेऊन बँक गाठत आहे. काही जण तर जोडीने येऊन रांगेतला नंबर टिकवित आहे. कधी नव्हे ते, चिल्लर मिळण्याच्या आशेने भिखाऱ्यांचेही काही दुकानदार स्वागत करताना दिसले.गेल्या तीन दिवसात जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँक शाखा, ग्रामीण बँक आणि खासगी बँकांमध्ये ३५० कोटी रूपयांचे चलन जमा झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पुरेसे चलन उपलब्ध नसल्याने विड्रॉलरूपात फार कमी पैसे सर्वसामान्यांच्या हाती पडले. चलनाअभावी काही बँकांमध्ये चार हजार रूपयांचेच विड्रॉल भरण्याच्या सूचना झाल्या. प्रत्यक्षात वेळेपर्यंत एक ते दोन हजार रूपये विड्रॉल रूपात मिळाले. नागरिकांना शनिवारी पुन्हा रांगेतच राहावे लागले. शनिवारी सुटी असल्याने शासकीय कर्मचारी मोठ्या प्रमाणात बँकेत पोहोचले. बँकेतही जागा उरली नाही. रांगा रस्त्यावर आल्या. काही बँकांनी ग्राहकांसाठी मंडपाची आणि पाण्याची व्यवस्था केली होती. गावाकडच्या नागरिकांनी सकाळपासूनच रांगेत नंबर लावले. विशेष म्हणजे, हे लोक सोबत भाकरी घेऊनच आले होते. काही जण जोडीने आले होते. एक थकला तर दुसरा तयार, अशा पद्धतीन नंबर लागले. बँकांपुढील मंडपात दुपारी शिदोरी घेऊन जेवणारे ग्राहक पाहायला मिळाले. तर काही माता आणि शिशूही दिवसभर रांगेत होते. बँक कर्मचाऱ्यांच्या वर्तनातही बदल दिसला. छोट्याशा कारणाने ग्राहकांवर ओरडणारे कर्मचारी गत तीन दिवसांपासून दिवसरात्र डोळ्यात तेल घालून काम करीत आहे. कामाचा ताण असला तरी शांत डोक्याने काम करीत आहे. सर्वांना प्रत्येक विषय समजावून सांगत आहेत. एरवी दुकानात आणि घरापुढे भिकारी आला की, त्याला हाकलून दिले जाते. मात्र सध्या भिक्षेकऱ्यांना सर्वाधिक मान मिळत आहे. त्यांच्याजवळ असलेली चिल्लर पाहून त्यांचे स्वागत केले जात आहे. इतकेच नव्हेतर चहा आणि नास्ताही दिला जात आहे.चेकबुकने वाढला गोंधळएटीएममधील पैसे काही तासात संपले. रांगेतल्या अर्ध्या लोकांना पैसे न घेताच रिकाम्या हाताने परतावे लागले. बँकांच्या रांगेत उभे राहावे लागले. ज्यांच्याकडे एटीएम आहे अशा ग्राहकांना चेक जमा करणे बंधनकारक आहे. एका चेकबुकमध्ये मोजकेच चेक असल्याने अनेकांचे चेकबुक संपले. त्यामुळे नवाच गोंधळ निर्माण झाला.मक्का मदिनाचा प्रवास प्रभावीतमक्का मदिना या धार्मिक स्थळी जाण्यासाठी आतापासूनच बुकिंग करावे लागते. यासोबत प्रवासासाठी लागणारे साहित्य आधीच खरेदी करावे लागते. नोटा बंदीने हा प्रवास अडचणीत सापडला आहे. यामुळे यात्रेस जाणाऱ्या ग्राहकांनी बँक व्यवस्थापकांपुढे व्यथा मांडली. मात्र या चर्चेतून काहीच तोडगा निघाला नाही. (शहर वार्ताहर)