शहरं
Join us  
Trending Stories
1
Mansarovar Yatra: "लिपुलेख आमचाच!" भारताच्या मानसरोवर यात्रेला नेपाळचा विरोध; चीनवरही निशाणा
2
चार राज्यांच्या निवडणूका: फलोदीसह अमेरिकन पॉलिमार्केटमध्येही सट्ट्याची धूम; बंगालवर सर्वाधिक सट्टा, भाजपा-तृणमूलमध्ये 'कांटे की टक्कर'
3
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
4
वॉशिंग्टनची 'सुंदर' खेळी! अखेरच्या षटकात षटकार मारत संपवली मॅच; GT ने टेबल टॉपर PBKS ला दिला पराभवाचा धक्का
5
रेल्वे प्रवासात तुमची लूट तर होत नाहीये? जाणून घ्या, खाण्यापिण्याचे दर; बघा IRCTC चं अधिकृत रेट कार्ड
6
​परतवाड्याचा लाकूड बाजार आगीच्या भक्ष्यस्थानी; आकाशाला भिडल्या ज्वाळा, कोट्यवधींचे नुकसान!
7
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
8
GT vs PBKS: अर्धा संघ ४७ धावांत गारद! पंजाबसाठी मुंबईकर सूर्यांश शेडगेनं शड्डू ठोकला; २४ चेंडूत पहिली IPL फिफ्टी
9
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
10
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
11
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
12
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
13
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
14
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
15
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
16
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
17
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
18
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
19
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
20
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
Daily Top 2Weekly Top 5

अन्नत्याग सत्याग्रहाची सांगता

By admin | Updated: October 9, 2015 00:31 IST

पुसद जिल्हा निर्मितीसाठी गांधी जयंतीपासून सुरू असलेल्या पुसद विकास मंचच्या अन्नत्याग आंदोलनाची गुरूवारी यशस्वी सांगता झाली.

पुसद जिल्हा निर्मिती : पुसद विकास मंचच्या पुढाकाराने आंदोलन पुसद : पुसद जिल्हा निर्मितीसाठी गांधी जयंतीपासून सुरू असलेल्या पुसद विकास मंचच्या अन्नत्याग आंदोलनाची गुरूवारी यशस्वी सांगता झाली. या आंदोलनाला सर्वचस्तरातून उत्स्फुर्त पाठिंबा मिळाला. गत दोन दशकांपासून पुसद जिल्हा निर्मितीचा प्रश्न रेंगाळला आहे. जिल्हा निर्मितीसाठी पुसद विकास मंचने आंदोलन सुरू केले. या आंदोलनाचाच एक भाग म्हणून गांधी जयंतीपासून अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात अ‍ॅड़ सचिन नाईक, निशांत बयास, अभय गडम, अभिलेख खैरमोडे, साकीब शाहा, किसन देशमुख, नाना बेले, बाळासाहेब बरडे, अ‍ॅड़ चंद्रशेखर शिंदे, पंकज पारधे, शरद मैंद, डॉ. वजाहत मिर्झा, भारत पेन्शनवार, ज्ञानेश्वर तडसे, पुंडलिक शिंदे, विष्णू वांजाळ, मनोहर बनसकर, महेंद्र मस्के, नारायण पुलाते सहभागी झाले होते. पहिल्या दिवसापासूनच या आंदोलनाला नागरिकांचा पाठिंबा मिळत होता. माजी मंत्री आमदार मनोहरराव नाईक यांनी सत्याग्रह मंडपाला भेट देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली होती. परंतु लोकहितार्थ निर्धारित तारखेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. जिल्हा निर्मितीसाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस पक्ष, पुसद तालुका पक्ष यासह पुसद तालुक्यातील २५ च्यावर ग्रामपंचायतींनी ठराव घेतले. जिल्हा काँग्रेस कमिटीने या आंदोलनाला पाठिंबा असल्याचे पत्र जिल्हाध्यक्ष वामनराव कासावार तर तालुकाध्यक्ष पुंडलिक टारपे व ज्ञानेश्वर तडसे यांनी तालुका काँग्रेस कमिटीतर्फे पाठिंबा दिला. सत्याग्रहाच्या यशस्वीतेसाठी निशांत बयास, अभय गडम, धनंजय सोनी, किरण देशमुख, अ‍ॅड़ चंद्रशेखर शिंदे, नारायण पुलाते, राहुल कांबळे, कैलास जगताप, धनंजय अत्रे, सुरेश डुबेवार, महेंद्र मस्के, रवी ग्यानचंदानी, अ‍ॅड़ कैलास राठोड, अ‍ॅड़ प्रशांत कागदेलवार यांनी सहकार्य केले. सुमारे २० हजार नागरिकांनी सत्याग्रहाला भेट दिल्याचे पुसद विकास मंचच्यावतीने सांगण्यात आले. (तालुका प्रतिनिधी)