शहरं
Join us  
Trending Stories
1
धीरेंद्र शास्त्री-संजय गायकवाडांची छत्रपती शिवरायांवर विधाने, CM फडणवीस थेट बोलले; म्हणाले…
2
“भाषेचा आग्रह धरणे…”; रिक्षा-टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य, CM फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया
3
ऑस्ट्रेलियाचा सुपरफास्ट गोलंदाज मिचेल स्टार्कची IPL 2026मध्ये 'एन्ट्री'; 'या' संघाची ताकद वाढली!
4
जागतिक अस्थिरतेचा Gold-Silver च्या दरांवर परिणाम; इराण-अमेरिका तणावामुळे गुंतवणूकदार सतर्क, पाहा नवे दर
5
“ट्रम्प भारताला नरक का म्हणाले हे आता समजले ना”; ‘आप’ फुटीवरून संजय राऊतांची भाजपावर टीका
6
‘सात खासदारांना अपात्र ठरवा; पक्षांतरविरोधी कायदा लावा’
7
Ashok Kharat : "माझ्या अंगात दैवी शक्तीचा चमत्कार"; पीडितेच्या परिस्थितीचा अशोक खरातने घेतला फायदा
8
आशियानंतर आता अमेरिकेची वेळ; हॉर्मुझ दीर्घकाळासाठी बंद राहिला तर ट्रम्प यांच्या देशालाही बसेल मोठा फटका
9
Mumbai: देशातील सर्वात श्रीमंत पालिकेची नाट्यगृहे इतरांच्या तुलनेत महागडी 
10
बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींवर संतापले नागपुरकर भोसले, म्हणाले- हे खपवून घेणार नाही!
11
झारखंडमधील बँकेवर मोठा दरोडा; १० मिनिटांत ७ कोटींचं सोनं आणि ५ लाख लंपास
12
“केजरीवालांचा स्वतःसाठी शीशमहल-२, हा पैसा कोणाचा?”; नव्या बंगल्यावरुन भाजपाने घेरलं
13
रेल्वेमधून उतरल्यावर स्थानकामध्येच प्रवाशांना करता येणार किराणा खरेदी
14
Ashok Kharat : आई-वडिलांच्या मृत्यूचा योग टाळण्याचा बहाणा; सीएकडून भोंदू अशोक खरातने उकळले ८ कोटी
15
“आज आनंद दिघे असते, तर संजय निरुपम यांना चपराक लगावली असती”: संदीप देशपांडे, मनसे आक्रमक
16
टीसीएस, इन्‍फोसिस, एचसीएल, विप्रो आणि टेक महिंद्रामध्ये भरती प्रक्रिया मंदावली; ७,३८९ कर्मचाऱ्यांनाही दिला नारळ
17
Mumbai KEM Hospital: केईएम आता ‘कौशल्यश्रेष्ठ एकलव्य मेमोरियल हॉस्पिटल’
18
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
19
आश्रमात २०० व्हिडिओ आणि ९० औषधांची सॅम्पल्स; भोंदू राजेंद्र गडगेच्या उपचाराने बरे वाटणाऱ्यांची होणार चौकशी
20
Panama Canal Charge: अमेरिका-इराण तणावामुळे 'हा' छोटा देश मालामाल; एका जहाजासाठी मोजावे लागताहेत ३७ कोटी रुपये
Daily Top 2Weekly Top 5

नेरमध्ये नबाबपूर, आनंदवाडी परिसर सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2020 05:00 IST

नेर शहरात सुरुवातीला वलीसाहब नगर येथील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याच परिवारातील दोघे जण पॉझिटिव्ह आले होते. ते सर्वच कोरोनामुक्त झाले आहे. मात्र आता आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. हार्डवेअर चालकाचा दिवाणजी बुधवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो दिवाणजी मालकाच्या घरीच भाड्याने राहात होता.

ठळक मुद्दे२४ तासात आढळले दोन कोरोना रुग्ण : ११ जण कोविड सेंटरमध्ये, प्रशासन पुन्हा सतर्क

लोकमत न्यूज नेटवर्कनेर : शहरातील एका दुकानाचा नोकर कोरोना पॉझिटिव्ह आला आहे, तर आनंदवाडी परिसरातील महिलाही पॉझिटिव्ह आली. २४ तासात दोन रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. प्रशासनाने या पॉझिटिव्ह व्यक्तीच्या संपर्कातील ११ जणांना कोविड केंद्रात हलविले आहे. एक दुकानदार, डॉक्टर व तीन नोकर हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये आहे. नबाबपूर व आनंदवाडी परिसर सील केला आहे.नेर शहरात सुरुवातीला वलीसाहब नगर येथील एक शिक्षक कोरोना पॉझिटिव्ह सापडल्यानंतर त्याच परिवारातील दोघे जण पॉझिटिव्ह आले होते. ते सर्वच कोरोनामुक्त झाले आहे. मात्र आता आणखी एक कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने चिंतेत भर पडली आहे. हार्डवेअर चालकाचा दिवाणजी बुधवारी रात्री कोरोना पॉझिटिव्ह आढळला. तो दिवाणजी मालकाच्या घरीच भाड्याने राहात होता. आजारी पडल्यानंतर एका खासगी डॉक्टरकडे तपासणीकरिता गेला. डॉक्टरला कोरोनाची शंका आल्याने यवतमाळ शासकीय रुग्णालयात तपासणीला जाण्याचा सल्ला दिला. तेथे तो पॉझिटिव्ह आढळला आहे. हा अहवाल येताच तहसीलदार अमोल पोवार, नगरपरिषद मुख्याधिकारी नीलेश जाधव, ठाणेदार प्रशांत मसराम, गटविकास अधिकारी युवराज मेहत्रे, आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र दुर्गे, वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित चव्हाण, डॉ. प्रतीक खोडवे, अशोक राऊत, नानासाहेब घोंगळे, शंकर भागळकर आदींनी निर्देश देवून परिसर सील केला व रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या