शहरं
Join us  
Trending Stories
1
"५ कोटी द्या अन्यथा..."; मुंबई रेल्वे नियंत्रण कक्षाला धमकीचा फोन, पोलिसांकडून व्यक्तीचा तपास सुरू
2
IAS रिंकू सिंह यांचा 'यू-टर्न'! राष्ट्रपतींना पाठवलं पत्र, पण राजीनामा मागे घेण्यासाठी घातल्या 'कडक' अटी
3
एका शेअरवर २४० रुपयांचा डिविडंड देणार 'ही' कंपनी; नफ्यात जोरदार वाढ झाल्यानंतर कंपनीची घोषणा, तुमच्याकडे आहे का?
4
रणरागिणी! ज्वेलरी शोरुममध्ये शिरलेल्या चोराला १८ वर्षांची मुलगी भिडली; धाडसाचा Video व्हायरल
5
आयपीएलच्या इतिहासातील 'लो-स्कोअरिंग' सामना कुठला? अवघ्या ४९ धावांवर ऑलआऊट झाला होता 'हा' संघ
6
घसरणीसह उघडला शेअर बाजार, 'या' स्टॉक्सनं रेड झोनमध्ये केली कामकाजाला सुरुवात
7
इराणसमोर नवे संकट, तेल कुठे साठवायचे?, मर्यादा संपत आली; निर्बंधांमुळे निर्यात ठप्प
8
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
9
पंजाबमधील पतियाळा येथे रेल्वे रुळांवर स्फोट, एका इसमाचा सापडला मृतदेह
10
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
11
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
12
लूज शर्ट अन् प्रेग्नन्सी ग्लो! दुसऱ्यांदा आई होणाऱ्या दीपिका पादुकोणचा एअरपोर्ट लूक व्हायरल
13
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
14
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
15
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
16
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
17
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
18
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
19
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
20
जनगणनेबाबत शंकांची ही घ्या उत्तरे; वैयक्तिक माहिती ठेवली जाते गुप्त, चुकीची माहिती दिल्यास...
Daily Top 2Weekly Top 5

कर्तव्यावरील पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2020 05:00 IST

यवतमाळातील प्रभाग १० व २० मध्ये कोरोनाचे एकाच वेळी आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहे. हा संपूर्ण परिसर सील केला आहे. या ठिकाणी तैनात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस व्हॅनलाच निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. या भागात जिल्हा पोलीस दल, एसआरपीएफ, होमगार्ड जवान तैनात आहेत. शहर ठाणेदार धनंजय सायरे व लोहारा ठाणेदार सचिन लुले यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन तयार केली आहे.

ठळक मुद्देसुरक्षिततेचा असाही उपाय । बंदोबस्ताच्या ठिकाणीच कर्मचाऱ्यांचे निर्जंतुकीकरण

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : शहरात आठ कोरोना रुग्ण एकाच परिसरात आढळल्याने मोठी खळबळ उडाली आहे. प्रशासनाकडून संसर्ग थांबविण्यासाठी विविध उपाय केले जात आहे. ३३ हजार ३४५ नागरिकांना होम क्वारंटाईन केले आहे. या भागात मोठा पोलीस बंदोबस्त आहे. कर्तव्यावर असलेल्या पोलिसांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत त्यांच्यासाठीच निर्जंतुकीकरण फवारणारी पोलीस व्हॅन तयार केली आहे. या व्हॅनमध्ये काही मिनिट थांबल्यानंतर निर्जंतुकीकरण होते.यवतमाळातील प्रभाग १० व २० मध्ये कोरोनाचे एकाच वेळी आठ रुग्ण पॉझिटीव्ह आले आहे. हा संपूर्ण परिसर सील केला आहे. या ठिकाणी तैनात पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलीस व्हॅनलाच निर्जंतुकीकरण यंत्रणा बसविण्यात आली आहे. या भागात जिल्हा पोलीस दल, एसआरपीएफ, होमगार्ड जवान तैनात आहेत. शहर ठाणेदार धनंजय सायरे व लोहारा ठाणेदार सचिन लुले यांच्या संकल्पनेतून सॅनिटायझर व्हॅन तयार केली आहे. या व्हॅनमध्ये फॉगर (फवारे) बसविले आहे. त्या माध्यमातून निर्जंतुकीकरण औषधाची फवारणी केली जाते. सूक्ष्म स्वरूपाचे फॉगर असल्याने बारिक तुषार त्यातून उडतात. एकाच रांगेत हे सर्व लावण्यात आल्याने कर्तव्यावरील पोलीस त्या व्हॅनमध्ये काही मिनिट थांबल्यानंतर डोक्यापासून पायापर्यंत निर्जंतूक होतो. याचा प्रभावी वापर सध्या केला जात आहे. ही व्हॅन बंदोबस्ताच्या ठिकाणी जाऊन कर्मचाऱ्यांना निर्जंतूक होण्यासाठी मदत करीत आहे. या सॅनिटायझर व्हॅनमधून सॅनिटाईझ होण्याचा अनुभव जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राज कुमार, अपर अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी माधुरी बावीस्कर या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घेतला. त्यानंतरच अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या सेवेसाठी ही व्हॅन फिरविली जात आहे.या व्हॅनमुळे कोरोनाचा प्रादूर्भाव असलेल्या भागात कर्तव्य बजावणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. आरोग्य विभागाच्या चमूकडूनही परिसरात अधिकारी-कर्मचाऱ्यांचे स्क्रिीनिंग केले जाते.

टॅग्स :Policeपोलिस