324 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पगारवाढ; 2298 अद्याप संपावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 05:00 AM2021-12-03T05:00:00+5:302021-12-03T05:00:07+5:30

यवतमाळ जिल्ह्यात परिवहन विभागाकडे २,६२२ कर्मचारी आहेत. यातील ३२४ कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. यामध्ये प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी, चालक, वाहक यांचा समावेश आहे. अजूनही २,२९८ कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. काम केले तरच दाम मिळेल, या नियमानुसार परिवहन विभाग कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू करणार आहे. यामुळे सध्यातरी ३२४ कर्मचाऱ्यांनाच ही पगारवाढ लागू झाली आहे.

Salary increases accepted by 324 employees; 2298 still on strike | 324 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पगारवाढ; 2298 अद्याप संपावर

324 कर्मचाऱ्यांनी स्वीकारली पगारवाढ; 2298 अद्याप संपावर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
यवतमाळ : परिवहन मंत्री अनिल परब यांनी कर्मचाऱ्यांना कामावर हजर होण्याचे आवाहन केल्यानंतर जिल्ह्यातील ३२४ कर्मचारी हजर झाले आहे. या हजर झालेल्या कर्मचाऱ्यांनाच वेतनवाढ लागू होणार आहे. 
यवतमाळ जिल्ह्यात परिवहन विभागाकडे २,६२२ कर्मचारी आहेत. यातील ३२४ कर्मचारी सेवेत रूजू झाले आहेत. यामध्ये प्रशासकीय कर्मचारी, कार्यशाळा कर्मचारी, चालक, वाहक यांचा समावेश आहे. अजूनही २,२९८ कर्मचारी संपामध्ये सहभागी आहेत. 
काम केले तरच दाम मिळेल, या नियमानुसार परिवहन विभाग कामावर हजर होणाऱ्या कर्मचाऱ्यांना पगारवाढ लागू करणार आहे. यामुळे सध्यातरी ३२४ कर्मचाऱ्यांनाच ही पगारवाढ लागू झाली आहे.

खासगी गाड्यांची सवय झाली

आधी कोरोनाकाळात बसेस बंद होत्या, अन् आता कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस बंद आहेत. आम्हाला तर प्रवास करावाच लागतो. आम्ही पर्यायी व्यवस्था शोधली आहे. आता खासगी गाड्यांची सवय झाली आहे.
- राम केळकर, प्रवासी

एसटी नसल्याने मुलांना शाळेत पाठवायचे कसे, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पास केवळ एसटी बसमध्येच मिळते. आता खासगी वाहनातून अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
- महेश लढ्ढा, प्रवासी

 

Web Title: Salary increases accepted by 324 employees; 2298 still on strike

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.