शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये मोठा राडा! भाजपने मध्यरात्री हॉग मार्केटमधील तृणमूल काँग्रेसचे कार्यालय पाडले, बुलडोझर आणला अन्...
2
राजीनामा देण्यास ममतांचा नकार, निवडणूक निकाल जनतेचा कौल नसून कटकारस्थान
3
आजचे राशीभविष्य ६ मे २०२६: आर्थिक गुंतवणुकीसाठी अनुकूल दिवस, धनलाभ होण्याची शक्यता
4
सरकारी नोकरीचं टेन्शन मिटलं! वर्ग 'ब' आणि 'क' पदांसाठी मुलाखती बंद; राज्य सरकारचा ऐतिहासिक निर्णय
5
निश्चय केलेल्या 'विजय'चा विजय! प्रस्थापित गडांना खिंडार पाडणारा 'थलपती'चा झंझावात
6
लैंगिक गुन्ह्यांतील आरोपींना पॅरोल नाकारणारा नवा कायदा येणार; मुख्यमंत्र्यांचे विधि व न्याय विभागाला निर्देश
7
आता सिलिंग जमिनींसाठी १० वर्षांनंतर मोठा दिलासा; जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकार; मोठ्या प्रकरणांना हवी राज्याची मंजुरी
8
नसरापूर लैंगिक अत्याचार; नराधमाला ७ मेपर्यंत कोठडी, विशेष सरकारी वकील नेमणुकीसाठी प्रस्ताव
9
मंत्रालयात कामाच्या धकाधकीत सुरांचा जल्लोष; मधुर गाण्यांनी टळटळीत दुपार झाली संस्मरणीय
10
दुचाकीवर नेला देह, पण ‘ती’ मृत्यूशी झुंज हरली; एटापल्लीतील भयावह वास्तव
11
भोंदूबाबा अशोक खरातला ५ दिवसांची पोलिस कोठडी; शिर्डी जमीन गैरव्यवहार : राहाता न्यायालयाचे आदेश
12
जहाजात अडकलेल्या ५० खलाशांची सुटका; पाळीव प्राण्यांपेक्षाही हीन वागणूक : उच्च न्यायालय
13
मार्कच्या घरी ‘ड्रग्ज’ डिलिव्हरी कोणी केली? क्रिप्टो करन्सीमध्येही झाला नशेचा व्यापार !
14
फ्लेमिंगो तलाव संवर्धनासाठी सिडकोला ‘डेडलाइन’; पाण्याचा प्रवाह रोखला; दोन महिन्यांत अहवाल सादर करा हरित लवादाचे आदेश
15
विमान प्रवाशाच्या बॅगेतील पॉवर बँकचा स्फोट; आग लागताच विमानात उडाली धावपळ, ५ जण जखमी
16
इराणशी युद्धविराम संपलेला नाही; अमेरिकेची स्पष्टोक्ती, हाेर्मुझच्या मार्गातून व्यापारी जहाजांची पाठवणी सुरू
17
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
18
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
19
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात जलमनी योजना ठरली कुचकामी

By admin | Updated: November 19, 2016 01:27 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनाने महत्वाकांक्षी अशी जलमनी योजना सुरू केली होती.

लाखो रुपये पाण्यात : विद्यार्थ्यांचे आरोग्यही आले धोक्यातपांडुरंग भोयर  सोनखासग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना स्वच्छ व शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे यासाठी शासनाने महत्वाकांक्षी अशी जलमनी योजना सुरू केली होती. पाच वर्षांपूर्वी जिल्ह्यात या योजनेच्या अंमलबजावणीला सुरूवात झाली. त्यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात आले. परंतु सध्या या योजनेचा बोजवारा वाजल्याचे चित्र दिसून येत आहे. नेर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या ९१ शाळा असून, यामध्ये उच्च प्राथमिक मराठी शाळांची संख्या ३२ आहे तर एक ते चार वर्ग असलेल्या शाळांची संख्या ५९ आहे. यामध्ये दोन उर्दु तर सात शाळा नगरपरिषदेच्या कक्षात येणाऱ्या आहेत. या सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी जनमनी शुद्धीकरण योजना तालुक्यात राबविण्यात येत आहे. त्यासाठी पाच वर्षांपूर्वीच पाणी शुद्धीकरण मशिन सर्व शाळांना वितरित करण्यात आल्या आहेत. परंतु सध्या स्थितीत बहुतांश शाळांमधील पाणी शुद्धीकरण मशिन बंद पडून धुळखात असलेल्या स्थितीत दिसून येते. त्यामुळे विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी वॉटरबॅगमधून आपल्या घरुनच आणावे लागत आहे. शासनाकडू विद्यार्थ्यांना निर्जुंतुक तसेच क्षार विरहित पाणी मिळावे यासाठी ही योजना राबविली जात होती. या योजने अंतर्गत शाळांना पाणी शुद्धिकरण यंत्रांचे देखील वाटप करण्यात आले. परंतु आता हे यंत्र धूळखात पडून असल्याचे चित्र तालुक्यातील ठिकठिकाणच्या शाळांमधुन सर्रास दिसून येते. यामध्ये शासनाने खर्च केलेले लाखो रुपये पाण्यात गेले आहे. शासनाकडून विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे यासाठी जलमनी योजना सुरू करण्यात आली. यामध्ये निर्जुंतुक तसेच क्षार विरहित पाणी विद्यार्थ्यांना पुरविण्याच्या सूचना आहे. त्याकरिता खास जलशुद्धिकरण मशीन प्रत्येक शाळांना देण्यात आल्या आहेत. परंतु हे मशिन सध्या धुळखात असल्याने विद्यार्थ्यांना दुषित पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे त्यांचे आरोग्य धोक्यात आले असून, शासनाच्या मुळ हेतुलाच हरताळ फासल्या जात आहे. याबाबीची संपूर्ण चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी, तसेच जलमनी शुद्धिकरण मशिनची दुरूस्ती करण्या येऊन त्यांचा वापर विद्यार्थ्यांच्या पिण्याच्या पाण्यासाठी नियमित व्हावा, अशी मागणी ग्रामस्थांनी व पालकांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. (वार्ताहर)