शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट'चे पेपरचोर रडारवर, अधिकाऱ्यांवरही संशय; पुण्यातील महिलेच्या २१ बँक खात्यांत लाखोंचे व्यवहार
2
राखीव प्रवर्गाची सवलत घेतलेल्या उमेदवारांना खुल्या प्रवर्गात ‘नो एंट्री’, राज्य सरकारचा मोठा निर्णय
3
चिनी जहाजांसाठी होर्मुझ पुन्हा उघडले; ट्रम्प-जिनपिंग चर्चा सुरू असताना इराणचा निर्णय
4
उत्तर प्रदेशात पावसाच्या जोरदार तडाख्याने १११ जणांचा मृत्यू; एक जण ५० फूट उडाला
5
महाराष्ट्रात एसआयआर; ३० जूनपासून होणार मतदारांची पडताळणी; १६ राज्ये, ३ केंद्रशासित प्रदेशांमध्ये तिसरा टप्पा  
6
‘प्रतिस्पर्धी नको, आपण भागीदार बनू; व्यापार युद्धात कोणीच विजयी नसतो’, शी जिनपिंग यांच्या ट्रम्प यांना कानपिचक्या
7
जावेद जाफ़रीच्या पत्नीची १७.५ कोटींची फसवणूक: वादग्रस्त महापालिका सहायक आयुक्त पाटीलसह साथीदारांविरुद्ध गुन्हा; पटेलला अटक
8
महाराष्ट्रात काटकसर सुरू! अधिकारी आठवड्यातून किमान १ दिवस फिरणार रेल्वे, बसने
9
“१४ वर्षांचा वनवास संपला, स्वगृही परतलो, माझ्यात DNA…”; आनंद परांजपेंचा शिंदेसेनेत प्रवेश
10
“...तर महाराष्ट्र पुरोगामी राहिला असता”; प्रणिती शिंदेंचे विधान, गडकरींच्या कार्याची स्तुती
11
हा पराभव पचवणं कठीण; सलग पाचव्या पराभवानंतर तिलक वर्माचं नाव घेत काय म्हणाला श्रेयस अय्यर?
12
अरविंद केजरीवाल यांच्यासह ‘आप’च्या ५ नेत्यांच्या अडचणी वाढल्या; ‘या’ प्रकरणात खटला चालणार
13
तिलक वर्माचा मॅच विनिंग सिक्सर! रोमहर्षक सामन्यात MI नं मारली बाजी; पाचव्या पराभवासह PBKS चं गणित बिघडलं
14
भारतीय जहाजावरील हल्ल्यानंतर होर्मुझजवळ आणखी एक मोठी घटना; नांगर टाकलेल्या जहाजावर कब्जा, इराणच्या दिशेनं गेलं!
15
हिटमॅन रोहित शर्माने MS धोनीचा रेकॉर्ड मोडला, पण विराटला मागे टाकणं जमणार नाही, कारण...
16
सोन्यासंदर्भात सरकारचा आणखी एक मोठा निर्णय! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं खरेदी टाळण्याचं आवाहन 
17
PBKS vs MI : शार्दुल ठाकूरची कमाल! श्रेयस अय्यरचा असा घेतला बदला; अन्... (VIDEO)
18
‘एल-निनो’चा संभाव्य धोका, खरीप हंगामासाठी आवश्यक सज्जता ठेवा: शिवेंद्रसिंहराजे भोसले
19
अमेरिका इराण तणावामध्ये भारतासाठी चांगली बातमी, २ LPG टँकर्स 'होर्मुझ' पार करून पुढे निघाले!
20
Jasprit Bumrah : १३ वर्षांचा प्रवास; जसप्रीत बुमराह मुंबई इंडियन्सचा नवा कर्णधार! हार्दिक पांड्याचा विषय संपला?
Daily Top 2Weekly Top 5

राजलक्ष्मी मल्टीस्टेटमध्ये ३४ लाखांची अफरातफर

By admin | Updated: January 13, 2017 01:28 IST

येथील राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट कॉपरेटीव्ह सोसायटीच्या मेनलाईन शाखेत तब्बल ३३ लाख ८९ हजार ३३८ रुपयांची अफरातफर उघडकीस

कॅशिअरवर गुन्हा दाखल : खातेदारांची रक्कम परस्पर घशात
यवतमाळ : येथील राजलक्ष्मी मल्टीस्टेट क्रेडीट कॉपरेटीव्ह सोसायटीच्या मेनलाईन शाखेत तब्बल ३३ लाख ८९ हजार ३३८ रुपयांची अफरातफर उघडकीस आल्याने खातेधारकांमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. दरम्यान यवतमाळ शहर पोलिसांनी या प्रकरणी त्या शाखेच्या रोखपालाविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. या अपहाराची व्याप्ती किती आणि आणखी कुणाचा सहभाग आहे का या दिशेने पोलीस तपास करीत आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजलक्ष्मी मल्टीस्टेटच्या मेन लाईन शाखेतील रोखपाल निखील गजानन गवळी याच्याविरोधात फसवणूक आणि खोटे दस्तावेज तयार करून वापरल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. गवळी ३ डिसेंबर २०१३ पासून या पतसंस्थेत लिपिक या पदावर कार्यरत होते. नंतर त्यांच्याकडे रोखपाल या पदाची जबाबदारी देण्यात आली. या काळात गवळी यांनी दैनिक व्यवहारामध्ये रोख रकमेत ठेवीचे व कर्ज व्यवहारात खोटे व बनावट कागदपत्र तयार करून अफरातफर केली. ही रक्कम शाखेतील इतर बँकेच्या खात्यात जमा करणे आवश्यक असताना त्याचा स्वत:करिता उपयोग केला. यवतमाळ अर्बन को-आॅपरेटीव्ह बँक, हिंगोली पिपल्स को-आॅपरेटीव्ह बँक येथे राजलक्ष्मी पतसंस्थेच्या शाखेचे खाते आहे. या खात्यांमध्ये रकमेचा भरणाच केला गेला नाही. याशिवाय कर्ज खातेदार पियूष पराजिया यांच्या ‘ओडी’ची कर्ज रक्कम भरणा केली नाही. मुदत ठेवीबाबत खोटे दस्तावेज तयार करून त्याचा स्वत: लाभ घेतला. यामध्ये नऊ खातेधारकांचा समावेश आहे.
हा प्रकार खातेदारांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी याची तक्रार राजलक्ष्मी मल्टीस्टेटच्या मार्इंदे चौकातील मुख्य शाखेकडे केली. त्यावरून येथील उपसरव्यवस्थापक संतोष पूनमचंद छापरवाल यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविली. यावरून निखील गवळी यांच्याविरोधात पोलिसांनी फसवणूक, खोटे दस्तावेज बनवणे, त्याचा वापर करणे, आर्थिक अनियमितता करणे अशा स्वरूपाचे गंभीर गुन्हे दाखल केले. या अपहाराची रक्कम वाढण्याची शक्यता आहे. मुख्य शाखेपर्यंत अपहाराची पाळेमुळे असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या अपहार प्रकरणामुळे संस्थेच्या खातेधारकात, ठेवीदारांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. शहर पोलिसांच्या तपासात राजलक्ष्मी मल्टीस्टेटमधील आणखी काही घबाड उघड होतील का याकडे खातेदारांचे लक्ष लागले आहे. या प्रकरणाचा तपास ठाणेदार नंदकिशोर पंत यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक संग्राम ताटे करीत आहे. (कार्यालय प्रतिनिधी)