शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपाचे उमेदवार शुभेंदू सरकार यांना पळवून पळवून मारहाण; पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात कुठे काय घडले... 
2
Top Marathi News LIVE Updates: "चर्चेचे स्वागतच, पण धमक्या..." इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर फोडलं खापर
3
Petrol-Diesel Price Hike: पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीच्या चर्चांना पूर्णविराम; केंद्र सरकारचा मोठा खुलासा
4
२०२६ मध्ये उन्हाचा कहर! AC-कूलरही होतील फेल? बाबा वेंगा यांची धडकी भरवणारी भविष्यवाणी
5
आता खासगी शाळांमध्येही फक्त NCERT पुस्तके, महागड्या पुस्तकावर बंदी; NHRC ने राज्यांना दिला ३० दिवसांचा वेळ
6
IPL 2026: MI vs CSK मॅचआधी चेन्नईला मोठा धक्का; खेळाडूच्या आईचे निधन, सामन्याला मुकणार!
7
मुंबईतून दुपारी सुटणाऱ्या ‘वंदे भारत’ ट्रेनचे टाइमटेबल बदलले, नवीन वेळ काय? कधी होणार लागू?
8
Trinamool Congress vs BJP: तृणमूल अन् भाजप यांच्यात थेट लढत; ‘तिसरी आघाडी’मुळे कोणाचा स्वप्नभंग
9
“ते इथे येतात, मुले जन्माला घालतात अन्...”; ट्रम्प यांच्याकडून भारताची थेट नरकाशी तुलना?
10
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
11
तामिळनाडूमध्ये ५.७३ कोटी मतदार ठरवणार ४,०२३ उमेदवारांचे भवितव्य, 'या' जागांवर सर्वांची नजर
12
PM Internship Scheme 2026: आता १८ ते २५ वर्षांच्या तरुणांना मिळणार ₹९००० चं स्टायपेंड; नियमांमध्ये झाला मोठा बदल
13
वरातीदरम्यान, कुत्र्याचा धुमाकूळ, ६० जणांचा घेतला चावा, वाचण्यासाठी वऱ्हाड्यांची पळापळ  
14
ताडगोळ्यांना इंग्रजीत काय म्हणतात माहीत आहे का? हे पाणीदार फळ कुणी खावं, कुणी टाळावं?
15
IPL 2026: 'ती' गोष्ट केल्याशिवाय वैभव सूर्यवंशी मैदानात उतरत नाही; खुद्द त्यानेच केला खुलासा
16
पैसा, प्लॉट, घर गेले, मातृछत्रही हरवले, ‘त्या’ शहीदपुत्राची हृदयद्रावक कहाणी! नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक
17
"TCS मध्ये नेटचा पासवर्ड अश्लील भाषेत, धार्मिक भावना दुखावल्या"; पीडितेने सांगितली आपबिती
18
Vastu Tips: झोपताना उशीखाली ठेवा 'या' घरगुती वस्तू; नशीब पालटायला वेळ लागणार नाही!
19
US Israel Iran War : जगावर महागाईचं संकट! होर्मुझमधील सुरुंग काढायला लागणार सहा महिने; पेंटागॉनने वर्तवली भीती
20
रिपोर्ट! कामाचा दबाव, नोकरी जाण्याची भीती; 'टॉक्सिक वर्क कल्चर'मुळे दरवर्षी ८ लाखाहून अधिक मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रस्ता कंपनीला ३९ लाखांचा दंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 05:00 IST

दारव्हा-कुपटा राज्य मार्गासाठी कुंभारकिन्ही प्रकल्प क्षेत्रातून रस्ता बांधकाम कंपनीने अंदाजे एक हजार ब्रास अतिरिक्त गौण खनिज उत्खनन केले. त्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. यानंतर ही कारवाई करण्यात आली. या नोटीसमुळे कंपनीचे धाबे दणाणले. ‘ईगल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून दारव्हा-कुपटा मार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण सुरू आहे.

ठळक मुद्देतहसीलदारांची नोटीस : ईगल इन्फ्रास्ट्रक्चरला दणका, अवैध गौण खनिज उत्खनन

लोकमत न्यूज नेटवर्कदारव्हा : रस्त्याच्या कामासाठी अनधिकृत गौण खनिज उत्खनन केल्याप्रकरणी ईगल इन्स्फ्रास्ट्रक्चर या रस्ता बांधकाम कंपनीला तहसीलदार संजय जाधव यांनी ३९ लाखांच्या दंडाची नोटीस बजावली. यामुळे रस्ता बांधकाम कंपनीचे धाबे दणाणले.दारव्हा-कुपटा राज्य मार्गासाठी कुंभारकिन्ही प्रकल्प क्षेत्रातून रस्ता बांधकाम कंपनीने अंदाजे एक हजार ब्रास अतिरिक्त गौण खनिज उत्खनन केले. त्याची वाहतूक केल्याचे निदर्शनास आले. यानंतर ही कारवाई करण्यात आली. या नोटीसमुळे कंपनीचे धाबे दणाणले. ‘ईगल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड’ या कंपनीकडून दारव्हा-कुपटा मार्गाचे रुंदीकरण, मजबुतीकरण, डांबरीकरण सुरू आहे. या कामाकरिता कंपनीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडून कुंभारकिन्ही प्रकल्प क्षेत्रातून एक हजार ब्रास गौण खनिज उत्खननाची परवानगी घेतली. प्रत्यक्षात त्यापेक्षा जास्त उत्खनन होत असल्याची माहिती तहसीलदार संजय जाधव यांना मिळाली. त्यांच्या सूचनेवरून मंडळ अधिकारी व तलाठ्यांनी पंचनामा करून अहवाल सादर केला.अहवालात त्या ठिकाणाहून परवानगीपेक्षा अंदाजे एक हजार ब्रास जादा गौण खनिजाचे उत्खनन करून चोरट्या मार्गाने त्याची विल्हेवाट लावल्याचे नमूद केले. विनापरवाना गौण खनिज उत्खनन करून चोर्या मार्गाने विल्हेवाट लावणे हा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ४८ व पोट कलम ८ (१) ( २) तसेच महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार ‘ब’मधील परिच्छेद ८, ९ आणि ९.२ मधील तरतुदीनुसार दंडास पात्र गुन्हा आहे. त्यामुळे तहसीलदारांनी कंपनीला ३९ लाख रुपये दंड का लावू नये, याबाबत नोटीस दिली. या नोटीसमध्ये २४ तासात हजर होऊन खुलासा करण्याचे निर्देश आहे. आता कंपनीवर काय कारवाई होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. केवळ नोटीस देऊनच प्रशासनाने गप्प राहू नये, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.पहिलीच मोठी कारवाईअवैध गौण खनिज उत्खननाची ही आत्तापर्यंतची तालुक्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याचे बोलले जाते. तहसीलदार संजय जाधव यांनी माहिती मिळताच पाहणी केली. तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले. त्यामुळे हा प्रकार उघडकीस आला. पंचनाम्यात एक हजार ब्रास जादा गौण खनिज उत्खनन करण्यात आल्याचे नमूद आहे. मात्र प्रत्यक्षात त्यापेक्षाही मोठ्या प्रमाणात खोदकाम झाल्याचे सागितले जाते. परिणामी हा अवैध गौण खनिज उत्खननाचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात महसूल प्रशासन पुढे काय भूमिका घेते, यावरच दंडाची रक्कम ठरणार आहे.