शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
2
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
3
Top Marathi News LIVE Updates: विधानपरिषदेसाठी भाजपाने नावं पाठवली, मविआकडून उद्धव ठाकरेंचं नाव आघाडीवर
4
'विशाल पाटलांना तिकीट मिळणार नाही हे जयंत पाटील-विश्वजित कदमांना माहीत होतं"; पडळकरांचा मोठा गौप्यस्फोट
5
युद्धाची तयारी की ढासळणारी अर्थव्यवस्था? रशियानं २२ टन सोने विकले; जागतिक बाजारपेठेत खळबळ
6
अमेरिकेच्या युद्धनौकेवर अचानक माकडाने हल्ला चढवला; होर्मुझच्या मोहिमेवर निघालेले...
7
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
8
विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना वेग! भाजपने नावे पाठवली, मविआतर्फे उद्धव ठाकरे?
9
"डोनाल्ड ट्रम्प यांनी पदाची प्रतिष्ठा घालवली"; 'भारताला नरक' म्हणताच अमेरिकन खासदार कृष्णमूर्ती भडकले
10
ChatGPT नं एका झटक्यात संपवली १६ अब्ज डॉलरची कंपनी; अवघ्या ४ वर्षात शेअर्समध्ये घसरण, काय घडलं?
11
राजस्थान विधानसभेला बॉम्बने उडवण्याची धमकी, IPL सामन्यापूर्वी जयपूरमध्ये खळबळ 
12
कित्येकींनी साकारल्या राणी सईबाई; पण जिनिलीयाला पाहून चाहते म्हणतात- "सौंदर्य आणि शक्ती..."
13
Sandeepa Virk : प्रेग्नन्सी टेस्ट, ४ महिने तिहार जेल; अभिनेत्रीचा खळबळजनक खुलासा, म्हणाली, "मला रात्रीच्या वेळी..."
14
ही इलेक्ट्रीक एसयुव्ही लाँच काय झाली, ३० मिनिटांत १०,००० बुकिंग; पहा कोणती एवढी कंपनी डिमांडमध्ये आहे...
15
मंत्रिमंडळात एकत्र बसायचे, बाहेर विरोधात कुरघोड्या करायच्या? शिंदे-नाईक वादावर नागरिक नाराज!
16
शाहरुखची मॅनेजर पूजा गुरनानीनं वांद्य्रात खरेदी केले ३ आलिशान फ्लॅट्स; एका चौरस फुटाची किंमत ₹८४,०००
17
'रशियासोबत अमेरिकेनं जे केलं ते आपल्यासोबत..,' म्हणून अनेक देश वाढवताहेत आपला सुवर्ण साठा; प्रकरण काय?
18
शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
19
९ तासांत २ बलात्कार अन् १ हत्या, आधी मित्राच्या बायकोवर बळजबरी मग...; आरोपी राहुलचं सत्य उघड
20
केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते ‘भारत टॅक्सी’ ॲपचा शुभारंभ
Daily Top 2Weekly Top 5

महावितरण आणणार सुधारित बिलिंग प्रणाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2019 22:20 IST

ग्राहकांना योग्य गुणवत्तेची वीज मिळावी याकरिता महावितरण सुधारित बिलिंग प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी महावितरणतर्फे ग्राहक जनजागृती शिबिर घेण्यात आले.

ठळक मुद्देजनजागृती शिबिर : उच्चदाब ग्राहकांसाठी ‘केव्हीएएच’ प्रस्तावित

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : ग्राहकांना योग्य गुणवत्तेची वीज मिळावी याकरिता महावितरण सुधारित बिलिंग प्रणाली आणण्याच्या तयारीत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी महावितरणतर्फे ग्राहक जनजागृती शिबिर घेण्यात आले.अमरावती परिमंडळाच्या मुख्य अभियंता सुचित्रा गुजर यांच्या मार्गदर्शनात हे शिबिर पार पडले. अधीक्षक अभियंता सुरेश मडावी, कार्यकारी अभियंता संजयकुमार चितळे, योगेश वारके, अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजय श्रृंगारे, एमआयडीसी असोसिएशनचे अध्यक्ष नंदू सुराणा, सचिव आनंद भुसारी यावेळी उपस्थित होते.उच्चदाब व २० किलो वॅटवरील ग्राहकांसाठी पुढील काळात किलो व्होल्ट अ‍ॅम्पियर अवर (केव्हीएएच) बिलिंग प्रणाली महावितरणने प्रस्तावित केली आहे. ग्राहकांसाठी सोईच्या असलेल्या या प्रणालीबाबत शिबिरात ग्राहकांना माहिती देण्यात आली. या बिलिंग प्रणालीचा मुख्य उद्देश हा ग्राहकाने पॉवर फॅक्टर एक ठेवावा, जेणेकरून वितरण हानी कमी होईल व विजेचा दर्जा वाढून ग्राहकांना उच्चतम गुणवत्तेची वीज मिळावी हा आहे. या प्रणालीत जास्त रिअ‍ॅक्टीव्ह पॉवर वापरणाऱ्या ग्राहकांना जास्त बिल भरावे लागणार आहे. त्यामुळे ग्राहकांना कमीत कमी रिअ‍ॅक्टीव्ह पॉवर वापरण्यासाठी ही प्रणाली प्रोत्साहीत करणार आहे. याशिवाय इन्सेन्टीव्ह व पेनॉल्टी वेगळी लावण्याची या प्रणालीत गरज नाही.ग्राहकांच्या शंकांचे केले समाधानमहावितरणने आपल्या व्यवस्थापनाच्या पद्धतीमध्ये बदलत्या गरजानुसार गेल्या तीन वर्षात अनेक ग्राहकाभिमुख बदल केले आहे. त्याचेच पुढील पाऊल म्हणून केव्हीएएच बिलिंग प्रणाली सुरू करण्याचे प्रस्तावित आहे. ग्राहकांसाठी संपूर्णपणे नवीन असलेल्या या प्रणालीबाबत उपकार्यकारी अभियंता संगीता चव्हाण यांनी पॉवर पॉर्इंट प्रेझेन्टेशनद्वारे सविस्तर माहिती दिली. तसेच ग्राहकांनी उपस्थित केलेल्या विविध शंकांचे निरसनही करण्यात आले.

टॅग्स :mahavitaranमहावितरण