शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक! ३० वर्षीय अभिनेत्री घरात बेशुद्ध पडली अन् घेतला अखेरचा श्वास, कुटुंबाला मोठा धक्का
2
इराण युद्धाची भारताने चुकवली किंमत, २५ लाख टन युरियाची दुप्पट दरात केली खरेदी; बाजारपेठेत खळबळ
3
ब्रेक फेल, नियंत्रण सुटले, भरधाव ट्रकची बोलेरोसह दोन वाहनांना धडक, ११ जण जिवंत जळाले   
4
IRS अधिकाऱ्याच्या मुलीवर अत्याचार आणि हत्या; हाय-टेक सुरक्षा भेदून घरात कसा घुसला आरोपी?
5
Success Story: ₹८००० ची नोकरी ते ₹२३,००० कोटींच्या साम्राज्यापर्यंत, स्कूल ड्रॉपआउट निखिल कामथ कसे बनले अब्जाधीश?
6
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
7
लेख: काँक्रीटच्या जंगलात चतकोर तरी मोकळी जागा ठेवाल का?
8
लेख: डोनाल्ड ट्रम्प यांना झुकवणाऱ्या होर्मुझ सामुद्रधुनीचे रहस्य!
9
आजचा अग्रलेख: शस्त्रे म्यान, गळचेपी सुरूच !
10
महापालिका अधिकारी कैलास गायकवाड यांच्या घरात रात्रभर झाडाझडती, पोलिसांना सापडलं मोठं घबाड
11
'...तर कॉन्सर्टला परवानगी नाहीच' पोलीस आयुक्तांची भूमिका; कठोर कारवाईचे आदेश
12
१ मे पासून ऑनलाइन गेमिंग्सबाबत नवे नियम; सरकारचा मोठा निर्णय, 'या' गेम्सवर बंदी तर इतरांना सूट
13
Bombay High Court: ‘त्या’ दोन महिलांना गर्भधारणेसाठी वैद्यकीय चाचण्यांना मुभा- मुंबई उच्च न्यायालय
14
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
15
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
16
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
17
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
18
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
19
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
20
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

ऑक्टोबरमध्ये परतीच्या पावसाने २२ हजार हेक्टर पिकांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2020 05:00 IST

शासकीय निकषानुसार हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत नुकसानग्रस्त क्षेत्राला दिली जाणार आहे. त्यानुसार २२ हजार ७४० हेक्टरकरिता जिल्ह्याला १५ कोटी ४६ लाख ३२ हजार रुपयांची मदत लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या नुकसानग्रस्त क्षेत्राला दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. प्रत्यक्षात ही मदत नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी तोकडी पडणार आहे. या पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा प्रशासनापुढे यायचा आहे.

ठळक मुद्देकापसाला सर्वाधिक फटका : १५ कोटी रुपयांच्या मदतीची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कयवतमाळ : परतीच्या पावसाने ऑक्टोबर महिन्यात चांगलाच धुमाकूळ घातला. या पावसात जिल्ह्यातील २२ हजार हेक्टरवरील पिके क्षतीग्रस्त झाली आहे. या क्षेत्रावर ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याने मदतीसाठी प्रशासनाकडून १५ कोटी रुपयांची मागणी राज्य शासनाकडे करण्यात आली आहे.परतीचा पाऊस जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यांमध्ये कोसळला. दारव्हा आणि दिग्रस तालुक्यामध्ये ६५ मिमी पेक्षा अधिक पावसाची नोंद करण्यात आली. ६० मिमी पेक्षा अधिक पाऊस म्हणजे अतिवृष्टी नोंदविली जाते. या दोन तालुक्यांमध्ये ३३ टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झालेले २२ हजार ७४० हेक्टर क्षेत्र आहेत. कृषी, महसूल आणि तहसील विभागाच्या संयुक्त पंचनामे शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडे सादर केले.जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान कापसाचे झाले आहे. १२ हजार १९५ हेक्टरवरील पिके मातीमोल झाली आहे. तर आठ हजार १७५ हेक्टरवरील सोयाबीन क्षेत्राचे ३३ टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झाले आहे. तर दोन हजार ३७० हेक्टरवरील तूर पिकाला याचा फटका बसला आहे.शासकीय निकषानुसार हेक्टरी सहा हजार ८०० रुपयांची मदत नुकसानग्रस्त क्षेत्राला दिली जाणार आहे. त्यानुसार २२ हजार ७४० हेक्टरकरिता जिल्ह्याला १५ कोटी ४६ लाख ३२ हजार रुपयांची मदत लागणार आहे. जिल्हा प्रशासनाने सादर केलेल्या या नुकसानग्रस्त क्षेत्राला दिवाळीपूर्वी मदत मिळावी अशा स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी स्थानिक प्रशासनाला दिल्या आहेत. प्रत्यक्षात ही मदत नुकसानग्रस्त क्षेत्रासाठी तोकडी पडणार आहे. या पेक्षा अधिक क्षेत्रामध्ये नुकसान झाले आहे. त्या ठिकाणचा पंचनामा प्रशासनापुढे यायचा आहे.जिल्ह्यातील दारव्हा आणि दिग्रस या दोन तालुक्यातीलच नुकसानीची ३३ टक्के पेक्षा अधिक बाधित क्षेत्र म्हणून नोंद झाली आहे. इतर १४ तालुके यामध्ये नोंदविल्या गेले नाही. या तालुक्यांमध्येही मोठ्या प्रमाणात नुकसान आहे.पावसाळ्यात ३१ हजार हेक्टरची हानीजिल्ह्यामध्ये जून ते ऑक्टोबर या कालावधीमध्ये ३१ हजार १२७ हेक्टरचे नुकसान शासनाच्या दरबारी नोंदविल्या गेले आहेत. या क्षेत्रासाठी २२ कोटी रुपये लागणार आहे. कोरडवाहू क्षेत्रासोबत बागायती क्षेत्राचेही नुकसान झाले आहे. नुकसानी पोटी मिळणारी मदत शेतकऱ्यांना अपुरीच राहणार आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती